अखंड व अविरत बाल रुग्णसेवेसाठी डॉ शीतल शहा यांचा हैदराबाद येथे गौरव.
अखंड व अविरत बाल रुग्णसेवेसाठी डॉ शीतल शहा यांचा हैदराबाद येथे गौरव. पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर येथील सुप्रसिध्द बालरोग तज्ज्ञ डॉ शीतल शहा यांना त्यांच्या अविरत व अखंड रुग्णसेवे बद्दल हैदराबाद येथील डॉक्टर्स असोसिएशन यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक २७रोजी हैदराबाद येथील नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने पंचतारांकित हॉटेल मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील विविध राज्यातील नामवंत डॉक्टर यांना या सत्कार सोहळ्यात त्यांच्या अविरत योगदानासाठी सन्मानित करण्यात आले, यामध्ये सोलापूर जिल्हयातील पंढरपूर सारख्या निमशहरी भागातील एका डॉ चा आलिशान सत्कार करून मानसन्मान करण्यात येत आहे, ही बाब तमाम पंढरपूरकर नागरिकांसाठी सन्मानाची आहे, डॉ शीतल शहा हे केवळ बालरोग तज्ज्ञ नाहीत तर एक सहृदयी पवित्र आत्मा आहेत, हजारों चिमुकल्यांना मृत्यूच्या दाढेतून परत काढून त्यांना जीवदान देणारे देवदूत अशी डॉ शहा यांची खरी ओळख आहे. आलिशान गाडी घेण्यापेक्षा तोच पैसा वापरून त्यांनी आपल्या दवाखान्यात अत्याधुनिक...