सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश विनय उत्पात यांची पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ तक्रार निवारण समितीवर अध्यक्षपदी निवड.


 विनय उत्पात यांची पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ तक्रार निवारण समितीवर अध्यक्षपदी निवड.

 पंढरपूर(प्रतिनिधी)_सेवानिवृत्त माजी जिल्हा न्यायाधीश विनय पांडुरंग उत्पात यांची पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ 

तक्रार निवारण समितीवर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

प्रभारी कुलसचिव प्रा डॉ ज्योती भाकरे यांनी माजी जिल्हा न्यायाधीश विनय पांडुरंग उत्पात यांना लेखी पत्र देऊन नियुक्ती करण्यात आले असल्याचे सांगितले आहे.

श्री विनय उत्पात हे मूळचे पंढरपूरकर असून सध्या पुणे येथे वास्तव्यास आहेत.

१९८३साली त्यांनी एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होऊन न्यायाधीश झाले.

त्यांनी परांडा, कोल्हापूर, इचलकरंजी,अहिल्यानगर,उमरगा, सातारा , नांदेड याठिकाणी सेवा मी,

निवृत्त झाल्यानंतर ग्राहक पंचायत समिती चे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.

त्यांच्या निवडीनंतर पंढरपूर येथील उत्पात समाजातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

विनय उत्पात यांची थोरली मुलगी अवनी या लातूर येथे 

न्यायाधीश असून आत्मजा आणि अनुजा या दोन्ही मुली सी ए असून पुणे येथे 

प्रॅक्टिस करत आहेत.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.