संत विसोबा खेचर आय टी आय बार्शी येथे तंत्र परिषद उत्साहात संपन्न.


 संत विसोबा खेचर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बार्शी जिल्हा सोलापूर येथे संस्थास्तरीय तंत्र प्रदर्शन उत्साहात संपन्न.

पंढरपूर (प्रतिनिधी)

संत विसोबा खेचर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (आयटीआय) बार्शी येथे औद्योगिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी बुधवार दि २२ जानेवारी  रोजी संस्थास्तरीय तंत्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.


कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा, प्रशिक्षणार्थींचा तसेच शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


या तंत्र प्रदर्शनामध्ये विविध व्यवसाय शाखांतील प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या प्रात्यक्षिक मॉडेल्स, यांत्रिक उपकरणे, विद्युत सर्किट्स, वेल्डिंग नमुने, संगणक व आयटी संबंधित प्रकल्प, मोटार वाहन दुरुस्ती नमुने तसेच नवकल्पनांवर आधारित प्रकल्प सादर करण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांमधून त्यांची तांत्रिक समज, सर्जनशीलता व व्यावहारिक कौशल्ये स्पष्टपणे दिसून आली.


प्रदर्शनाचे उद्घाटन संस्था व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष तथा मारुती रोप्स प्रायव्हेट लिमिटेड बार्शी चे व्यवस्थापकीय संचालक मा.श्री मधुसूदन चांडक तसेच व्यवस्थापकीय संचालक बंडेवार ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड बार्शी तथा अध्यक्ष, संस्था व्यवस्थापन समिती औ.प्र.संस्था बार्शी मा.श्री अनिल बंडेवार, यांचे हस्ते करण्यात आले.


कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून झाली. 

प्रथम संस्थेतील गट निदेशक श्री. युवराज माढेकर यांनी सर्व मान्यवरांची ओळख करून दिली. त्यानंतर संस्थेचे प्राचार्य श्री प्रदीप हरिदास यांनी उपस्थित उद्योजक मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संस्थेबद्दल माहिती देताना त्यांनी सद्यस्थितीमध्ये चालू असलेले व्यवसाय, नव्याने चालू करावयाचे व्यवसाय, सद्यस्थितीमध्ये चालू असलेली विकास कामे याबद्दलची माहिती दिली.

त्यानंतर मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, “तंत्र प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे तर प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रात आवश्यक असलेली कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळते. अशा उपक्रमांमुळे आत्मविश्वास वाढून रोजगारक्षमतेतही भर पडते.”

सदर तंत्र प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये प्रदर्शित करण्याची संधी मिळाली असून, उद्योगाभिमुख शिक्षणाला चालना देणारा हा उपक्रम ठरल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली. 


प्रदर्शनासाठी बार्शी शहरातील 

श्री विश्वास घोडके, प्रोप्रायटर, भगवंत मेकॅनिकल अँड मशीनिंग वर्क, श्री सचिन जमदाडे, महालक्ष्मी ट्रेलर, श्री पांडुरंग पाठक, व्यवस्थापकीय संचालक, शांती अल्युमिनियम, बार्शी, श्री वेदांत देशपांडे, सहाय्यक व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बार्शी, श्री धनाजी दिघे, धनलक्ष्मी फॅब्रिकेशन बार्शी, श्री सुनील जाधव, आरुष पॉवर ट्रान्सफॉर्मर अँड इलेक्ट्रिकल वर्क्स, बार्शी, श्री पप्पू रगडे, प्रोप्रायटर, क्रिएटिव्ह अँड सक्सेस इलेक्ट्रिकल्स, श्री आकाश नाईक, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, बार्शी आगार, श्री समाधान विधाते, एम एस व्ही इलेक्ट्रिकल, बार्शी, शिवम सेल्स अँड सर्विसेस, श्री अरविंद वाघमारे, श्री विशाल भोसले, एनरकॉन सोलर, श्री सुरेश गळके, महाराष्ट्र विद्यालय बार्शी, श्री सुलतान शिकलगार, महाराष्ट्र विद्यालय, बार्शी, श्री शिरसट, श्रीराम प्लांट्स, बार्शी, श्री राज ढोले, वेंकटेश फिलामेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, बार्शी, श्री संतोष मोरे हे मान्यवर उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे सूत्र संचालन जेष्ठ शिल्प निदेशक श्री. बसवराज मोटे यांनी केले, तर आभार श्री. माणिक आडूरकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व गट निदेशक, निदेशक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

संपादक.

चैतन्य उत्पात.


Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.