दानशूर भाविकांकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस ९लाखाचा सोन्याचा हार अर्पण.
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी ९ लाख किंमतीचा सोन्याचा हार अर्पण,
पंढरपूर (प्रतिनिधी) श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर रोजी नाव जाहिर न करण्याच्या अटीवर दानशुर भाविकाने सुर्य कळ्यांचा सोन्याचा हार गोफासह अर्पण केला आहे. त्याचे वजन १३२ ग्रॅम असून, अंदाजे किंमत ९ लाख २६ हजार होत असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
संबंधित दानशुर भाविक हे श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे निस्सिम भक्त आहेत. ते आज सहकुंटुंब श्रींच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र पंढरपूला आले असता, सदरचे दान दिले आहे. याशिवाय, त्यांनी मंदिर समितीच्या श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये अन्नदान देखील केले आहे. त्याचा सुमारे १२०० ते १५०० भाविकांनी लाभ घेतला.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीला सोने-चांदी वस्तू दान करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध आहे. त्यासाठी दोन सराफाची पूर्णवेळ नियुक्ती व संबंधित भाविकांना संगणकीकृत पावती देण्यात येते. तसेच इतर स्वरूपात देखील दान देण्यासाठी विविध प्रकारच्या योजना असून, इच्छुक भाविकांनी मंदिर समितीच्या कार्यालयात समक्ष भेट द्यावी अथवा दुरध्वनीद्वारे संपर्क करावा असेही आवाहन ही यावेळी व्यवस्थापक श्रोत्री यांनी केले.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment