भाजप आणि परिचारक गटाकडून माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, ॲड सुनील वाळूजकर आणि सौरभ थिटे यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड.


 परिचारक गटाकडून लक्ष्मण शिरसट, ॲड सुनील वाळूजकर आणि सौरभ थिटे यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड जाहीर,

 पंढरपूर (प्रतिनिधी)_पंढरपूर येथील नगरपालिका निवडणुक संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चांगलीच गाजली,

या निवडणुकीत जनतेने निराळाच कौल दिला, भाजप या पक्षाचे २४नगरसेवक निवडून दिले मात्र नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रणिता भालके यांना केले, यानंतर आता परिचारक गटाकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता निर्माण झाली होती.

पंढरपूर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे भारतीय जनता पक्षाचे व पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीच्या वतीने माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट, ॲड सुनील वाळुजकर, सौरभ काशिनाथ थिटे यांची निवड करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासनाधिकारी योगेश डोके यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले .यावेळी माजी नगराध्यक्ष सतीश  मुळे ,हरीश ताठे ,गटनेते भागवत बडवे, सुजित कुमार सर्वगोड, अमोल डोके, विश्वनाथ आळगे ओंकार वाळूजकर हे उपस्थित होते.

पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार हे परिचारक गटाचे निवडून आल्याने त्यांना तीन तर भालके यांना एक स्वीकृत नगरसेवक पद मिळणार आहे,

तीर्थक्षेत्र विकास आघाडी कडून मोठी स्पर्धा असून ॲड सत्यम धुमाळ, शाम गोगाव, नाना कदम, मोहम्मद उस्ताद, प्रशांत शिंदे यांची नावे चर्चेत आहेत.

पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक रविवार दि२डिसेंबर रोजी पार पडली होती व निकाल २१डिसेंबर रोजी तब्बल १९दिवसांनी लागला होता, यामुळे मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

आता परिचारक गटाकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून तीन जणांची वर्णी लागली असली तरीही भालके गटाकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून कोणाचे नाव पुढे येणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजप आणि परिचारक गटाची स्थिती 

गड आला पण सिंह गेला; 

अशी झाली होती.

भाजप चे २४नगरसेवक आले.

 अत्यंत चुरशीच्या आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या पंढरपूर नगरपालिकेचा निकाल आश्चर्यजनक लागला. डॉ प्रणिता भालके यांना नगराध्यक्षा पदी विजयी करण्यात आले आहे तर सर्वाधिक २४नगरसेवक भाजप व शहर विकास आघाडी चे निवडून आले होते.

 तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार डॉ. प्रणिता भालके ३६ वॉर्डच्या मतमोजणि नंतर ३४ हजार ९६० मते घेतली. तर भाजपच्या शामल शिरसट यांना २३ हजार ८२३ मते मिळाली. यामध्ये डॉ. प्रणिता भालके या १११३८ मताधिक्याने विजयी झाल्या होत्या .भालके यांचा विजय निश्चित होता. या निवडणुकीत भाजप व परिचारक गटाचे २४ नगरसेवक विजयी झाले. तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे ११ नगरसेवक विजयी झाले. तर एक अपक्ष ओंकार जोशी विजयी झाले. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शामल शिरसाट यांना पराभव पत्करावा लागला. यामुळे गड आला पण सिंह गेला अशी अवस्था परिचारक यांची झाली होती.

चौकट.

परिचारक यांचा पांडुरंग परिवार आणि भाजप यांनी स्वीकृत नगरसेवकपदी चपखल उमेदवारांची निवड केली आहे.

ॲड सुनील वाळूजकर हे माजी उप मुख्याधिकारी होते, त्यांना न पा प्रशासनाचा उत्तम अनुभव आहे, तर सौरभ थिटे यांना सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचा मोठा अनुभव आहे याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट हे तीस वर्षांपासून शहराच्या राजकारणात सक्रिय असल्याने कोणतीही अडचण येणार नाही, आता उपनगराध्यक्ष पदी कुणाची निवड परिचारक यांच्या पांडुरंग परिवार आणि भाजप कडून होईल याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.