महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना केले अभिवादन.


 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे अभिवादन


*महिलांसाठी डिजीटल स्री शक्ती व्याख्यानाचे आयोजन*


मुंबई (प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर यांनी आज आयोग कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सावित्रीबाई फुले जयंतीच्या औचित्याने आज आयोग कार्यालयात डिजीटल स्री शक्ती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.


आयोगाच्या सदस्या अँड गौरी छाब्रीया, सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे, विमा संचलनालयाचे सहायक विमा संचालक श्री स्वप्निल खुराटे या मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास राज्य महिला आय़ोग तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ, म्हाडा कार्यालय, विमा संचलनालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


महिलांना सायबर साक्षर आणि सुरक्षित करणार्या डिजीटल स्त्री शक्ती व्याख्यानात रिस्पाँन्सिबल नेटिझम संस्थेच्या संस्थापक श्रीमती सोनाली पाटणकर यांनी मार्गदर्शन केले. मोबाईल, इंटनेट रोजच्या जगण्याचा भाग झाला असताना आता सेक्सटाँर्शन, डिजीटल अरेस्ट, आँनलाईन लैंगिक छळ, सायबर ग्रुमिंग अशा प्रकारच्या गुन्ह्यातून महिलांची, कुटुंबांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. सायबर जगातील फसवणूकीचे हे प्रकार, त्यास बळी पडू नये म्हणून घ्यावयाची काळजी तसेच प्रसंगी फसवणूक झालीच तर त्याबाबत संबंधित यंत्रणांना कळवणे, मदत उपलब्ध होणे या दृष्टीने या व्याख्यानात श्रीमती पाटणकर यांनी मार्गदर्शन केले. सायबर फसवणूक झाल्यास न घाबरता, समाज भिती न बाळगता सायबर हेल्पलाईन १९३० किंवा cybercrime.gov.in  वर संपर्क साधून मदत मिळवता येते याबाबत ही मार्गदर्शन केले.


आयोगाच्या सदस्य अँड गौरी छाब्रीया आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, महिलांनी त्यांच्यासाठी असलेल्या विविध कायद्यांची माहिती करुन घेतली पाहिजे. बदलत्या तंत्रज्ञानाला घाबरुन न जाता ते शिकून नव्या संधींचा शोध घ्यायला हवा.


सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या, आर्थिक सक्षम असणार्या महिलांनी डिजीटल साक्षर ही व्हायला हवे. इंटरनेट हे जगाशी जोडणारे साधन असून त्याचा सुरक्षित वापर करण्याबाबत जागरुक असले पाहिजे. या क्षेत्रात फसवणूक झालीच तर मानसिक ताण तणावांना सजगपणे सामोरे जायला शिकावे लागेल.


यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्राविषयी माहिती देत कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयोगाचे समुपदेशक तथा प्रकल्प अधिकारी श्री लक्ष्मण मानकर यांनी केले.  

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments