मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त आ. अभिजीत पाटील यांची उपस्थिती.


 कोर्टी येथे मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त आमदार अभिजीत पाटील यांची उपस्थिती


(पंढरपूर तालुक्यात आमदार पाटील यांची कार्यक्रमाला उपस्थित राहून जिल्हा परिषद,पंचायत समितीसाठी साखर पेरणी सुरू)

पंढरपूर 

(प्रतिनिधी)'

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील हे पंढरपूर तालुक्यातील कार्यक्रमानिमित्त गावांमध्ये हजेरी लावत असल्याने येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक मध्ये साखर पेरणी सुरू असल्याची कुजबूज पंढरपूर तालुक्यामध्ये होताना दिसत आहे.

माढा विधानसभा मतदारसंघात आमदार अभिजीत पाटील यांनी तीस वर्षाची सत्ता उलथून विजयाचा झेंडा रोवला असताना पंढरपूर तालुक्यात देखील आमदार अभिजीत पाटील हे विविध कार्यक्रमाला उपस्थित असतात. कोर्टी येथे मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त जुलूस यात्रेत आमदार अभिजीत पाटील यांनी उपस्थित राहून ईद-ए-मिलाद उन-नबी या पवित्र सणा सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, सुधीर भोसले, विठ्ठल कारखान्याचे संचालक बाळासाहेब हाके, गुलाब मुलाणी, सरपंच राजू पवार, पोपट हाके, बबलू शेख, ॲड. दत्तात्रय येडगे, शरीफ शेख, मोसिन मुलाणी, अभिजीत हाके, अफजल शेख, रहीम मुलाणी, रघुनाथ पवार,फंटू शेख, विजय वाघमारे, अहमद मुलाणी, मुन्ना शेख, बशीर मुलाणी, सादिक मुलाणी, वसीम मुलाणी, राजू मुलाणी यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.