पंढरपूर येथील गोविंद सबनीस (बंडू काका) यांनी पक्षीमित्र जीवनगौरव पुरस्कार.
.
पंढरपूर येथील
गोविंद सबनीस यांना पक्षीमित्र जीवनगौरव; पक्षी साहित्य पुरस्काराची घोषणा.
पंढरपूर (प्रतिनिधी)_
गेली चार दशके महाराष्ट्रात पक्षीविषयक कार्य करणारी संस्था 'महाराष्ट्र पक्षिमित्र' तर्फे देण्यात येणाऱ्या २०२४च्या पक्षिमित्र पुरस्कारांची घोषणा झाली असून यंदाचा पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार पंढरपूरचे गोविंद सबनीस यांना जाहीर करण्यात आला.
महाराष्ट्र पक्षीमित्रच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. इतर पुरस्कारांपैकी पक्षी संवर्धन व सुश्रूषा पुरस्कार कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील फिरोज चाऊस यांना, तर पक्षी जनजागृती पुरस्कार वर्ध्याचे राहुल वकारे यांना जाहीर झाला. पक्षी संशोधन पुरस्कार या गटात योग्य प्रस्ताव प्राप्त न झाल्याने यंदा जाहीर करण्यात आला नाही.
यावर्षीपासून नव्याने पक्षीविषयक साहित्य पुरस्काराची घोषणासुद्धा यावेळी करण्यात आली. यावर्षीचा पहिला पक्षी साहित्य पुरस्कार परभणी येथील माणिक पुरी यांना जाहीर झाला. पक्षीसंबंधित विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे २०१९पासून
या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली. यामध्ये दरवर्षी चार पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीपासून यामध्ये साहित्य पुरस्काराची भर पडली आहे. या पुरस्कारांची घोषणा महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे अमरावती येथे संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी केली. पुरस्कारांचे वितरण शेवगाव जि. अहिल्यानगर येथे होणाऱ्या ३७व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार आहे.
यंदाचा स्व. रमेश लाडखेडकर स्मृती पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार हा दीर्घकाळ
फेब्रुवारीत होणार पुरस्कारांचे वितरण
या पुरस्कारांचे वितरण ३७ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार असून यावर्षी महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन शेवगाव, जि. अहिल्यानगर (अहमदनगर) येथे १ व २ फेब्रुवारी २०२५दरम्यान होणार आहे. या पुरस्कारांचे वितरण संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पक्षिमित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी दिली.
पक्षिमित्र चळवळीत राहून, पक्षीसंवर्धन व जनजागृतीसाठी कार्यरत पक्षिमित्र, मार्गदर्शक पंढरपूरचे ज्येष्ठ सभासद गोविंद सबनीस यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार विदर्भ पक्षिमित्र मंचद्वारे डॉ. अनिल पिंपळापुरे यांच्यातर्फे प्रायोजित केला आहे. यंदाचा पहिला सुशीला पाटकर स्मृती पक्षी साहित्य पुरस्कार अॅड. चंदना साळगावकर, मुंबई यांच्यातर्फे प्रायोजित केला आहे.
चौकट.
पंढरपूर येथील गोविंद सबनीस हे एक निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी म्हणुन ओळखले जातात.
त्यांनी नव्वद च्या दशकात पंढरपूर येथे,निसर्गयात्री या नावाची गिर्यारोहण पदभ्रमण संस्था सूरू केली होती. सह्याद्रीच्या कडे कपारीतील विविध गड किल्ल्यांना भेटी देऊन पंढरपूर येथे ट्रेकिंग ची आवड युवकात निर्माण केली.
येथील निसर्ग रमणीय यमाई तलाव परिसरात येणाऱ्या शेकडो पक्ष्यांचे फोटो,माहिती लावुन लोकांना माहिती दिली.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment