पंढरपूर तालुका पोलिसांची कामगिरी वाळू माफियांवर दणका, पंचेचाळीस लाख २४हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
*पंढरपूर तालुका पोलिसांची वाळू माफियाविरुद्ध मोठी कारवाई.
पंचेचाळीस लाख चोवीस हजार रुपयाचा मुद्देमाल पंढरपूर जप्त.
पंढरपूर(प्रतिनिधि)
पंढरपूर तालुका पोलिसांची वाळू तस्करां विरुद्धची मोहीम सुरूच असून कारवाया होत आहेत. शुक्रवारी पहाटे तालुका पोलिसांनी पुन्हा मोठी कारवाई केली असून, यामध्ये चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर मला लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शुक्रवार दि. ९ मे रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली , पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले ,पीएसआय विजू गायकवाड ,पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगेश रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण खेडकर, यांच्या पथकाने गोपनीय मिळालेल्या माहितीच्या आधारे ओझेवाडी येथील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करताना एक लोखंडी टिप्पर तसेच एक जेसीबी , व चार ब्रास वाळू एकूण किंमत ४५ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे .
सदर अवैध वाळू चोरी प्रकरणी आरोपी मंगेश बाबुराव जाधव रा.सिद्धेवाडी आणि विजय लहू भोसले रा. पुळुज ,जेसीबी टिप्पर चालक अशा चार जणांविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी ,अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर ,उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर ,पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले ,पीएसआय विजय गायकवाड ,पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगेश रोकडे ,पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण खेडकर यांच्या पथकाने केली आहे पुढील तपास पंढरपूर तालुका पोलीस करीत आहेत
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment