सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?
*सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?* आज १ आँगस्ट लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी ज्यांनी इंग्रज सरकार वर दैनिक केसरी मधून वरील लेख लिहून टिकेची झोड उठवली होती.आज देखील तीच परिस्थिती उद्भवली आहे.लोकमान्यांनी लिहिलेल्या लेखाचा मथळा होता "राज्य चालविणे म्हणजे सूड उगवणे नव्हे" त्याच धर्तीवर" विकास करणे म्हणजे घरं दारे पाडून शहर भकास करणे नव्हे " असे म्हणावे लागेल आज काल काँरीडाँर, विकास आराखडा, मास्टर प्लॅन व डीपी च्या धसक्यामुळे पंढरपूरातील मंदिर परिसरातील नागरीकांची झोप उडाली आहे.मंदिर परीसरात राहणारी जनता वारंवार येणाऱ्या संकटामुळे सतत अस्वस्थ झाली आहे.१९७३ चा पंढरपूर देवस्थान कायदा हा मंदिर परिसरातील बडवे उत्पात सेवाधारी यांचे परंपरागत हक्क नष्ट करणारा कायदा आला.या कायद्यातील तरतुदी नुसार कोणतीही नुकसानभरपाई न देता मंदिरांव...