माढा, श्रीपूर महाळुंग नमो उद्यानासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर.
*माढा व श्रीपुर महाळुंग नगरपंचायतीला नमो उद्यानासाठी २कोटी निधी मंजूर.
*आमदार अभिजीत पाटील यांनी मांडले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पालकमंत्री यांचे आभार.
पंढरपूर
(प्रतिनिधी)
माढा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाअंतर्गत माढा नगरपंचायतसाठी १ कोटी तसेच श्रीपुर महाळुंग नगरपरिषदेसाठी १ कोटी असा एकूण २ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
या मंजूर निधीतून दोन्ही शहरांमध्ये भव्य, आधुनिक व पर्यावरणपूरक असे “नमो उद्यान” उभारण्यात येणार असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.
माढा व महाळुंग-श्रीपुर येथे आधुनिक व हिरवाईने नटलेले उद्यान नागरिकांना विश्रांतीसाठी, सकस जीवनशैलीसाठी आणि पर्यावरणपूरक वातावरणासाठी एक सुंदर व सुसज्ज जागा मिळेल. लहान मुलांसाठी खेळाची साधने – लहान मुलांना शारीरिक व मानसिक विकासासाठी विविध खेळणी व उपक्रम उपलब्ध होतील.
माढा मतदारसंघांमध्ये भरीव निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मनःपूर्वक आभार आमदार अभिजीत पाटील यांनी केले..
चौकट:
माढा विधानसभा मतदारसंघातील जनतेला सुसज्ज उद्याने, लहान मुलांना खेळणी, जेष्ठ नागरिकांना विसावासाठी नक्कीच फायदा होईल. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सदैव मी प्रयत्नशील असेल.
आ.अभिजीत पाटील
माढा विधानसभा मतदारसंघ.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment