कलासाधना पुरस्कार म्हणजे मातीतील आयुष्य सुगंधित करणारा सर्वोच्च पुरस्कार._विवेक घळसासी.


 कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने देण्यात आलेला पुरस्कार म्हणजे आपल्या मातीतील आयुष्य सुगंधीत करणारा सर्वोच्च पुरस्कार ... विवेक घळसासी! 

पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून, दक्षिण काशी म्हणून जसे प्रसिद्ध आहे, तसेच या पंढरीला कलेचा वारसा देखील दैदिप्यमान लाभलेला आहे.  अनेक शतकांची ही पुण्यभूमी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. तसेच अनेक दिग्गज कलाकार देखील या भूवैकुंठात जन्म घेतलेले आहेत. साहित्य, कला, संगीत व नाट्य या विविध क्षेत्रात अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कलासाधना जोपासली आहे. अशा कलाकारांना गेली १८ वर्ष हा पुरस्कार ही संस्था  देत असते. 

कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने पंढरी कलारत्न व विशेष गुणवत्ता पुरस्काराचे वितरण कर्मयोगी सभागृह पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली, दाते पंचांगकर्ते श्री. मोहनजी दाते यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. 

      यावेळी संस्थेच्या वतीने पंढरी कलारत्न हा पुरस्कार यावर्षी पंढरीचे सुपुत्र व सध्या नागपूरस्थित     असलेले , ज्येष्ठ निरुपणकार   विवेकजी घळसासी  यांना "पंढरी कलारत्न"   पुरस्काराने सन्मानित करण्यात आले , त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना घळसासी पुढे म्हणाले की,  कलासाधनाचे हे कार्य अखंडीतपणे सुरु ठेवा, लहान मुलांना जातीभेद, वर्णभेद, यापासून पालकांनी दूर ठेवावे व राष्ट्रभक्ती लहानपणापासून मनात रुजवावी. तसेच चंद्रभागेच्या पावित्र्याकडे व स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. तसेच लवकरच प्रशांत परिचारकांनी आमदार पदाची सूत्र स्विकारायला जाताना माझ्या घरी नागपुरला नक्की यावे.  याच बरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये भरघोस यश प्राप्त करुन सहाय्यक महसूल यापदी निवड झाल्याबद्दल कु. सोनिया शरद कागदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र  विषयात  सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल कु. प्रतीक्षा भारत माळी, दिल्ली कॅपिटल्स संघाच्या टीम डॉक्टर व मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ महिला संभाव्य संघात खेळाडू म्हणून निवड झाल्याबद्दल कु. वेदिका चंद्रकांत मगर,  तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षाखालील मुलिंच्या टी२० व वनडे संघात निवड झाल्याबद्दल कु. भक्ती गणेश पवार  व राष्ट्रीय पातळीवर स्वच्छ व निरोगी भारत याविषयी माझ्या पाच कल्पना या शोध निबंधास राष्ट्रपती पारितोषिक मिळाल्याबद्दल चि. संस्कार अशोक आवताडे, व घनकचरा व्यवस्थापन या शोध निबंधास राष्ट्रपती पारितोषिक मिळाल्याबद्दल चि. सार्थक सिध्देश्वर लेंगरे गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व आपल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व बहुमान प्राप्त  झालेल्या प्रा. व्ही. डी. परिचारक, डॉ. कैलाशजी करांडे, अभियंता राजेंद्र माळी, अमरसिंह चव्हाण, अनिरुद्ध बडवे पाटील, या व्यक्तिंचाही बहुमान संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच मा. प्रशांतराव परिचारक यांचा सत्कार अमृतभाई पेनूरकर यांनी तर पंचांगकर्ते मोहनजी दाते यांचा सत्कार डॉ. आनंद भिंगे यांच्या हस्ते करण्यात आला. 

संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ देखील मा. आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते संपन्न झाला. याचवेळी विविध स्पर्धांचे परिक्षण केलेले परिक्षक वा. गो. भाळवणकर सर,  सौ. जान्हवी पुजारी दुदगीकर, सौ. अंकिता हावगोळ राजे, सौ सारिका कोठाडिया, कु. आरती मनमाडकर, प्रतिभा यादव, सौ. स्नेहल पाठक देशपांडे, राजेश खिस्ते सर, संजय बडवे सर, प्रद्युम्न कमठाणकर सर,राजेश अंबिके, गजानन सावंत, संतोष कुलकर्णी सर, यांचा उत्कृष्ट परिक्षण केल्याबद्दल    यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना प्रशांत परिचारक म्हणाले की, कै. सुधाकरपंत परिचारक यांचा आशीर्वाद असल्याने ह्या संस्थेचे कार्य अव्याहत सुरु  असून भविष्य काळात संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. 

     सदर कार्यक्रम कर्मयोगी सभागृह  येथे रविवार दि.१५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५वाजता संपन्न झाला.  कार्यक्रमाची सुरुवात विवेकजी घळसासी यांच्या आयुष्यावर केलेल्या शाहीर विजय व्यवहारे आणि मंडळी यांच्या बहारदार पोवाड्याने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत प्रभाकर बडवे महाजन यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख ज्ञानेश्वर मोरे गुरुजी यांनी करुन दिली. तर उत्कृष्ट सूत्र संचालन डॉ. सौ. मैत्रेयी केसकर यांनी केले.  सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलासाधनाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत प्रभाकर बडवे महाजन यांच्यासह मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. विनायक परिचारक, सचिव ज्ञानेश्वर मोरे, अमरसिंह चव्हाण सर, अभियंता राजेंद्र माळी साहेब, डॉ. कैलाश करांडे, रणजीत पवार, अरिहंत कोठाडिया, अक्षय अनिरुद्ध बडवे, डॉ. किरण बहिरवाडे, अभिराज बडवे, प्रा. राजेंद्र मोरे, राजकुमार शहा, राजकुमार आटकळे, बसवराज बिराजदार,प्रा. मंदार परिचारक,महेश अंबिके, डॉ. बसवराज सुतार, डॉ. आनंद भिंगे, अमृतभाई शहा,  अनंता नाईकनवरे,अशोक आवताडे सर, महेश देशपांडे, नारायण बडवे, सौ. मंदाकिनी देशपांडे,  डॉ. सौ. मैत्रेयी केसकर, सौ. प्रतिभा यादव, प्रद्युम्न कमठाणकर,  शिवाजी यादव आदी कलासाधनाचे सदस्य विशेष योगदान दिले. कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक, पालक, स्पर्धक, मान्यवर,व पत्रकार बहूसंख्येने उपस्थित होते.  मान्यवरांचे स्वागत अक्षय बडवे यांनी केले तर आभार रणजीत पवार यांनी मानले.

संपादक.

चैतन्य उत्पात.


Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.