पंढरपूर जवळ बस व मालवाहू ट्रक अपघातात दोन जागीच ठार, १०भाविक जखमी.
पंढरपूर तालुक्यातील भटूबरे येथे बस व ट्रकच्या भीषण अपघातात २ठार,
१०भाविक जखमी.
पंढरपूर (प्रतिनिधी)_
पंढरपूर जवळ असलेल्या भटूबरे गावानजीक पुणे जिल्ह्यातील भाविकांच्या खासगी बसचा व मालवाहू ट्रक चा समोरासमोर अपघात आज रविवार दि २९ डिसेंबर रोजी सकाळी ६: ३०वा झाला. या भिषण अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झालाय. यामध्ये काही प्रवासी गंभीर जखमी झाले
यामध्ये १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान अपघात इतका भीषण होता की बसचा चुराडा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. यानंतर अपघातामधील जखमींना पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पंढरपूर ते टेंभुर्णी या मार्गावरील भटुंबरे गावच्या हद्दीत पंढरपूर पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर खाजगी प्रवासी वाहतूक करणारी भाविकांची बस आणि माल वाहतूक ट्रकचा भीषण अपघात होऊन
दरम्यान या अपघातामध्ये दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य आठ भाविक जखमी झालेले आहेत. जखमी भाविकांना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. अपघातग्रस्त बस ही पुणे जिल्ह्यातील असून मयत भाविक मावळ तालुक्यातील आहेत अशी प्राथमिक माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.
पंढरपूर - टेंभुर्णी या मार्गावरील पंढरपूर शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर भटुंबरे गावच्या हद्दीत रविवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास हभप तुकाराम खेडलेकर महाराज मठाच्या समोर हा अपघात झाला. टेंभुर्णी कडून पंढरपूरकडे येत असलेल्या भाविकांची बस (क्र.एम.एच. १४ एल.एस.३९५५) चा पंढरपूरकडून टेंभुर्णीकडे निघालेल्या मालवाहतूक ट्रक ( क्रमांक आर जे १४ जी एल १७८०) सोबत समोरासमोर धडक झाली. या अपघातात बस आणि मालवाहतूक ट्रकचा समोरचा भाग चक्काचूर झालेला आहे.
बस मधील २ प्रवाशांच्या जागीच मृत्यू झाला असून अन्य जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघात झाला तेव्हा प्रचंड मोठा आवाज झाल्याने गावकरी धावत आले, यावेळी अनेक जखमी ओरडत होते, ग्रामस्थांनी त्यांना बसमधून बाहेर काढले.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment