स्वेरी मध्ये ऑलम्पस २के २५ही तांत्रिक परिषद दि १५व १६सप्टेंबर रोजी होणार.


                                                                          


स्वेरीत ‘ऑलम्पस २ के २५’ तांत्रिक स्पर्धेच्या पोस्टरचे उदघाटन


स्वेरीत राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा ‘ऑलम्पस २ के २५’ १५ व १६ सप्टेंबरला होणार 


पंढरपूर -(प्रतिनिधी )स्वेरीमध्ये सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आपली सुप्त प्रतिभा आणि कौशल्ये प्रदर्शित करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होत असते. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळून तांत्रिक बाबींच्या सखोल अभ्यासाची वृत्ती अधिक दृढ होत आहे. या उपक्रमांच्या यशस्वी परंपरेचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणारी ‘ऑलम्पस २ के २५’ ही राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा येत्या १५ व १६ सप्टेंबर रोजी स्वेरी मध्ये आयोजित करण्यात आली आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून नुकतेच या तंत्रस्पर्धेच्या पोस्टरचे उद्घाटन प्रमुख पाहुणे व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई) मुंबईचे माजी संचालक डॉ. प्रकाश खोडके यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

         गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचालित अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. १५ व दि. १६ सप्टेंबर रोजी आयोजिलेल्या ‘ऑलम्पस २ के २५’ या  राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेत इग्नाईटमेक, स्पेल बी, थिंक-बझ टॉक, आर्डुइनो चॅलेंज, ब्रिज मेकिंग, सॉईल आर्ट, मिरर कोड, जस्ट अ मिनिट टायपिंग, ई-क्विझ, इलेक्ट्रिकल मास्टर, बिझविझ, टेक क्विझिझ, कॉम्पोनंट्स क्लॅश, कॅड क्लॅश, टेक शार्क्स, कॅम्पस ड्राईव्ह, मिनी-हॅकाथॉन, एस्केप रूम, कॅड रेस, सिव्हिल-टेक्नो क्विझ, इलेक्ट्रो एक्स्टेम्पोर, पोस्टर प्रेझेंटेशन, डिस्कसाथॉन असे जवळपास २३ तांत्रिक इव्हेंटस् असून यासाठी विजेत्यांना जवळपास एक लाखांपर्यंतची रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्रे ही बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या तांत्रिक स्पर्धेत अभियांत्रिकी तसेच पदविका अभियांत्रिकीचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. यासाठी संस्थेचे संस्थापक व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे सचिव डॉ. सुरज रोंगे  व उपप्राचार्या डॉ. मीनाक्षी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती, संशोधन अधिष्ठाता डॉ.अमरजित केने, समन्वयक प्रा. डी.टी. काशीद यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या वतीने ऑलम्पस २ के २५ चे विद्यार्थी अध्यक्ष अवधूत भोसले, उपाध्यक्ष गणेश सुरवसे, सचिव गिरीजादेवी देशमुख, संयुक्त सचिव पीयूष चोपडे व जय गाडेकर, खजिनदार उदयराज आवाड आणि सहखजिनदार सुहानी शिंदे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. ‘ऑलम्पस २ के २५’ च्या निमित्ताने अभियांत्रिकीच्या सर्व विभागात जय्यत तयारी केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. ‘ऑलम्पस २ के २५’ या स्पर्धात्मक कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ऑलम्पस चे समन्वयक प्रा.डी.टी. काशीद (मोबा. ८२०८७२४२६६), डॉ. डी. डी. रोंगे (मोबा.९८९०६९५९५७), प्रा. के. आय. चौहान (मोबा. ९५८८६४१५९०), प्रा. एस. एस. गावडे (मोबा. ९४२०७ ६३८५०, प्रा. पी. एच. गुंड (मोबा.८७९३०४३०८३), प्रा. एस. बी.खडके (मोबा. ८३८००५०६२२), प्रा. के. पी. कोंडुभैरी (मोबा. ८६३७७९६६९३), प्रा. ओ. व्ही. मंगले (मोबा.८२०८८९१००१) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी केले आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक व  कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, संस्थेचे सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त दादासाहेब रोंगे, संस्थेचे विश्वस्त एच. एम. बागल, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, संस्थेअंतर्गत असलेल्या डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.एम.जी. मणियार, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा.एस. व्ही. मांडवे, अभियांत्रिकीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी गिरीजादेवी देशमुख, सुहानी शिंदे, नेहा जिरपे, पीयूष चोपडे, गणेश सुरवसे, विद्यार्थी व पालक  यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.