अखंड व अविरत बाल रुग्णसेवेसाठी डॉ शीतल शहा यांचा हैदराबाद येथे गौरव.


 अखंड व अविरत बाल रुग्णसेवेसाठी डॉ शीतल शहा यांचा हैदराबाद येथे गौरव.

पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर येथील सुप्रसिध्द 

बालरोग तज्ज्ञ डॉ शीतल शहा यांना त्यांच्या अविरत व अखंड रुग्णसेवे बद्दल हैदराबाद येथील डॉक्टर्स असोसिएशन यांच्या वतीने 

राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.

शुक्रवार दिनांक २७रोजी  हैदराबाद येथील नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने पंचतारांकित हॉटेल मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

देशभरातील विविध राज्यातील नामवंत डॉक्टर यांना या सत्कार सोहळ्यात त्यांच्या अविरत योगदानासाठी सन्मानित करण्यात आले, यामध्ये सोलापूर जिल्हयातील पंढरपूर सारख्या निमशहरी भागातील एका डॉ चा आलिशान सत्कार करून मानसन्मान करण्यात येत आहे, ही बाब तमाम पंढरपूरकर नागरिकांसाठी 

सन्मानाची आहे,

डॉ शीतल शहा हे केवळ बालरोग तज्ज्ञ नाहीत तर एक सहृदयी पवित्र आत्मा आहेत, हजारों चिमुकल्यांना मृत्यूच्या दाढेतून परत काढून त्यांना जीवदान देणारे देवदूत अशी डॉ शहा यांची खरी ओळख आहे. आलिशान गाडी घेण्यापेक्षा तोच पैसा वापरून त्यांनी आपल्या दवाखान्यात अत्याधुनिक 

यंत्रणा बसविण्यात धन्यता मानली, त्यांची ख्याती सर्वदूर पसरली आहे, यामुळे महाराष्ट्र नव्हे तर ईतर राज्यातून देखील हजारो पालक त्यांच्याकडे येत असतात, आपले मूल बरे झाले म्हणजे साक्षात श्री पांडुरंगा च्या नगरीत डॉ शीतल शहा यांच्या रूपात श्री विठ्ठलानेच आपल्या बालकाचे प्राण वाचवले अशी भावना होते, अनेक गोरगरीब, साध्या लोकांकडून डॉ पैसे घेत नाहीत, तर उलट मुलांच्या औषधासाठी पैसे देतात.

पुरस्कार स्वीकारून डॉ शहा पंढरपूर येथे आले तेव्हा सर्व स्टाफ च्या वतीने त्यांचे फुलांच्या पायघड्या अंथरून जंगी स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील केवळ नागपूर,हिंगोली व पंढरपूर येथील डॉ ना सन्मानित करण्यात आले आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.