पंढरीतील रेडीमेड फराळ साता समुद्रापार,


 पंढरीतील तयार दिवाळी फराळला विदेशातून मागणी, ट्रम्प टेरिफ मुळे अमेरिकेत फराळ पाठविणे अशक्य.


चैतन्य उत्पात


पंढरपूर


भारतीय लोकांसाठी दीपावली सण म्हणजे आनंदाचा, दिव्यांचा तेजोमय सण, पण दिवाळी सर्वांच्या कायम लक्षात राहते. ती खुसखुशीत गोडधोड फराळ आणि नानाविध मिष्टान्न यामुळेच. पंढरीत तयार होणाऱ्या फराळाला वेगळी, विशिष्ठ चव असल्याने विदेशात असणारे भारतीयही तयार फराळाला पसंती देत आहेत. फराळामध्ये गत वर्षापेक्षा यंदा २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.


पूर्वीसारखा साग्र संगीत फराळ आता बनत नाही. कारण महिलावर्ग, गृहिणीकडे तेवढा वेळ नाही. पुणे-मुंबई सारखाच दिवाळी फराळ विकत घेण्याचा ट्रेण्ड आता पंढरपूर शहरातही रुजत आहे. गावातील अनेक महिला, बचतगटातील महिला


सदस्य दिवाळी फराळ तयार करून व्यवसाय करीत आहेत.


पंढरपूर शहर हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे वर्षभर केटरिंग व्यवसाय उत्तम सुरू असतो. कॅटरिंग व्यवसायातील आचारी दिवाळीत मोठ्या प्रमाणात पदार्थ तयार करून व्यवसाय करीत आहेत. यामुळे गरीब, गरजू महिला, कर्मचारी यांनाही ऐन सणासुदीत चांगली कमाई होत आहे. पंढरीतील दिवाळीचा फराळ आता सातासमुद्रापार गेला असून , इंग्लंड, दुबई, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, कॅनडा,ओमान या देशात पंढरपूर येथील सौ नीता जोशी यांचा फराळ जात आहे,

पूर्वी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कुरिअर द्वारे फराळ जात होता मात्र या वर्षी आयात शुल्कात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने ते शक्य नाही,

आता अमेरिकेतील भारतीय लोक तिथेच सर्व पदार्थ करीत असल्याने भारतातून आवक घटली आहे. पंढरपूर येथील सौ नीता जोशी या गेल्या तीस वर्षांपासून दिवाळीत फराळ करून ग्राहकांना विनम्र सेवा देत आहेत.

खास पंढरपुरी चिवडा,शेव, चकली,शंकरपाळे,चिरोटे, बालुशाही,अनारसे,रसमलाई, अंगुर शाही रबडी , असे पदार्थ त्या बनवतात, आता दिवाळी तोंडावर आल्याने जलद गतीने फराळ तयार करण्यात येत आहे,

असे आहेत तयार फराळाचे दर

चकली ३२० रू. किलो, मोतिचूर लाडू, २४०, रवा लाडू १८०, बेसन लाडू ३२०, सोन पापडी १८०, शंकरपाळी २८०, करंजी २८०, अनारस ३८०, हलवा बदाम, २८०, गहू चिवडा, ३८०, पातळ पोहे चिवडा २८०, खारी बुंदी २६०, भाकरवडी २८०, खारी शंकरपाळी २९०, मका चिवडा २८०, भडंग २३० रू. किलो असे दर आहेत.

चौकट 

तयार फराळाला प्राधान्य


आम्ही गेल्या ३० वर्षांपासून दिवाळी फराळ तयार करतो. पंढरपूर येथे अनेक खवय्या मंडळी आहेत. पण डॉक्टर, इंजिनियर, विविध व्यवसाय, सी. ए. असणाऱ्या या लोकांना फराळ करण्यासाठी वेळच मिळत नाही. मग जिभेची रसना तृप्त करण्यासाठी तयार फराळालाच प्राधान्य दिले जाते. अनेक पदार्थ लोक आवडीने घेतात. पंढरीतील फराळ मूळ भारतीय असलेल्या विदेशातील खवय्या मंडळीकडे विमान पार्सलव्दारे जातो.


- नीता नंदकुमार जोशी, चौफाळा, पंढरपूर,

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.