कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये, मेंटल हेल्थ अँड सुसाइड प्रिव्हेन्शन"या विषयावर व्याख्यान.
कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये "मेंटल हेल्थ अँड सुसाईड प्रिव्हेन्शन" वर व्याख्यान संपन्न.
आपल्या मन:स्वास्थ्याविषयी सजग राहा - लायन डॉ. शेरॉन भोपटकर,
लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम चा पुढाकार.
पंढरपूर (प्रतिनिधी)
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे येथे दिनांक ८ ऑक्टोबर रोजी "मेंटल हेल्थ अँड सुसाईड प्रिव्हेन्शन " या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. पंढरपूर येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ लायन डॉक्टर शेरॉन भोपटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील हे अध्यक्षस्थानी होते.
०४ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर मेंटल हेल्थ अँड वेल बिइंगया मेंटल हेल्थ सप्ताहा अंतर्गत लायन्स इंटरनॅशनल क्लब पंढरपूर ड्रीम यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य, आत्महत्येची कारणे व आत्महत्या रोखण्यासाठीचे उपाय या विषयावर लायन डॉक्टर शेरॉन यांनी विशेष मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या मागे अनेक कारणे आहेत. मनाचे अस्वास्थ्य, स्वभाव दोष, व्यसनाधीनता, नातेसंबंधातील तणाव, मोबाईल अतिवापरामुळे मिळणारी अपुरी झोप, सुसंवादाचा अभाव, तुलना अशा अनेक कारणामुळे विद्यार्थी नैराश्यातून आत्महत्या करतात. विद्यार्थ्यांनी नैराश्ये मध्ये मध्ये जाऊ नये याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले. आत्महत्या रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी कुटुंब व मित्र यांच्याशी यांच्याशी सुसंवाद साधला पाहिजे. तसेच डायरी लिहिणे, व्यायाम, खेळ, चांगली झोप, योग्य समुपदेशन, ताणतणावाचे नियोजन, छंद जोपासणे इत्यादी गोष्टींचे महत्त्व त्यांनी विशद केले. यावेळी लायन्स क्लब पंढरपूर ड्रीमच्या प्रशासक लायन ललिता कोळवले या उपस्थित होत्या.
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, उपप्राचार्य प्रा.जगदीश मुडेगावकर, रजिस्ट्रार जी डी वाळके, विभागप्रमुख डॉ.एस एम लंबे, डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. राहुल पांचाळ तसेच इतर सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment