Posts

Showing posts from January, 2025

पंढरपूर व मंगळवेढा न्यायालय परीसरात लॉयर्स हॉल साठी २कोटी ७०लाख निधी मंजूर.

Image
 पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका न्यायालयाच्या आवारात लॉयर्स हॉल साठी २ कोटी ७० लाख निधी मंजूर  आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना यश  पंढरपूर /प्रतिनिधी  पंढरपूर तालुका न्यायालयाच्या आवारात लॉयर्स हॉल उभारण्यासाठी १३४.७५ लाख रुपये निधीची याचबरोबर मंगळवेढा तालुका न्यायालयाच्या आवारात लॉयर्स हॉल बांधण्यासाठी १३५.९९ लाख रुपये निधीच्या तरतुदीस शासन निर्णयाद्वारे शासकीय मान्यता देण्यात आली आहे.   पंढरपूर आणि मंगळवेढा येथील वकील मंडळींनी अधिवक्ता संघाच्या वतीने लॉयर्स हॉल उभारण्यात यावे अशी मागणी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्याकडे केली होती. मतदार संघातील पंढरपूर, मंगळवेढा या दोन्हीही तालुक्यात लॉयर्स हॉल उभारण्यात यावे.यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी शासन दरबारी सतत पाठपुरावा करून निधी मंजूर केला आहे.  पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका न्यायालयाच्या आवारात लायर्स हॉल बांधण्याचा प्रस्ताव मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी शासनास सादर केला होता. सदर प्रस्ताव प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी *राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यम...

पंढरपूर येथे डॉ अनिल जोशी लिखित दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न.

Image
 पंढरीत डॉ अनिल जोशी लिखित दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न. पंढरपूर (प्रतिनिधी)_ पंढरपूर येथील सेवानिवृत्त न पा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल जोशी यांच्या 'इच्छामरण' या संकल्पनेचा घेतलेला आगळावेगळा वेध या विषयावरील "शेवटचा दिस गोड व्हावा" या नूतन पुस्तकाचा व शवागरातील एक वेगळ्या विश्वाचा परिचय देणाऱ्या "(अ) पार्थिव" या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा दिमाखदार प्रकाशन समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक व संपादक  भानू काळे हे होते तसेच पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रसन्न दाभोलकर व ज्येष्ठ अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. शिरीष प्रयाग या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या सत्कारानंतर पुस्तकाचे लेखक डॉ. अनिल जोशी यांनी "इच्छामरण" या एका वेगळ्या संकल्पनेवरच पुस्तक लेखन का करावे वाटले तसेच मरण या शाश्वत सत्याबाबत अनेकांच्या मनात असलेली भीती, रुग्णालयात मृत्युशय्येवर शेवटच्या घटका मोजत काही कठोर निर्णय घेत असताना रुग्णासोबतच नातेवाईकांची होणारी एकूणच संभ्रमावस्था, मानसिकता यासाठी वैद्यक क्षेत्राबरोबरच तेव...

पंढरपूर येथे डॉ अनिल जोशी लिखित दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न.

Image
 पंढरीत डॉ अनिल जोशी लिखित दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न. पंढरपूर (प्रतिनिधी)_ पंढरपूर येथील सेवानिवृत्त न पा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल जोशी यांच्या 'इच्छामरण' या संकल्पनेचा घेतलेला आगळावेगळा वेध या विषयावरील "शेवटचा दिस गोड व्हावा" या नूतन पुस्तकाचा व शवागरातील एक वेगळ्या विश्वाचा परिचय देणाऱ्या "(अ) पार्थिव" या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा दिमाखदार प्रकाशन समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक व संपादक  भानू काळे हे होते तसेच पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रसन्न दाभोलकर व ज्येष्ठ अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. शिरीष प्रयाग या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या सत्कारानंतर पुस्तकाचे लेखक डॉ. अनिल जोशी यांनी "इच्छामरण" या एका वेगळ्या संकल्पनेवरच पुस्तक लेखन का करावे वाटले तसेच मरण या शाश्वत सत्याबाबत अनेकांच्या मनात असलेली भीती, रुग्णालयात मृत्युशय्येवर शेवटच्या घटका मोजत काही कठोर निर्णय घेत असताना रुग्णासोबतच नातेवाईकांची होणारी एकूणच संभ्रमावस्था, मानसिकता यासाठी वैद्यक क्षेत्राबरोबरच तेव...

अहिल्या पुलास नवीन समांतर पूल होणार._आ. समधान आवताडे.

Image
 *अहिल्या पुलास समांतर नवीन पूल होणार :आ. समाधान आवताडे* *केंद्रीय सडक मंत्री नितीन गडकरी यांनी ७७ कोटींचा निधी मंजूर केला.* पंढरपूर  पंढरपूर आणि टेम्भूर्णी मार्गावर भीमा नदीवर आणखी एक पूल होणार असून येथील अहिल्या पुलास समांतर अशा नवीन पुलासाठी केंद्रीय सडक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ७७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली. या पुलासाठी आ. आवताडे यांनी ना. गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.  पंढरपूर शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या दरदिवशी वाढत आहे, मात्र भीमा नदीवर पंढरपूर जवळ सध्या एकच नवीन पूल आहे, आणि टेम्भूर्णी मार्गावर असलेला अहिल्या पूल ४५ वर्षे जुना आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरतो आहे. दरवर्षी भीमा नदीला पूर आला कि हा पूल पाण्याखाली जातो आणि वाहतूक ठप्प होते. शिवाय अहिल्या पूल जुना असल्याने त्यावरून वाहतूक करणे धोकादायक ठरते आहे. आजवर अनेक वाहने या पुलावरून भीमा नदीमध्ये पडलेली आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्या पुलाजवळ आणखी एका समांतर पुलाची गरज होती. आणि आ. समाधान आवताडे यांनी या पुलाची मागणी केली होत...

कार्तिकी यात्रेप्रमाणेच माघी वारीचे नियोजन करण्यात येणार.

Image
 कार्तिकी यात्रेप्रमाणे माघ वारीचे नियोजन                                                                  गहिनीनाथ महाराज औसेकर,   स्थानिकांसाठी दर्शन व्यवस्था,  श्रींच्या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी, पंढरपूर(प्रतिनिधी )- दि.२ ते १२फेब्रुवारी दरम्यान माघ वारी संपन्न होत असून, दि.८ फेब्रुवारी रोजी यात्रेचा मुख्य विषय आहे. या यात्रेला येणा-या भाविकांना कार्तिकी यात्रेप्रमाणे सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच माघ शुध्द ५ म्हणजे दि.२ फेब्रुवारी रोजी परंपरेनुसार श्रींचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच  स्थानिक नागरिकांच्या दर्शन व्यवस्थेमध्ये वेळ वाढविण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. माघवारी पुर्व नियोजनाबाबत आज श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास, पंढरपूर येथे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखा...

एम आय डी सी मध्ये जागा घेऊन व्यवसाय न करणाऱ्या लोकांच्या जागा परत घ्या_आ.समाधान आवताडे.

Image
 एमआयडीसी बैठक मंगळवेढा एमआयडीसीत जागा घेऊन व्यवसाय सुरू न करणाऱ्यांच्या जागा परत घ्या आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. पंढरपूर  प्रतिनिधी मंगळवेढा शहरालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये अनेक लोकांनी व्यवसायासाठी जागे घेतले आहेत मात्र त्या जागेवर व्यवसाय सुरू न करता शेड मारून फक्त जागा गुंतवून ठेवल्या आहेत अशा लोकांना नोटीसा काढून त्या जागा परत घ्या,व तात्काळ व्यवसाय करणाऱ्यांना जागा उपलब्ध करून द्या अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या ते मंगळवेढा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या अधिकाऱ्यांच्या व व्यावसायिकांच्या बैठकीत बोलत होते यावेळी व्यासपीठावर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अजित जगताप,भाजपचे जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, सुरेश भाकरे, तानाजी काकडे प्रकाश आप्पा गायकवाड औदुंबर वाडदेकर यांचे सह एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना ते म्हणाले की एकूण 94 हेक्टर जागा ही एमआयडीसीसाठी आरक्षित आहे त्यामधील 40 हेक्टर जागेवर सोलर कंपनी असून उर्वरित जागा या व्यवसायासाठी अनेक व्यावसायिकां...

आढीव येथे पंच कल्याणक महामहोत्सवाचे आयोजन.

Image
 *आढीव् येथे  पंच कल्याणक महामहोत्सवचे आयोजन.* पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील आढीव या गावात डॉ शितल शहा यांचे फार्महाऊस, तपोवन येथे पंचकल्याणक महामहोत्सव चे भव्य आयोजन दि शनिवारी  १ फेब्रुवारी ते बुधवार दि.५फेब्रुवारी या कालावधीत कऱण्यात आले आहे अशी माहिती आयोजक सुप्रसिध्द बालरोग तज्ज्ञ डॉ शितल शहा यांनी दिली. या धार्मिक कार्यक्रमास पंढरपूर पंचक्रोशितील एक ते दीड हजार भक्त श्रवण करण्यासाठीं उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात मुनींचे प्रवचन, स्वाध्याय, पुजा व सांस्कृतिक व विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम होणार आहेत.या कार्यक्रमास परिसरातील लोकांनी आवर्जून उपस्थित राहून श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ शितल शहा यांनी केले संपादक. चैतन्य उत्पात.

खा. प्रणिती शिंदे यांनी दिली डॉ शीतल शहा यांच्या नवजीवन बाल रुग्णालयात भेट.

Image
 खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली डॉ शीतल शहा यांच्या रुग्णालयास भेट. पंढरपूर (प्रतिनिधी)सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर येथे बालकांचे देवदूत अशी ओळख असलेल्या डॉ शीतल शहा यांच्या नवजीवन बाल रुग्णालयास भेट दिली. यावेळी खा. प्रणिती शिंदे यांनी डॉ शीतल शहा यांच्या शी बालकांचे विविध आजार,त्याची कारणे, भारतात तसेच महाराष्ट्र राज्यात होणारे आजार, त्याचे लहान मुलांवर होणारे दुष्परिणाम, हे रोग होऊ नये यासाठी आवश्यक काळजी, यावर चर्चा केली. तसेच नवजीवन बाल रुग्णालयात देण्यात येणाऱ्या विविध सोयी, बालकांसाठी सुसज्ज असे आय सी यू , ईतर विशेष उपचार पद्धती, प्रॅक्टिस मधील विविध रोचक घटना,अनुभव  भारतीय रुग्णसेवेचा बदलते स्वरूप,आव्हाने  उपचार पद्धती मधील बदल  यावर सखोल चर्चा केली. खा शिंदे यांनी आपल्या मतदारसंघात  आरोग्य विषयी विविध योजना,अत्याधुनिक तंत्रज्ञान आणणार असल्याचे संकेत दिले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पंढरपूर येथील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ शीतल शहा यांनी सुरुवातीला प्रणिती शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले...

नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा भाजप च्या वतीने सत्कार.

Image
 नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा भाजप च्या वतीने सत्कार.  पंढरपूर (प्रतिनिधी)_सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री जयकुमार गोरे  यांचा सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाले बद्दल सत्कार केला. या प्रसंगी  माजी आमदार प्रशांत परिचारक, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ.प्राजक्ता बेणारे,  जिल्हा उपाध्यक्ष सौ.अंजना जाधव,भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष डॉ.ज्योती शेटे,भाजप उपाध्यक्ष शहर सौ.सुवर्णा कुरणावळ भाजप शहर सरचिटणीस भाग्यश्री काकडे, भाजप शहर सरचिटणीस सौ शिल्पा म्हमाने व इतर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री गोरे यांनी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील वाऱ्या तसेच वारकरी संप्रदायात असलेले अध्यात्मिक महत्व याविषयी अधिक माहिती घेतली. डॉ प्राजक्ता बेणारे यांनी पालकमंत्री गोरे यांना संत साहित्याचे अभ्यासक डॉ गोपाळ बेणा रे लिखित  लेखमाला, पुस्तके यावेळी त्यांना भेट देण्यात आली. संपादक. चैतन्य उत्पात.

युवकाचे जबरदस्तीने अपहरण करणाऱ्या आरोपींना केवळ चार तासात केले जेरबंद.

Image
 युवकाचे जबरदस्तीने अपहरण करणाऱ्या आरोपींना केवळ चार तासात केले जेरबंद, तालुका पोलिसांची कारवाई.  पंढरपूर (प्रतिनिधी)_ पंढरपूर तालुक्यातील देगाव  येथील रोहित वायदंडे याला जबरदस्तीने स्विफ्ट कार मध्ये बसवून अपहरण केलेल्या आरोपी आबा कसबे बबलू देठे याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल दोन्ही आरोपींना पंढरपूर तालुका पोलिसांनी केवळ चार तासात जेरबंद केले आहे. तालुका पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी तत्पर  हालचाल करत आरोपींना पकडले.  यातील आरोपी हे खेड शिवापुर जिल्हा पुणे येथील वीट भट्टी चालक असून फिर्यादीचा मुलगा हा वीट भट्टी वरती कामाला होता त्याने आरोपी कसबे याच्याकडून पाच ते सहा लाख रुपये उचल घेतली होती आणि काम सोडून निघून आला होता. त्यानंतर त्याला आरोपी आणि वारंवार फोन करून कामासाठी व पैशासाठी तगादा लावल्यानंतर त्याने जाण्यास नकार दिल्यानंतर आरोपी यांनी फिर्यादीस गाडीमध्ये घालून जबरदस्तीने घेऊन जाताना तिने तिच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर पुढे कोणतेही अप्रिय घटना होऊ नये म्हणून तात्काळ स्वतः आरोपींच्या गाडीचा शोध घेऊन कळ्या रंगाची स्विफ्ट कार एम एच...

पंढरपूर येथील गोविंद सबनीस (बंडू काका) यांनी पक्षीमित्र जीवनगौरव पुरस्कार.

Image
 . पंढरपूर येथील  गोविंद सबनीस यांना पक्षीमित्र जीवनगौरव; पक्षी साहित्य पुरस्काराची घोषणा.   पंढरपूर (प्रतिनिधी)_ गेली चार दशके महाराष्ट्रात पक्षीविषयक कार्य करणारी संस्था 'महाराष्ट्र पक्षिमित्र' तर्फे देण्यात येणाऱ्या २०२४च्या पक्षिमित्र पुरस्कारांची घोषणा झाली असून यंदाचा पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार पंढरपूरचे गोविंद सबनीस यांना जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र पक्षीमित्रच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. इतर पुरस्कारांपैकी पक्षी संवर्धन व सुश्रूषा पुरस्कार कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील फिरोज चाऊस यांना, तर पक्षी जनजागृती पुरस्कार वर्ध्याचे राहुल वकारे यांना जाहीर झाला. पक्षी संशोधन पुरस्कार या गटात योग्य प्रस्ताव प्राप्त न झाल्याने यंदा जाहीर करण्यात आला नाही. यावर्षीपासून नव्याने पक्षीविषयक साहित्य पुरस्काराची घोषणासुद्धा यावेळी करण्यात आली. यावर्षीचा पहिला पक्षी साहित्य पुरस्कार परभणी येथील माणिक पुरी यांना जाहीर झाला. पक्षीसंबंधित विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे २०१९पासून या पुरस्कारांची सुर...

स्वेरीत राष्ट्रीय युवा दीन साजरा.

Image
 स्वेरीत ‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांना केले विद्यार्थ्यांनी अभिवादन पंढरपूर-(प्रतिनिधी )गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस) च्या एम.बी.ए विभागाच्या वतीने ‘इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल’ अंतर्गत ‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा करण्यात आला तसेच स्वामी विवेकानंद यांची १६१ वी जयंती व राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची ४२६ वी जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी बहुमोल विचार मांडले.      १९८४ मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारने १२ जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून घोषित केला होता. तेंव्हापासून देशभरात दरवर्षी हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिवस’ म्हणून साजरा होऊ लागला. हा दिवस संपूर्ण भारतात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मिरवणूक, भाषण, संगीत, युवा संमेलन, चर्चासत्रे, सादरीकरण, निबंध-लेखन, पठण इत्यादी स्पर्धांसह साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांचे विचार व आदर्श प्रत्येक युवापिढीं...

पांडुरंग बजाज चेतक शोरुम मध्ये नवीन मॉडेल्स चे उत्साहात स्वागत.

Image
 पांडुरंग बजाज चेतक शोरुम मध्ये नवीन  मॉडेल्स चे उत्साहात स्वागत. पंढरपुर :(प्रतिनीधी )पंढरपूर येथील पांडूरंग बजाज चेतक शोरुम  इसबावी मध्ये     चेतक या इलेक्ट्रीक व्हेइकल  एक्सक्ल्युसिव्ह एक्सपेरीएन्स सेंटर येथे दोन नवीन चेतक मॉडेल्स चे उत्साहात लॉन्चिंग   पंढरपूर येथील सुप्रसिद्धध बांधकाम व्यावसायिक  मुकुंद कर्वे यांचे शुभहस्ते कऱण्यात आले. भारतातील नामांकित दुचाकी कंपनी बजाज ऑटो लीमीटेड पुणे यांनी चेतक या पहिल्या ई लेक्ट्रीक स्कूटरची निर्मिती  व विक्री जानेवारी २०२० पासून सुरु केली व आता गेल्या ५ व्या वर्षामध्ये लाखो  संतुष्ट ग्राहक भारतातील सर्व राज्यात आहेत. ग्राहकांची मागणी लक्षात घेला बजाज ऑटो ने २०२५ वर्षाच्या सुरवातीला ३५०१ व ३५०२ही नवीन सीरीज उपलब्ध करून दिली असुन त्यामध्ये पूर्वीपेक्षा जास्त १५३ किमी रेंज (Jdc) लेबोरेटरी टेस्टेड आहे. तसेच सीटखालील स्टोरेज एरिया व फुटबोर्ड एरिया वाढवलेला आहे. त्याचप्रमाणे स्पिडोमीटर चौकोनी आकाराचा असुन त्यामध्ये स्मार्ट मोबाईल प्रमाणे टचस्क्रीन सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना मो...

कला साधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा व कलोत्सवचे आयोजन

Image
 कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने  विवेकानंद जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा व कलोत्सव २०२५ चे आयोजन. पंढरपूर(प्रतिनिधी) गेली सतरा वर्षे पंढरीत कार्यरत असणाऱ्या कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने पंढरीतील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून प्रतिवर्षी विवेकानंद जयंती निमित्त  वक्तृत्त्व स्पर्धेचे व कलोत्सव २०२५ च्या अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.  सदर स्पर्धा विविध शालेय गटात घेतल्या जाणार आहेत. रोख रक्कम, संस्थेचे मानचिन्ह, सहभाग प्रमाण पत्र असे पारितोषिकाचे स्वरुप आहे. सदर स्पर्धा दिनांक २२ जानेवारी व २३ जानेवारी २०२५ रोजी पांडुरंग भवन, कालिका देवी चौकाजवळ संपन्न होणार आहेत.  वक्तृत्त्व स्पर्धेचे विषय व गट या प्रमाणे       अ गट--इयत्ता १ली ते ४थी १) माझी आवडती सहल  २) माझी ताई   ३) मला आवडलेली स्वामी विवेकानंदांची      गोष्ट ४) माझी शाळा  ५) माझी बाग  ६) माझा आवडता प्राणी ब गट--इयत्ता ५ वी ते ८वी १) माझा आवडता कवी २) मातृभक्त विवेकानंद  ३) शिवरायांचा गनिमी कावा ४) देशभक्त...

हरवलेला मोबाईल शोधून दिला, मंदिर समिति कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा.

Image
 हरवलेला मोबाईल शोधून दिला, मंदिर समिती कर्मचा-याचा प्रामाणिकपणा, पंढरपूर ( प्रतिनिधी) श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या दर्शनासाठी आलेल्या विकी दिनेश दहिवाळ या भाविकाचा मोबाईल हरवला होता. संबंधित भाविकांकडून मोबाईलची शोधा शोध होत असताना, पश्चिमद्वार येथील सफाई कर्मचारी छाया कुमार रणदिवे यांना सदरचा मोबाईल मिळून आला असता, त्यांनी मंदिर समितीच्या कार्यालयात जमा केला व शहानिशा झाल्यानंतर संबंधित भाविकास परत करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. संबंधित भाविक हे बीड येथील रहिवाशी असून, आज श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांचा मोबाईल मंदिर परिसरात हरवला होता. परंतू, अवघ्या काही तासातच मोबाईल परत मिळाला. संबंधित कर्मचा-यांच्या प्रामाणिकपणा बद्दल सर्वांनी कौतुक करून अभिनंदन केले. आजच्या काळातही अनेकजण आपली सेवा प्रामाणिक आणि तत्परतेने करत असल्यामुळे कार्यतत्पर कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडले. हरवलेला मोबाईल मिळून आल्याने, संबंधित भाविकाने देखील कर्मचा-यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात मोबाईल बंदी असून, मंदि...

अवैध वाळू वाहतुकीवर प्रशासनाची कारवाई.

Image
 अवैध वाळू वाहतूकीवर महसूल प्रशासनाची कारवाई                                      -तहसिलदार- सचिन लंगुटे          पंढरपूर (प्रतिनीधी )अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात  पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल पथकाने  भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा व वाहतूकीसाठी वापरण्यात येणारे एक जेसीबी, एक टिपर तसेच अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली. पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध  वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सचिन लंगुटे यांनी विविध पथकांची  नेमणूक केली आहे. चंद्रभागा नदी पात्रात जुन्या दगडी पुलाजवळ अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक करणारा अशोक लेलँड कंपनीच्या टेम्पो तसेच मौजे गुरसाळे (ता.पंढरपूर) येथील भीमा नदी पात्रालगत एक जेसीबी व एक टिपर अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक  करण्यात य...

टँकर ने मागून धडक दिल्याने ट्रॅक्टरचालक जागीच ठार.

Image
 ब्रम्हपुरी जवळ सिमेंट वाहतूक करणार्‍या टँकरने ट्रॅक्टरला पाठीमागून ठोकरल्याने ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू एकाच आठवड्यातील दुसरी घटना,अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दाखल... मंगळवेढा/प्रतिनिधी  मंगळवेढा-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील ब्रम्हपुरी जवळ भरधाव वेगाने जाणार्‍या सिमेंट वाहतूक करणार्‍या टँकरने रस्त्यावरुन ऊस घेवून जाणार्‍या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक देवून गोरख मल्हारी बोडरे (वय 36,रा.अर्धनारी,ता.मोहोळ) याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात टँकर चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान अपघातानंतर टँकर चालक फरार झाला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,दि.10 जानेवारीच्या पहाटे 3 वाजता मंगळवेढा ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील ब्रम्हपुरी हद्दीतील शिरसट वस्तीजवळ ऊस घेवून जाणारा ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.13 ए.8789 याला सिमेंट वाहतूक करणारा टाटा कंपनीचा टँकर क्रमांक एम.एच.13 ए.एक्स 4067 या वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन ट्रॅक्टर चालक गोरख बोडरे याला गंभीर जखमी केले व त्याच्या मृत्यूस कारणीभूत...

विजेची बचत करणे ही काळाची गरज._सुनिल दोशी

Image
 विजेची बचत करणे ही काळाची गरज                                  -मॅनेजमेंट कन्सल्टंट मा. सुनील दोशी स्वेरीमध्ये ‘नॅशनल एनर्जी कंझर्वेशन विक’ साजरा पंढरपूर- (प्रतिनिधी)‘विजेची बचत करणे ही सध्या काळाची गरज बनली आहे. मागणीपेक्षा विजेचा पुरवठा कमी असल्यामुळे नागरिकांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. परंतु, प्रत्येकाने जर घरामध्ये विजेचा वापर करताना काळजी घेतली तर भविष्यात भरपूर विजेची बचत होऊ शकते. घरातील सर्वच सदस्यांनी वीज बचतीसाठी पुढाकार घेतला तर वीज बचत होईलच, शिवाय येणारे विजबील देखील कमी येईल. ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन’ आपल्याला ऊर्जा काळजीपूर्वक वापरण्याचा आणि भावी पिढ्यांसाठी शाश्वत भविष्य घडवण्याची सामूहिक जबाबदारी लक्षात आणून देतो. यासाठी उर्जा बचत करणे ही काळाची गरज आहे.’ असे प्रतिपादन पुण्यातील मॅनेजमेंट कन्सल्टंट मा. सुनील दोशी यांनी केले.            गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचालित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ...

स्वेरीच्या आठ प्राध्यापकांचा अभ्यास दौरा संपन्न.

Image
 बातमी                                                                                                                                                       दि. ०९/०१/२०२५ स्वेरीच्या आठ प्राध्यापकांचा अभ्यास दौरा संपन्न हैद्राबाद येथील प्रयोगशाळांना भेट पंढरपूर-(प्रतिनिधी ) गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील ८ प्राध्यापकांनी दि.१६ आणि दि.१७ डिसेंबर २०२४ रोजी या दोन दिवशी हैद्राबाद येथील दोन प्रसिद्ध नवोपक्रम केंद्रांना भेट दिली. स्वेरी मध्ये अत्याधुनिक इनक्युबेशन सेंटर स्थापन करणे आणि मायक्रोफ्लुइडिक संशोधनाचा विकास करणे या महत्वाच्या दोन कारणासाठी हा...

स्वेरी कॉलेज मध्ये, फ्युजन ऑफ सेमी कंडक्टर ॲडव्हांसमेंट अँड ए आय पॅराडायंडमस, या विषयावर कार्यशाळा संपन्न.

Image
 स्वेरीत ‘द फ्युजन ऑफ सेमी कंडक्टर एडव्हान्समेंट अँड ए.आय पॅराडायम्स’ या विषयावर कार्यशाळा संपन्न   पंढरपूर-(प्रतिनिधी) गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि बिदर (कर्नाटक) मधील गुरुनानक देव इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफडीपी) अंतर्गत दि.२३ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२४ दरम्यान आठवडाभर शिक्षक विकास कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली.         गुरुनानक देव इंजिनिअरिंग कॉलेजचे अध्यक्ष डॉ. सरदार बलबीर सिंगजी व स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली. ‘द फ्युजन ऑफ सेमी कंडक्टर एडव्हान्समेंट अँड ए.आय पॅराडायम्स’ या विषयावर या कार्यशाळेचे आयोजन केले होते. ही कार्यशाळा हायब्रिड मोडमध्ये आयोजित केली होती. या कार्यशाळेत महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील जवळपास १४० हून अधिक संशोधक, प्राध्यापकांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेचे प्रायोजक  इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल ...

महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना केले अभिवादन.

Image
 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे अभिवादन *महिलांसाठी डिजीटल स्री शक्ती व्याख्यानाचे आयोजन* मुंबई (प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर यांनी आज आयोग कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सावित्रीबाई फुले जयंतीच्या औचित्याने आज आयोग कार्यालयात डिजीटल स्री शक्ती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आयोगाच्या सदस्या अँड गौरी छाब्रीया, सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे, विमा संचलनालयाचे सहायक विमा संचालक श्री स्वप्निल खुराटे या मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास राज्य महिला आय़ोग तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ, म्हाडा कार्यालय, विमा संचलनालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महिलांना सायबर साक्षर आणि सुरक्षित करणार्या डिजीटल स्त्री शक्ती व्याख्यानात रिस्पाँन्सिबल नेटिझम संस्थेच्या संस्थापक श्रीमती सोनाली पाटणकर यांनी मार्गदर्शन केले. मोबाईल, इंटनेट रोजच्या जगण्याचा भाग झाला असताना आता सेक्सटाँर्शन, डिजीटल अरेस्ट, आँनलाईन ल...

हत्या करण्याच्या उद्देशाने पंढरपूर येथे आलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून पिस्तुल, तलवार, चाकू जप्त.

Image
 *पंढरपुर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज दमदार* *कामगीरी* पंढरपुर शहरामध्ये बाहेरून येवुन जिवे ठार मारण्याचा कट करणाऱ्यांना ताब्यात घेवुन गुन्हे प्रकटीकरण शाखेने केले ०१ पिस्टल, ०३ जिवंत काडतुस, ०१ तलवार व ०१ चाकु जप्त. पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंध करणे करीता दिनांक २६ डिसेंबर रोजी रात्रौ गस्त करीत असताना कराड रोड लगतच्या श्रेयश पॅलेसच्या बाजुला असलेल्या मोकळया मैदानात एक कार अंधारात संशयीतपणे थांबवलेली दिसली. त्याचा संशय आल्याने सदरचे वाहना जवळ जावुन पाहिले असता त्यामध्ये तिन इसम बसलेले दिसले बसलेल्या इसमांना आपण येवढ्‌या रात्री येथे काय करीत आहात गाडीमध्ये कोण कोण आहेत तसेच सदरच्या कारला आपण पाठिमागे नंबर प्लेट का लावलेली नाही असे विचारले असता सुरवातीला त्यांनी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, आत मध्ये बसलेल्या इसमांना खाली उतरण्यास सांगीतले असता सदर इसम हे खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना जागीच पकडले त्यांचेकडे नाव पत्ता बाबत विचारना केली तसेच मिळुन आलेली स्विफ्ट कार चेक केली असता त्यामध्ये बेकायदेश...