कॉरिडॉर हा मंदिर परिसरातील स्थानिक लोकांवर तिसरा आघात असून तो रद्द झाला नाही तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही._ ह भ प वडगावकर महाराज


 कॉरिडॉर हा मंदिर परिसरातील लोकांवर तिसरा आघात आहे, तो रद्द झाला नाही तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही,

_वडगावकर महाराज.

पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर येथील संभाव्य कॉरिडॉर करण्याआधी राज्यकर्त्यांनी मंदिर परिसरातील संभाव्य बाधितांशी चर्चा केली पाहिजे, या भागातील स्थानिक लोकांवर हा तिसरा आघात असून आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन 

तीर्थक्षेत्र बचाव कृती समिती आयोजित सभेत शिवतीर्थ येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष वडगावकर महाराज यांनी केले,

यावेळी व्यासपीठावर शंकर महाराज गलगलकर, अध्यक्ष वडगावकर महाराज, कृती समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर, डॉ प्राजक्ता बेणारे, व्यंकटेश गलगलकर, अँड आशुतोष बडवे, रामकृष्ण महाराज वीर, अरविंद बेनारे , आदित्य फत्तेपूरकर, शिरवळकर महाराज, आदी मान्यवर उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले अगोदर मास्टर प्लॅन केला, त्यानंतर टेंपल ऍक्ट आणून बडवे उत्पात, सेवाधारी यांची देवळातील सेवा काढून घेतली मंदिराचे सरकारी करण केले आणि आता घरेदारे उध्वस्त करण्यात येत आहेत. आणि अजून पुढे भविष्यात प्राधिकरणाचा धोका आहे, कॉरिडॉर चे पाच टप्पे असून मंदिर परिसरातील स्थानिक लोक उध्वस्त होणार आहेत, पंढरीचे सगळे अर्थकारण बिघडणार आहे,

दरवर्षी आषाढी वारी साठी कोट्यवधी रुपयांचा निधी येतो तो जातो कोठे असा संतप्त सवाल उपस्थित केला,

ते म्हणाले पुर्वी कुळकायदा

आणून ब्राम्हणांच्या हजारो एकर जमिनी हडप केल्या, माझी स्वतः ची तीन हजार एकर जमीन गेली आहे.

हा अन्यायकारी कॉरिडॉर भाविकांसाठी नाही, तर व्यावसायिक फायद्यासाठी केला जात आहे तो हाणून पाडला पाहिजे यासाठी एकजूट आवश्यक असून एकत्रित लढा दिला पाहिजे.

यावेळी बाबाराव महाजन म्हणाले, हे आजचे संकट पहिले नाही, याआधी मास्टर प्लॅन विरोधात आम्ही भूमिका घेतली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी खरे योग्य काम केले डिपी प्लॅन चा निधी वळवून त्यांनी नदीपलीकडे ६५एकर भक्ती सागर उभा केला. सुमित शिंदे म्हणाले, प्रमुख रस्ते मोठे करा घरे दुकाने पाडून विकास होणार नाही. वैभव बडवे, आशिष राजहंस, अनिल जुमाळे यांनी आपल्या भाषणातून तीव्र निषेध व्यक्त केला, सौ सुलभा वट्टमवार म्हणाल्या ही सततची टांगती तलवार आहे, कॉरिडॉर चा पैसा आम्हाला नको, इथे कुणाकडे पैसे नाहीत,सोन्यासारखी जागा गेल्यावर पैसे काय करायचे 

आहेत, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील सकारात्मक ऊर्जा दुसरीकडे मिळणार आहे काय, देवाभाऊ यांनी कॉरिडॉर रद्द करून लाडक्या बहिणीसाठी या दिवाळीत ही भाऊबीज सणांची भेट देण्यात यावी, अँड विनायक उंडाळे यांनी अनेक तांत्रिक त्रुटी दाखवून हा कॉरिडॉर पूर्ण घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट केले.

श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज डॉ महेश महाराज देहूकर यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणांचा निषेध तीव्र शब्दात व्यक्त केला.व्यंकटेश गलगलकर यांनी समर्पक भाषेत चुकीच्या धोरणांचा उल्लेख केला,

आदित्य फत्तेपूरकर म्हणाले अनेकाना कॉरिडॉर मुळे अटॅक येत आहेत पुण्यातील लक्ष्मी रोड येथे श्री गणेश उत्सवात दहा दिवस पाय ठेवण्यासाठी जागा नसते मग तिथे कॉरिडॉर का होत नाही,

माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथील कॉरिडॉर रद्द करायला लावला,

फोटोग्राफर बशीर शेख यांनी देखील सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करत तीव्र टीका केली.

बालाजी महाजन बडवे यांना मनोगत व्यक्त करताना अश्रू अनावर झाले ते म्हणाले कुणाचेच घर जाऊ नये. यावेळी त्यांनी कृती समिती ला पाच हजार रुपये देणगी दिली.

रामकृष्ण महाराज वीर म्हणाले, आम्ही कायमच कॉरिडॉर च्या विरोधात भूमिका घेत आहोत वारकरी संप्रदाय वर अविश्वास दाखवू नये, काळजी करु नका राज्यसभा खासदार डॉ सुब्रमण्यम स्वामी आपल्या सोबत आहेत.

तीर्थक्षेत्र बचाव कृती समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर म्हणाले, बालिश बुद्धीचे राज्यकर्ते प्रत्येक तीर्थक्षेत्राला एकाच तराजूत तोलत आहेत. आम्ही शासनाला शहरातील अनेक मोकळ्या जागा दाखविल्या आहेत २००एकर जागा विना वापर पडून आहेत, मंदिर परिसरातील भाविक सुरक्षित नाहीत, मंदिर सुरक्षित नाही. अन्यायकारी कॉरिडॉर एकजुटीने रद्द केला पाहिजे,

कार्यक्रमाचे सुरुवातीला भागवत कथाकार विजयराव बडवे, यांनी श्री विठ्ठलाचे आशीर्वाद, तर महेश आचार्य उत्पात यांनी श्री रुक्मिणी मातेचे आशीर्वाद तर श्री पांडुरंगाचे मंत्र यांनी म्हणून अरविंद  बे णारे यांनी सेवाधारांच्यावतीने आशीर्वाद दिले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्राजक्ता बेणारे यांनी केले.

वैभव बडवे यांनी आभार मानले.

सलग तीन तास सुरू असलेल्या या कॉरिडॉर विरोधी सभेस हजारो लोक उपस्थित होते.

संपादक.

चैतन्य उत्पात.


Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे अपघात, टिपर धडकेत बापलेक जागीच ठार

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.