पंढरपूर येथे दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कपीजी की रसोई, या हॉटेल चे उद्घाटन.
पंढरपूर येथे दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कपीजी की रसोई या हॉटेल चे उद्घाटन.
पंढरपूर (प्रतिनिधी )_भारताची दक्षिण काशी पंढरपूर येथे कपिजी की रसोई या नवीन हॉटेल रेस्टॉरंट चे उद्घाटन पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सद्गुरू वेणाभारती, कृष्णामयी, पांडुरंग कृष्णाजी बडवे, हभप मदन महाराज हरिदास, कीर्तनकार मनोहर उर्फ छबुकाका उत्पात , रा. पा कटेकर
आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. आवताडे म्हणाले, भाविकांच्या सोयीसुविधेसाठी अतिशय सात्विक, रुचकर आणि आरोग्यदायी पदार्थ असणे ही काळाची गरज होती, ही बाब कपिजी की रसोई या हॉटेल रेस्टॉरंट ने परिपूर्ण केली आहे. येथील सर्व पदार्थ स्वादिष्ट आणि आरोग्यदायी आहेत.
आ प्रशांत परिचारक यांनी या आगळ्यावेगळ्या कार्याला शुभेच्छा दिल्या.पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांची उत्तम सोय होत असल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
सद्गुरू वेणाभारती यांनी सांगितले पंढरपूर येथे हे कार्य सुरू केले आहे या कार्याला विश्व विधाता साक्षात श्री विठ्ठल रुक्मिणी यांचा आशीर्वाद लाभला आहे कारण या शिवाय इतक्या कमी कालावधीत एवढी मोठी उभारणी झाली नसती.
कपिजी की रसोई या विषयी माहिती देताना कृष्णामई यांनी सांगितले अतिशय अल्प काळात पण वेगाने हे कार्य सुरू झाले, माणसे जोडली गेली आणि पटापट कामे झाली, या कार्याला विश्व विधाता साक्षात श्री विठ्ठल व सद्गुरू यांचा आशीर्वाद आहे, येथील सर्व पदार्थ साधक बनवतात यावेळी मनात सदभाव व सकारात्मक भाव असतात हेच सात्विक अन्न आपण घेतो, याचा एक वेगळा सुखद परिणाम आरोग्यावर होत असतो. यावेळी हभप मदन महाराज हरिदास, पांडुरंग कृ बडवे, मनोहर उर्फ छबुराव उत्पात यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री कपिकुल सिद्ध मठ चे सर्व साधक उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी याप्रसंगी कपिजी की रसोई, मधील विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment