पंढरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, तिसंगी येथे झालेल्या दरोड्यातील आरोपींना केले जेरबंद.
पंढरपुर शहर पोलिसांची घडाकेबाज कामगीरी" तिसंगी या गावी सोन्याच्या दुकाणामध्ये घडलेला जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस अणुन आरोपीस ताब्यात घेतले.
पंढरपूर(प्रतिनिधी )_पंढरपूर तालुक्यातील तिसंगी या गावात झालेल्या जबरी दरोड्यातील आरोपीला जेरबंद करून सोने, चांदी रोख एक लाख रुपये जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
तिरंगी येथे दी.
१२नोव्हेंबर २०२५रोजी हा दरोडा घालण्यात आला होता. फिर्यादीचे स्वतःचे तिसंगी ता पंढरपुर या गावी सोन्याचे दुकाण असुन तो दुकाणमध्ये झोपलेला असताना दुकाणाचे शटर तोडुन दुकाणामध्ये घुसुन चार अनोळखी इसमांनी दुकाणमधुन एकुण १) ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, २) ०२ किलो चांदीचे दागीने व ३) १,००,०००/- रू रोख रक्कम असे फिर्यादीस मारहान करून चोरून नेले आहे असा गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी ,.अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर,. सहा. पोलीस अधिक्षक, श्री प्रशांत डगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपुर विभाग, पंढरपुर यांचे सुचनेनुसार व पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, यांच्या मार्गदर्शनाखाली "गुन्हे प्रकटीकरण" शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची विशेष पथके नेमुन पंढरपुर शहर व परिसरातील तसेच घटनास्थळ निरीक्षण करून व त्यावर बारकाईने लक्ष ठेवले असता अशी गोपनिय माहिती मिळाली की, दोन ते तिन इसम हे गुन्हा घडण्याचे पुर्वी दोन ते तिन वेळा येवुन गेले आहेत. तेव्हा त्याबाबत गोपनिय माहिती काढुन त्यातील एक आरोपी हा सध्या त्याचे राहते घरी देवापुर पोस्ट म्हसवड ता माण ,जि सातारा येथे आहे अशी माहिती मिळताच सदर ठिकाणी सापळा रचुन विक्रम आनंदा बाबर (वय २१ वर्षे रा देवापुर पोस्ट म्हसवड ता माण ,जि सातारा) असे असल्याचे सांगीतले आहे. या आरोपीस ताब्यात घेतले असता त्याने त्याचे आणखी तिन साथीदार यांचे सह गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,. अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, सहा. पोलीस अधिक्षक, . प्रशांत डगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपुर विभाग पंढरपुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दशरथ वाघमोडे, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, प्रसाद औटी, पवार, कृष्णा पकाले, कपिल माने, शहाजी मंडले, बजरंग बिचुकले, दिपक नवले, हर्षद ठाकर यांनी केली आहे.

Comments
Post a Comment