दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नाशिक येथील सुप्रसिद्ध कपिजी की रसोई, या हॉटेल रेस्टॉरंट चे उद्घाटन.
दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नाशिक येथील सुप्रसिद्ध कपिकुल हॉटेल रेस्टॉरंट चे उद्घाटन.
पंढरपूर(प्रतिनिधी )_प्रभू श्रीराम यांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या नाशिक येथील सुप्रसिद्ध कपिजी की रसोई, हे हॉटेल कम रेस्टॉरंट, कपिकुल शॉपी चे भव्य उद्घाटन दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बुधवार दि २२ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता श्री कपिकुल सिद्धपीठमचे पीठाधीश्वर श्री महंत सद्गुरू वेणाभारती यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख पाहुणे आ. समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, ह भ प मदन महाराज हरिदास, पांडुरंग कृ बडवे, मनोहर उर्फ छबुकाका उत्पात यांच्या हस्ते चौफाळा येथील राजनरेंद्र बडवे कॉम्प्लेक्स , इंदिरा गांधी भाजी मार्केट समोर येथे होणार आहे.
कपिकुल सिद्धपीठमचे साधक यांनी बनविलेले शुद्ध, सात्विक व आरोग्यदायी, चविष्ट पदार्थ या हॉटेल कम रसोई मध्ये उपलब्ध होणार आहेत अशी माहिती श्रीकृष्णमयी यांनी दिली. वेगळ्या चवीचा चहा,बनमस्का, ग्रील सँडविच,पावभाजी, मिल्कशेक कॉम्बो, नाशिक येथील सुप्रसिद्ध मिसळ, आमरस पुरी,वडापाव, सर्वरोग प्रतिकारक, उष्णता कमी करणारे आरोग्यदायी पेय सुवर्णरस, सीताकल्प प्रोटीन शेक,वडापाव, मस्तानी, फ्रुट पॅनकेक याबरोबरच जिम प्रेमी, व्यायामपटू, डाएट करणारे लोक यांच्यासाठी आरोग्यदायी पदार्थ बनविले जाणार आहेत.
योग व निसर्गोपचारतज्ञ कृष्णमयी यांच्या संकल्पनेतून साकार, कृष्णमयी क्रिएशन कपिकुल शॉपी, याचेही उद्घाटन करण्यात येणार आहे नॅचरोपथी,कुंडली कन्सल्टन्सी अशा वेगळ्या सेवा देण्यात येणार आहेत येथे स्वदेशी उत्पादने, सौदर्य प्रसाधने, कलात्मक वस्तू उपलब्ध होणार आहेत.
संपादक
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment