सांगोला तालुक्यातील चिंचोली येथे तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त, ४०लाख ३१हजाराचा साठा सापडला.


 सांगोला भागात सी.एम. कृषी पर्यटन अॅग्रो रेसॉर्टवर छापा कारवाई तंबाखुजन्य पानमसाला, वाहने असा एकुण ४०लाख,३१, हजार रू.चा मुदद्देमाल जप्त"

प्रतिनिधी पंढरपूर _पंढरपूर येथील उप विभागीय पोलीस अधीक्षक 

 अतुल कुलकर्णी  यांनी अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे धोरण अवलंबले असून सांगोला तालुक्यातील चिंचोली येथे तंबाखूजन्य पदार्थांचा चाळीस लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.मौजे चिंचोली ता. सांगोला जि. सोलापूर येथे "सी. एम. कृषी पर्यटन अॅग्रो रेसॉट" मध्ये मोठया प्रमाणात तंबाखुजन्य पदार्थाचा साठा करून इतरत्र वाहतुक करत असल्याची बातमी मिळाल्याने त्यांनी सहा. पोलीस अधिक्षक  प्रशांत डगळे, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांना तपास पथक पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे तपास पथकातील पोसई  अब्दुलहमीद शेख,  निलेश रोंगे,  विनोद शिंदे, शिवशंकर हुलजंती व  राहुल लोंढे असे खाजगी वाहनाने बातमीच्या ठिकाणी रवाना झाले. त्याचप्रमाणे सांगोला पोलीस ठाणेकडील पोसई  पुजारी व पोलीस अंमलदार हे देखील घटनास्थळी पोहोचले. दोन्ही पथकाने संयुक्तपणे छापा कारवाई केली आहे.

"सी.एम.कृषी पर्यटन अॅग्रो रेसॉट" मधून पांढरे रंगाचा छोटा हत्ती क.एम.एच.४५/एएफ ६४०६ हा बाहेर पडत असताना व रेसॉर्टच्या पोर्चमध्ये बोलोरो पिकअप वाहन क.एम.एच.४५/एएक्स ०५३९ हा उभा असलेला दिसला. दोन्ही वाहनातील वाहन चालक व इतर लोक पोलीसांना पाहून अंधाराचा फायदा घेवून तेथून पळून गेले. तपास पथकातील पो. अधिकारी/अंमलदार यांनी रेसॉर्ट मधील उघडया असलेल्या हॉलमध्ये जावून पाहणी केली असता त्या ठिकाणी निळया पॉलीथीन बॅग, बारदाणे मध्ये सुगंधी तंबाखु पाकीटे, सुपर जेम तंबाखु पाकीटे, डायरेक्टर पान मसाला बॉक्स, एस.पी. ९९९, मिराज, विमल इ. पान मसाला किं. रू.१०,६४,२१२/- रू.चा माल मिळून आला.


छोटा हत्ती क.एम.एच.४५/एएफ ६४०६ यामध्ये आर.एम.डी.पान मसाला, विमल, एम सेंटेड तंबाखु गोल्ड कंपनीचा ९,५३,७६०/- रू.चा माल व बोलोरो पिकअप वाहन क.एम.एच.४५/एएक्स ०५३९ यामध्ये शॉट ९९९ तंबाखु, डायरेक्टर पान मसाला असा तंबाखुजन्य माल १०,६३,४४४/- रू.चा माल मिळून आला आहे. पोसई  पुजारी यांच्या ई साक्ष अॅपद्वारे  अब्दुलहमीद शेख व  पुजारी यांनी मिळून मालाची मोजदाद करून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. छोटा हत्ती व बोलेरो पिकअप किं. रू.९,५०,०००/- रू.ची वाहने व तंबाखुजन्य पदार्थ व पान मसाला असा एकुण ३०, लाख ८१, हजार ४१६/- रू.चे मालाचे बॅगा असा एकुण ४०, लाख ३१, हजार ४१६/- रू.चा माल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक  मंगळवार ९ रोजी पंचनामा झाल्यानंतर छापा कारवाईमध्ये मिळून आलेला तंबाखुजन्य माल व वाहने ताब्यात घेवून सांगोला पोलीस ठाणे येथे घेवून जाण्यात आली असून अन्न व औषध प्रशासनाकडील अधिकारी आल्यानंतर सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई होणार आहे.


सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,   अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर,  सहा. पोलीस अधिक्षक  प्रशांत डगळे, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधिक्षक  प्रशांत डगळे, यांचे तपास पथकातील  अब्दुलहमीद शेख, निलेश रोंगे, विनोद शिंदे,  शिवशंकर हुलजंती  राहुल लोंढे यांनी तसेच सांगोला पोलीस ठाणेकडील पोसई पुजारी व पोलीस अंमलदार यांनी मिळून संयुक्तपणे पार पाडलेली आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.