पाण्याने वेढलेल्या तीन साधूंची पोलीसांनी केली सुटका, पुराच्या पाण्याने वेढले मंदिराला, गुरसाळे येथील घटना.
पाण्याने वेढलेल्या मंदिरात अडकली महाराज मंडळी*
*पंढरपूर तालुका पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीमने काढले बाहेर , गोळा झाली टीम सारी .
पंढरपूर (प्रतिनीधी)_
सोमवारी सकाळी पंढरपूर तालुक्यात अजब घटना घडली. पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गुरसाळे या गावचे भीमा नदीचे पात्रात नदीच्या कडेला असलेल्या मंदिरामध्ये तीन भाविक मंदिरामध्ये चारी बाजूने पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे , मंदिराच्या मध्यभागी पाण्यामध्ये अडकलेले होते. याची माहिती पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला मिळाली . तेथून प्रशासनाची धावपळ सुरू झाली .
पंढरपूरचे तहसीलदार लंगुटे, तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेतलेले पोलीस हवालदार सागर गवळी ,पोलीस हवालदार गजानन माळी, पोलीस हवालदार विजयकुमार आवटी, व पुण्यामध्ये पटाईत असलेले पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण खेडकर तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे इतर लोक यांच्याबरोबर स्वतः त्या ठिकाणी गुरसाळे नदीपात्राच्या ब्रिजपाशी जाऊन ,पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची टीम व आपत्ती व्यवस्थापनाची टीम त्या ठिकाणी पाचारण करून, त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन तीन जण सदर ठिकाणी पाठवून मंदिरामध्ये अडकलेल्या तीन भाविकांचा मदत व बचाव कार्य करण्यासाठी रवाना केले्
सदर ठिकाणी तहसीलदार पंढरपूर तालुकाश्री लांगुटे हे स्वतः हजार होते. त्यानंतर पोलीस हवालदार गवळी यांनी इलेक्ट्रिक पाण्याच्या बोटीमध्ये बसून त्या ठिकाणी जाऊन तिने मंदिरामध्ये अडकलेल्या लोकांना इलेक्ट्रिक बोटीमध्ये बसून त्यांना सुखरूप पणे नदीच्या पाण्यातून बाहेर काढलेले आहे मंदिरातून सुखरूपपणे बाहेर काढलेल्या भाविकांची नावे अशी आहेत.
श्रीकृष्णानंद महाराज जाधव वय ६५ वर्षे राहणार नाशिक ,/ सुभाष संभाजी धवन वय ४५ राहणार गुरसाळे, विठ्ठल रामभाऊ लोकरे वय ५२ वर्षे राहणार घुसाळे असे तीन जणांची नदीच्या पाण्यातून सुखरूपाने बचाव कार्य पंढरपूर तालुका पोलीस टीम पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन माळी पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी व आपत्ती व्यवस्थापनाच्या आपला मित्र विठ्ठल आ धटराव महेश प्रचंडे साहिल माने श्री गणेश कोळी यांच्या पथकाकडून करण्यात आलेले आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.


Comments
Post a Comment