पंढरपूर येथे गणेशोत्सव मध्ये चोरलेल्या दुचाकी जप्त,चोरटे जेरबंद


 पंढरपुर शहरातुन मोटार सायकल चोरी करणाऱ्या चोराकडुन पाच मोटार सायकली जप्त.

 पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपुर शहरामधुन गणेश विसर्जना दिवशी दिनांक ६ सप्टेंबर रोजी दोन मोटार सायकली चोरीस गेल्या होत्या त्याचा मागोवा घेत पंढरपुर शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे तपास करीत सांगली येथे गेले होते. त्यानंतर ,  गोपनीय माहिती नुसार संशयीत आरोपी फिरोज नबीलाल मुल्ला, वय २९ वर्षे, रा. जुळेवाडी ता. तासगाव जि. सांगली (२) उध्दव प्रताप मिले, वय ५५ वर्षे, रा. तांदुळवाडी ता. माळशिरस जि. सोलापुर याने माहे फेब्रुवारी व सप्टेंबर मध्ये एकुण ०४ मोटार सायकली चोरल्या आहेत. ही बाब तपासात समोर आली त्याअनुषंगाने सदर आरोपीस काल दिनांक २९सप्टेंबर रोजी ताब्यात घेवुन विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यांने पंढरपुर शहर पोलीस ठाणे कडील एकुण ०४ गुन्हयाची कबुली दिल्याने खालील नमुद गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक  अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधिक्षक  प्रितमकुमार यावलकर,. सहा. पोलीस अधिक्षक, 

. प्रशांत डगळे, , वरिष्ठ पोलीस निरीक्षक,  विश्वजीत घोडके पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक  आशिष कांबळे, 

 राजेश गोसावी,  सिरमा गोडसे,  विठ्ठल विभुते,  प्रसाद औटी,  सचिन हेंबाडे,  कपिल माने,  शहाजी मंडले,  बजरंग बिचुकले, पोकॉ दिपक नवले, तसेच सायबर पोलीस ठाणे,  रतन जाधव यांनी केली आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.