Posts

Showing posts from February, 2026

सावरकर वाचनालय येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानमाला संपन्न.

Image
 सावरकर वाचनालय येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानमाला संपन्न. पंढरपूर (प्रतिनिधी)स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची पुण्यतिथी व्याख्यानमाला सावरकर प्रेमी मंडळ आणि सावरकर वाचनालय यांच्या वतीने साजरी करण्यात आली.           सावरकरांच्या विचाराने प्रेरित झालेली ही व्याख्यानमाला गेली ६० वर्ष त्यांच्या विचारांचा, कार्याचा आणि साहित्याचा प्रचार विविध व्याख्यानमालेच्या माध्यमातून करीत असते. यावर्षी मंगळवार दिनांक २४ ते गुरुवार दिनांक २६ फेब्रुवारी  दरम्यान व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.             सावरकर पुण्यतिथी व्याख्यानालाचे पहिले पुष्प पुण्याचे युवा व्याख्याते श्री मयूर भावे यांनी "महायोगी अरविंद" या विषयावर गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मोहन मंगळवेढेकर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि व्याख्या त्यांचा परिचय डॉ. श्री मिलिंद जोशी यांनी करून दिला. व्याख्याते श्री मयूर भावे यांनी आपल्या  ओघवत्या शैलीत महायोगी अरविंद यांचे जीवनचरित्र सांगितले. योगी अरविंद यांच्या जीवनातील अ...

होळी ते रंगपंचमी या काळात रंगणार उत्पात समाजाच्या बैठकीच्या लावण्या.

Image
 होळी ते रंगपंचमी या काळात रंगणार उत्पात समाजाच्या बैठकीच्या लावण्या. पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर येथे होळी ते रंगपंचमी या काळात शेकडो वर्षांची परंपरा असणारा बैठकीची लावणी, हा कार्यक्रम आज सोमवार  दी २ मार्च ते रविवार दि ८ मार्च या कालावधीत जुनी माळी गल्ली येथील श्री एकनाथ भवन येथे रात्री ८.३० ते १०.३० या कालावधीत संपन्न होणार आहे.   उत्पात समाजातील श्री मनोहर उर्फ छबू काका उत्पात, श्याम उत्पात, अनिल उत्पात, प्रसाद उत्पात ही मंडळी बैठकीच्या लावण्या सादर करणार आहे. गेली अनेक वर्षे श्री ज्ञानोबा उर्फ माऊली उत्पात या लावण्या सादर करीत असत. बुधवार दि ४ मार्च रोजी मोडनिंब येथील महिला कलावंत आपली कला सादर करणार आहेत. *लावणी म्हणजे मराठी शारदेच्या पायातील चाळ आहेत*  मराठी शाहिरांनी डफावर थाप मारून मर्दानी पोवाडे रचले गाईले तसेच त्यांनी उत्तमोत्तम लावण्यांच्या रचना ही केल्या. त्या मधे परशूराम,सगन भाऊ,होनाजी बाळा,राम जोशी,अनंत फंदी या सारख्या अनेकांनी पूर्वी शाहिरी केली ती आज देखील चालू आहे. उत्तर पेशवाई मधे शाहिरी लावण्या जास्त प्रमाणात गाईल्या जात असत.महाराष्ट्रात तर सर्वदूर...

सौ सुप्रिया बागल यांची भूजल सर्वेक्षण उपअभियंता पदी निवड.

Image
 सौ सुप्रिया बागल यांची भूजल सर्वेक्षण उप अभियंतापदी निवड, गादेगाव आणि पंढरपूर मधून शुभेच्छांचा वर्षाव. पंढरपूर (प्रतिनिधी)  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सौ.सुप्रिया राहुल बागल यांची उपअभियंता (यांत्रिकी) गट-अ (Class-1) या पदी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महाराष्ट्र शासन या विभागामध्ये निवड झाल्याने गादेगावकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गादेगावातील कष्टाळू शेतकरी श्री नारायण महादेव बागल उर्फ बंडू आण्णा यांच्या सुनबाई सौ सुप्रिया राहुल बागल राहणार गादेगाव यांची महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या खात्यामध्ये क्लास-१ अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन... श्री नारायण महादेव बागल यांचा मुलगा श्री राहुल नारायण बागल हेही महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी पदी सेवेत आहेत. पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा आणि सून महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी पदावर काम करणारे पहिलेच उदाहरण आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस गादेगाव आणि पंढरपूर येथील त्यांचे नातेवाईक व हितचिंतक यांनी...

लाइफ लाइन हॉस्पीटलकडून खाजगी वृत्तवाहिनीवर २५लाख रुपयांचा दावा.

Image
 *लाईफ लाईन हॉस्पिटल कडून*  *वृत्तवाहिनीवर 25 लाखांचा दावा दाखल* पंढरपूर शहर व तालुक्यात अल्पावधीतच रुग्णांना चांगली व योग्य सेवा देणाऱ्या गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची बदनामी तसेच हॉस्पिटलची प्रतिष्ठा मलीन करण्याच्या हेतूने चुकीचे व अपूर्ण माहिती घेऊन वृत्त प्रसिद्ध केलेल्या न्यूज इंडिया मराठी या वृत्त वाहिनीवर तसेच रिपोर्टर भारत शिंदे यांच्यावर एकत्रित २५ लाखाचा नुकसान भरपाई दावा सी.पी.सी.कलम १९ प्रमाणे नुकसान भरपाई आणि कायमस्वरूपी मनाई हुकुम यासाठी पंढरपूर न्यायालयात दाखल करण्यात आला असल्याची माहिती लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर संजय शिवाजीराव देशमुख यांनी दिली. लाईफलाईन हॉस्पिटल मध्ये रुग्णांना तेथील सर्व डॉक्टर योग्य प्रकारे सेवा व उपचार देण्याचे काम करतात मात्र तरीही हॉस्पिटलच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने व बदनामी आणि प्रतिष्ठा मलीन करण्याच्या दृष्ट हेतूने सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर बदनामी होईल अशा पद्धतीने व्हिडिओ वृत्त प्रसारित केल्याने हॉस्पिटलची प्रतिष्ठा मलिन झाली असून हॉस्पिटलचे डॉक्...

जे ई ई मेन्स परीक्षेत प्रा. परिचारक सरांच्या ब्रिलियंट करिअर क्लास चे दणदणीत यश, दोन विद्यार्थी गुणवत्तायादित.

Image
 .. JEE Mains २०२६ मध्ये प्रा. परिचारक सरांच्या ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूट चे दणदणीत यश कु. वैभवी पांडुरंग कोळी ९९.३० पर्सेटाईल मिळवून पंढरपूर प्रथम ! प्रा. परिचारक सरांच्या ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूट मधील विद्यार्थ्यांनी पटकावला शहरात प्रथम व द्वितीय क्रमांक . पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर : यशाची परंपरा जपणाऱ्या प्रा. व्हि. डि. परिचारक व प्रा. मंदार वि. परिचारक सरांच्या ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूटने JEE Mains २०२६ परिक्षेत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. प्रा. परिचारक सरांच्या विद्यार्थ्यांनी पंढरपूर शहरात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावत भव्य यश संपादन केले आहे. कु. वैभवी पांडुरंग कोळी हिने ९९.३० पर्सेटाईल मिळवत पंढरपूरात प्रथम क्रमांक पटकावला, तर कु. ईशान गणेश बाळेकर याने ९७.३१ पसेंटाईल मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला. या भरीव यशामुळे क्लासचे, पालकांचे तसेच पंढरपूर शहराचे नाव उज्ज्वल झाले आहे. या यशामागे विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध अभ्यास आणि प्रा. परिचारक सरांच्या ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूटवरील दृढ विश्वास हे प्रमुख घटक ठरले. विद्यार्थ्यांनी मनामध्ये को...

डॉ शीतल शहा यांच्या फस्ट क्राय या लहान मुलांच्या कपड्यांच्या दालनाचे उद्घाटन.

Image
 पंढरीत डॉ. शितल शहा यांच्या  फर्स्ट क्राय लहान मुलांच्या कपड्यांच्या दालनाचा शुभारंभ  रविवारी डॉ. शितल शहा कुटुंबीयांच्या हस्ते झाला शुभारंभ  पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर शहरात प्रसिद्ध बालरोग तज्ञ म्हणून प्रसिद्ध असणारे डॉ. शितल शहा यांनी लहान मुलांसाठी कपड्यांचे शोरूम उभे केले आहे. या दालनाचा शुभारंभ डॉ. शितल शहा पत्नी सौ. सुषमा शितल शहा यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी सुदीप शितल शहा आणि सांत्वना सुदीप शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. या शुभारंभ सोहळ्यास आ. समाधान आवताडे, अमर पाटील आणि प्रणव परिचारक यांच्यासह तालुक्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली होती.  पंढरपूर शहरात लहान मुलांची कपडे घ्यावयास गेल्यास,अनेक दुकाने पालथी घालावी लागतात. पंढरीतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.शितल शहा यांनी लहान मुलांच्या कपड्यांचे दालन उभारून  या मुलांच्या कपड्यांसाठी नागरिकांना सुविधा निर्माण करून दिली आहे. शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज समोरील विठ्ठल रुक्मिणी व्यापारी संकुलात हे शोरूम साकारण्यात आले आहे. जन्मलेल्या लहान बालकांपासून सुमारे २० वर्षापर्यंतच्या...

साहित्य परिषदेसारख्या निवडणुकात राजकारण आणू नये._योगेश सोमण.

Image
 साहित्य परिषदेसारख्या निवडणुकात राजकारण आणू नये,_योगेश सोमण,  पंढरपूर (प्रतिनिधी)_सुप्रसिद्ध लेखक, अभिनेते, दिग्दर्शक योगेश सोमण हे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उभे आहेत, साहित्य परिषदेच्या निवडणुकीत राजकारण आणू नये असे मत योगेश सोमण यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक योगेश सोमण आणि प्रा.मिलिंद जोशी यांच्यात अध्यक्ष पदासाठी सरळ लढत होणार आहे. प्रमुख कार्यवाह पदासाठी प्रकाशक  सुनीताराजे पवार आणि सुप्रसिद्ध निवेदिका स्वाती महाळंक यांच्यात लढत होणार आहे, कोषाध्यक्ष पदासाठी विनोद कुलकर्णी, विनायक आंबेकर, आणि प्रदीप निफाडकर यांच्यात लढत होणार आहे. योगेश सोमण हे आज पंढरपूर येथे आले असता त्यांच्याशी साधलेला संवाद, योगेश सोमण हे पुणे येथील असून महाविद्यालयी  पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धेतून साहित्य व रंगभूमी या क्षेत्रात आले आहेत, ते सध्या मुंबई विद्यापीठ अकॅडमी ऑफ आर्ट्स, या विभागात कार्यरत असून, पुणे येथे स्नेह ही नाट्यसंस्था गेल्या ३८वर्षांपासून चालवीत आहेत, त्यांनी ७६एकांकिका लिहिल्या आहेत, पाच चित्रपट कथा, ११नाटक...

शिवजयंती निमित्त बालचमुंचा कलाविष्कार.

Image
 शिवजयंती निमित्त पंढरीत बाल चमुंचा कलाविष्कार... प्रतिनिधी _ पंढरपूर:- कर्नल भोसले चौक शिवजन्मोत्सव समिती व नागेश भोसले मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.  छत्रपती शिवरायांच्या ३९६ व्या  जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ उद्यान,पंढरपूर येथे दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक/अध्यक्ष मा.  शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर,यांच्या प्रमुख उपस्थिती पंढरपूर चे तहसीलदार सचिन लंगोटे साहेब,पंढरपूर नगरपरिषद चे मुख्याधिकारी  महेश रोकडे , माजी उपनगराध्यक्ष  नागेश भोसले, प्रमुख मार्गदर्शक श्री किरण आप्पा भोसले,पंढरपूर शहर युवा सेना अध्यक्ष श्री विश्वजीत भोसले व जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष  पृथ्वीराज भोसले हे उपस्थित होते.     सदर स्पर्धा ही तीन गटात घेतली गेली असून यामध्ये  १ ली 2 रिव 3 री  ४ थी रंग भरण करणे. तसेच दिलेल्या विषयावर आपल्या कल्पकतेने  चित्र रेखाटने यामध्ये   ५ वी ते ७ वी हा गट होता. सदर स्पर्धेसाठी पंढरपूर श...

नवनीत जनरल स्टोअर्स चे मालक विद्याधर आष्टीकर यांचे निधन.

Image
 नवनीत जनरल स्टोअर्सचे मालक श्री. विद्याधर आष्टीकर यांचे निधन.... पंढरपूर... शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी तथा नवनीत जनरल स्टोअर्स चे मालक श्री. विद्याधर गौतमचंद आष्टीकर (रा. पंढरपूर) यांनी दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता प.पू.१०५ प्रज्ञामती माताजी यांच्या पवित्र सान्निध्यात यमसल्लेखना स्वीकारून शांतपणे देवाज्ञा प्राप्त केली. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच पंढरपूर परिसरात शोककळा पसरली असून व्यापारी, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. आष्टीकर यांनी व्यापारी क्षेत्रात प्रामाणिकपणा व सेवाभाव जपत अनेक वर्षे कार्य केले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावई व नातू असा परिवार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच सर्वांकडून प्रार्थना व्यक्त होत आहे.

जन आंदोलनापासून तुकड्या तुकड्यांच्या आंदोलनापर्यंत बदलता कामगार संघटनांचा चेहरा.

Image
 जनआंदोलनापासून तुकड्या-तुकड्यांच्या आंदोलनापर्यंतः बदलता कामगार संघटनांचा चेहरा. लेखकः कमल माडिशेट्टी १२ फेब्रुवारी रोजी केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने दिलेला "भारत बंद" हा देशव्यापी ठप्पपणा निर्माण करून संघटित कामगार शक्तीचे सामर्थ्य दाखविण्याचा प्रयत्न म्हणून मांडला गेला. परंतु प्रत्यक्षात या दिवसाने राष्ट्रीय पातळीवरील त्या प्रभावात किती घट झाली आहे, हेच उघड केले. संघटनांच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग झाल्याचा दावा केला असला, तरी अनेक राज्यांतील अहवालांनुसार बहुतेक शहरांमध्ये व्यापारी व्यवहार नियमित सुरू होते, अनेक ठिकाणी सार्वजनिक वाहतूक चालू होती आणि औद्योगिक क्षेत्रात फक्त विखुरलेले व्यत्यय दिसून आले. काही मोजक्या भागांव्यतिरिक्त जिथे संघटनांचे घनदाट राजकीय व संस्थात्मक जाळे आहे दैनंदिन जीवन नेहमीप्रमाणेच सुरू राहिले. ज्या औद्योगिक पट्ट्यांत बंद पाळल्याचे सांगितले गेले, तिथेही अनेक युनिट्स अंशतः उपस्थितीने सुरूच राहिल्या. "भारत बंद" या व्यापक घोषणांतील भव्यते आणि प्रत्यक्ष परिणामातील असमानता यामधील विसंगती स्पष्ट दिसून आली. ही स्थिती काहीतर...

कलासाधना पुरस्कार म्हणजे मातीतील आयुष्य सुगंधित करणारा सर्वोच्च पुरस्कार._विवेक घळसासी.

Image
 कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने देण्यात आलेला पुरस्कार म्हणजे आपल्या मातीतील आयुष्य सुगंधीत करणारा सर्वोच्च पुरस्कार ... विवेक घळसासी!  पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून, दक्षिण काशी म्हणून जसे प्रसिद्ध आहे, तसेच या पंढरीला कलेचा वारसा देखील दैदिप्यमान लाभलेला आहे.  अनेक शतकांची ही पुण्यभूमी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. तसेच अनेक दिग्गज कलाकार देखील या भूवैकुंठात जन्म घेतलेले आहेत. साहित्य, कला, संगीत व नाट्य या विविध क्षेत्रात अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कलासाधना जोपासली आहे. अशा कलाकारांना गेली १८ वर्ष हा पुरस्कार ही संस्था  देत असते.  कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने पंढरी कलारत्न व विशेष गुणवत्ता पुरस्काराचे वितरण कर्मयोगी सभागृह पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली, दाते पंचांगकर्ते श्री. मोहनजी दाते यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.        यावेळी संस्थेच्या वतीने पंढरी कलारत्न हा पुरस्कार यावर्षी पंढरीचे सुपुत्र व सध्या नागपूरस्थित     अस...

समाजातील लोकांकडून समाजाची सेवा करण्याचे काम भारत विकास परिषद करीत आहे, डॉ काणे हॉस्पिटल मध्ये दिव्यांग शिबिर उत्साहात संपन्न.

Image
 समाजातील लोकांकडून समाजाची सेवा करण्याचे कार्य भारत विकास परिषद करत आहे, पंढरपूर येथे डॉ काणे हॉस्पीटल मध्ये दिव्यांग शिबिर, उत्साहात संपन्न._प्रशांत परिचारक. पंढरपूर (प्रतिनिधी) समाजातील लोकांकडून समाजाची सेवा करण्याचे कार्य भारत विकास परिषद करीत आहे, सेवा, संस्कार,समर्पण अशा उदात्त भावनेतून केवळ लोकांचे कल्याण हाच एकमेव हेतू ध्यानात घेऊन पंढरपूर येथील भारत विकास परिषद शाखेने दिव्यांग शिबिराचे आयोजन केले आहे असे प्रतिपादन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले, शनिवार दि.१४फेब्रुवारी रोजी काणे यांच्या डॉ गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये भारत विकास परिषद शाखा पंढरपूर, दिव्यांग केंद्र पुणे,महाराष्ट्र नॅचरल गॅस, लि.पुणे, कै महादेवराव आवताडे प्रतिष्ठान, मंगळवेढा यांच्या सहकार्याने दिवसभर दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारत विकास परिषद शाखा पंढरपूर चे संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेन्द्र काणे, अध्यक्षा सौ स्मिता कोर्टीकर, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे  आमदार समाधान आवताडे, कासेगाव येथील विजय सिंह नाना देशमुख, सचिव मंदार केसक...

भारत विकास परिषद शाखा पंढरपूर यांच्या वतीने शनिवारी दिव्यांग शिबिराचे आयोजन.

Image
 भारत विकास परिषद शाखा पंढरपूर यांच्या वतीने शनिवारी मोफत दिव्यांग शिबिराचे आयोजन. पंढरपूर (प्रतिनिधी)भारत विकास परिषद शाखा पंढरपूर आणि दिव्यांग केंद्र पुणे यांच्या तर्फे तसेच महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड पुणे आणि कै. महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठान मंगळवेढा  यांच्या सहयोगाने मोफत दिव्यांग शिबिराचे आयोजन शनिवार दि.१४फेब्रुवारी रोजी सकाळी ९वा. नवीन कराड नाका येथील डॉ काणे यांचे गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पंढरपूर येथे होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन आ.समाधान आवताडे,माजी आमदार प्रशांत परिचारक, दिव्यांग केंद्र, पुणे चे विश्वस्त विनय खटावकर, आवताडे शुगर्स चे चेअरमन संजय आवताडे या प्रमुख मान्यवरांच्या  हस्ते करण्यात येणार आहे. भारत विकास परिषद शाखा पंढरपूर चे संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेन्द्र काणे, अध्यक्ष सौ स्मिता कोर्टीकर,  डॉ वर्षा काणे, सचिव मंदार केसकर, कोषाध्यक्ष सुनील परळीकर, सौ माधुरी जोशी, मिलिंद वाघ, राजेंद्र केसकर, डॉ अनिल पवार, अजित कुलकर्णी, आर डी देशपांडे, अमित शिरगावकर, सौ भाग्यश्री लिहिणे, डॉ मृणाल गांधी, सौ अनुराधा हरिदास, सौ मोनिका शहा, सौ रेखा टाक,...

कर्मयोगी पब्लिक स्कूलचे क्रीडा भारती स्पर्धेमध्ये घवघवीत यश.

Image
कर्मयोगी पब्लिक स्कूलचे क्रीडा भारती स्पर्धेमध्ये घवघवीत यश पंढरपूर (प्रतिनिधी)  रविवार दिनांक ८ फेब्रुवारी  रोजी क्रीडा भारती पंढरपूर तर्फे घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये कर्मयोगी पब्लिक स्कूल पंढरपूर च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. ही स्पर्धा एमआयटी विश्वशांती गुरुकुल वाखरी येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये सोलापूर पुणे दौंड मंगळवेढा सांगोला बार्शी येथील वीस शाळा सहभागी झाल्या होत्या. यामध्ये सुमारे एकूण ६०० स्पर्धक सहभागी झाले होते.  स्पर्धेचे प्रमुख पाहुणे एमआयटी गुरुकुल पंढरपूर चे प्रोजेक्ट डायरेक्टर कर्नल साहेब, प्राचार्य श्री शिवाजीराव गवळी उपस्थित होते.  तसेच प्रांत मंत्री ज्ञानेश्वर मॅकल, कर्मयोगी पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री सिबा नारायण दास, सोलापूर क्रीडा भारती जिल्हा मंत्री रवी ओहोळ व क्रीडा भारती पंढरपूर तालुका मंत्री दत्तात्रय शिरसट उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी सुरेख कवायत संचलन सादर केले व त्यानंतर वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धां पार पडल्या. यामध्ये कबड्डी, हॉलीबॉल, मैदानी बॅडमिंटन, बुद्धिबळ , तायक्वांदो,कराटे, ...

पंढरपूर ते पापरी बससेवा सुरू करण्याची करण्याची ग्रामस्थांची मागणी.

Image
 पंढरपूर ते पापरी बस सेवेची  ग्रामस्थांकडून मागणी पंढरपूर प्रतिनिधी              मोहोळ तालुक्यातील पापरी या गावातून पंढरपूरला ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात येजा सुरू असते यासाठी ग्रामस्थांनी बस सेवेची मागणी पंढरपूर आगर प्रमुखांकडे  केली आहे     गावातील शैक्षणिक कारणास्तव विद्यार्थी तसेच मोठ्या बाजारपेठेमुळे शेतकरी वर्ग व भाविक भक्त हे रोज पंढरपूरकडे ये जा करत असतात परंतु एसटीची गावातून सोय नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे प्रामुख्याने गावातील शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलींची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसते यासाठी गावातील तरुण वर्गाच्या प्रयत्नातून ग्रामपंचायतीच्या मागणी पत्रासह ग्रामस्थांच्या सह्यांचे पत्र पंढरपूर आगार प्रमुखांकडे बस सेवा सुरू करण्याबाबत दिले आहे लवकरच याबाबत निर्णय घेऊ असे यावेळी आगार प्रमुखांनी सांगितले यावेळी  छावा छात्रविर सेनेचे विजय कदम तसेच उद्योजक आशुतोष सुतार उपस्थित होते बस सेवा सुरू झाल्यास ग्रामस्थांचे व विद्यार्थ्यांची ये जा करण्यासाठी सुरक्षित सोय होणार आहे ...

कर्मयोगीतील "डिपेक्स २०२६"मधून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना., स्पर्धा उत्साहात संपन्न.

Image
 कर्मयोगीतील “डिपेक्स २०२६” मधून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना. सोलापूर विभागीय आयडिया प्रेझेंटेशन स्पर्धा उत्साहात संपन्न.  पंढरपूर (प्रतिनिधी) अ. भा. वि. प. तसेच सृजन ट्रस्ट व श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या डिपेक्स २०२६ ची आयडिया प्रेझेंटेशन सोलापूर विभाग स्तरीय स्पर्धा कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण विचारांना व्यासपीठ देणार्‍या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर  विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा उपस्थित होते. यावेळी प्र-कुलगुरू लक्ष्मीकांत दामा यांनी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डिपेक्ससारख्या उपक्रमातून देशाला भावी संशोधक तसेच उद्योगक मिळतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. केवळ प्रयत्न करून नाही तर प्रत्यक्ष कृती केल्यावरच यश मिळते असा यशाचा कानमंत्र त्यांनी य...

व्हि बी ग्राम जी योजना ग्रामीण भागातील लोकांसाठी आणि मजुरांसाठी अधिक पारदर्शक.

Image
 व्हि बी ग्राम जी योजना ग्रामीण भागातील जनता आणि मजुरांसाठी अधिक पारदर्शक, पंढरपूर (प्रतिनिधी) लोकांसाठी सार्वजनिक धोरणांचे मूल्यांकन भावना, राजकीय स्मृती किंवा प्रतीकात्मकतेवर न करता त्यातून निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष परिणामांच्या आधारे केले गेले पाहिजे. मनरेगाच्या जागी विकसित भारत रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण अधिनियम, 2025 (VB GRAM G) लागू झाल्यानंतर निर्माण झालेला विरोध अपेक्षितच होता. नव्या कायद्यावर टीका करणाऱ्यांचे म्हणणे आहे की यामुळे रोजगाराचा हक्क कमकुवत होतो, राज्यांवर अतिरिक्त आर्थिक जबाबदारी येते, सत्तेचे केंद्रीकरण वाढते आणि महात्मा गांधींचा वारसा पुसला जातो. परंतु ही टीका प्रत्यक्ष धोरणातील त्रुटींवर कमी आणि राजकीय भूमिकांवर अधिक आधारित आहे. VB GRAM G हक्काधिष्ठित व्यवस्थेचा अंत करतो, हा आरोप एका चुकीच्या समजुतीवर उभा आहे—की कायद्यातील हक्क आपोआपच नागरिकांचे सक्षमीकरण करतात. मनरेगाचा जवळपास वीस वर्षांचा अनुभव ही समजूत अपुरी असल्याचे दाखवतो. वेळेवर मजुरी न मिळणे, मागणी असूनही काम न मिळणे, निकृष्ट दर्जाची कामे आणि राज्यागणिक असमान अंमलबजावणी यामुळे हा तथाकथित “हक्क” प्...

यंदाचे डिपेक्स २०२६चे प्रायोजकत्व कर्मयोगी इन्स्टिट्यूटकडे.

Image
 *यंदाचे डिपेक्स २०२६ च्या कल्पना सादरीकरण राऊंडचे  प्रायोजकत्व  कर्मयोगी इन्स्टिट्यूटकडे.   राज्यस्तरीय कल्पना सादरीकरण स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना. पंढरपूर ( प्रतिनिधी)  श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या सामाजिक नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी डिपेक्स २०२६ चे कल्पना सादरीकरण स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले आहे. सदरची सोलापूर विभागस्तरीय स्पर्धा  ४ फेब्रुवारी २०२६ रोजी  कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,पंढरपूर येथे पार पडणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली  या स्पर्धेची संकल्पना "ग्रामीण विकासासाठी सामाजिक नवोपक्रम" अशी असून, ग्रामीण भारताच्या सक्षमीकरणासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.  सदरची स्पर्धा  "ग्रामीण भारताला सक्षम बनवणे, मुळांना नवोपक्रम देणे "या ब्रीदवाक्याखाली आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेत पदविका, पदवी व आयटीआयचे विद्यार्थी स...