ऐन सणासुदीत शासकीय धान्याचा काळाबाजार. जिल्ह्यात पूर परिस्थिती असतानाही धान्याची हेराफेरी.
ऐन सणासुदीत रेशनच्या धान्याचा काळाबाजार ;
जिल्ह्यात पूरग्रस्त स्थिती असताना धान्याची कमतरता भासत असूनही शासकीय धान्याचा काळाबाजार
प्रतिनिधी पंढरपूर
:- पंढरपुरात शासकीय धान्याचा काळाबाजार सुरू असताना शिवसेना शिंदे गटाचे नेते साईनाथ बडवे यांनी धाडं टाकली आहे. कराड रोडवरील सिंहगड कॉलेजच्या जवळच्या मोकळ्या मैदानात रेशनचे धान्य वितरण करणाऱ्या सहा ट्रक उभ्या होत्या. या ट्रक मधून खाजगी पिकअप मध्ये रेशनचा गहू आणि तांदूळ भरला जात होता.
शासकीय नियमानुसार रेशनचे धान्य हे शासकीय गोदामातून शासकीय गाडीमध्ये भरूनच रेशन दुकानापर्यंत पोहोचवले जाते. मात्र काळाबाजार करण्याच्या हेतूनेच शहराच्या बाहेर निर्जन ठिकाणी रेशनचे धान्य खाजगी गाडीत भरले जात होते. सदरची घटना उघडकीस आल्यानंतर पंढरपूरचे नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड आपल्या पथकासह दाखल झाले. पंढरपूर शहर आणि पंढरपूर ग्रामीणचे पोलीस देखील या ठिकाणी तात्काळ हजर झाले. सदरच्या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे.
यावर नायब तहसीलदार तथा पुरवठा अधिकारी बालाजी पुदलवाड यांनी शासकीय गोदामाच्या बाहेर धान्याचे वितरण करणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे.
पंढरपूर पासून जवळ कोर्टी हद्दी मध्ये शासकीय धान्य खासगी वाहनातून भरून इतरत्र नेले जात असताना शिवसेनेचे शहर उपप्रमुख साईनाथ बडवे यांनी पकडले आहे. त्यानंतर पुरवठा विभाग आणि पोलिसांनी खासगी वाहनास दोन शासकीय धान्याचे ट्रक ताब्यात घेतले आहेत. प्रथम दर्शनी धान्याचा काळाबाजार झाल्याचा अंदाज आहे.
पंढरपूर तालुक्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात पूरग्रस्तांसाठी विविध स्तरावर मदतीचे आवाहन करण्यात येत असताना शासकीय धान्याचाच चोरीचा मामला उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ग्रामीण पोलीस पंचनामा करून पुढील तपास करीत आहेत.
चौकट
ऐन सणासुदीत गोरगरीब लोकांसाठी असलेले रेशन दुकानातील धान्य कोर्टी
या गावाजवळ एका खाजगी जागेत उतरवीत असताना पकडण्यात आले आहे, सहा ट्रक एवढे हे धान्य आहे,
मागील चार दिवसांपापूर्वी गृहराज्यमंत्री आणि अन्न व पुरवठा मंत्री योगेश कदम हे मोहोळ तालुक्यात पूरग्रस्त भागात दौरा करण्यासाठी आले होते तेव्हा ग्रामीण भागातील लोक रेशन दुकानातील धान्य मिळत नसल्याची तक्रार करीत होते, याचा पाठपुरावा करीत असताना हा प्रकार समोर आला असून ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी पंचनामा करीत आहेत.
साईनाथ बडवे.
शिवसेना शिंदे गट नेते
पंढरपूर
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment