Posts

Showing posts from May, 2025

आषाढी वारी अनुषंगाने पालखी प्रमुखांच्या सर्व सुचनांचे पालन करण्यात येणार._जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद.

Image
 आषाढी वारीच्या अनुषंगाने पालखी सोहळा प्रमुखांच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी वारीपूर्वी करण्यात येणार                                                                                                            - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद  *सर्व संबंधित यंत्रणांनी पालखी तळांवर मुरुमाचे साठे, रोलर व जेसीबीची व्यवस्था करून ठेवावी        पंढरपूर, दि. 26: - आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 06 जुलै 2025 रोजी होणार असून, आषाढी यात्रा सोहळ्याच्या अनुषंगाने यापुर्वी  पालखी मार्ग, तळ व रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पालखी सोहळा प्रमुखांकडून काही मागण्या व सूचना  करण्यात आलेल्या होत्या,  त्या सूचनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांकडून काही पालखी मार्ग व तळासंबंधी नव...

मुसळधार पावसामुळे तालुका पोलीस स्टेशन यांच्या वतीने नदीकाठच्या रस्त्यांवर बंदोबस्त.

Image
 . मुसळधार पावसामुळे तालुका पोलीस स्टेशन यांच्या वतीने नदीकाठच्या रस्त्यांवर बंदोबस्त. पंढरपूर (प्रतिनिधि) मागील गेल्या सात दिवसांपासून पंढरपूर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून पहाटे चार वाजल्यापासून भीमा नदी पात्रात सुमारे ५० हजार क्युसेस इतके पाणी सोडण्यात आले आहे, यामुळे नदीकाठच्या रस्त्यांवरील वाहतूक धोकादायक बनली असुन नागरिकांच्या सुरक्षितता साठी तालुका पोलीस स्टेशन यांच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पाण्याचा प्रवाह वेगवेगळ्या बंधाऱ्यातून सोडण्यात आल्यामुळे पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मुंडेवाडी हा पुल सुमारे चार फूट पाण्याखाली गेलेला आहे अजनसोन हा पूल सुमारे तीन फूट पाण्याखाली गेलेला आहे त्याचप्रमाणे जुना दगडी पूल सुमारे चार फूट पाण्याखाली गेलेला आहे सदर ठिकाणी ट्रॅफिकचे कर्मचारी नेमण्यात आलेले असून तिन्ही पुलावर्ती लोखंडी व बांबूची बॅरिगेटिंग करण्यात आलेली आहे तिन्ही पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेले असून कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून सदर ठिकाणी ट्रॅफिकचे कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत  अशी माहिती  तालुका पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक...

पाण्याने वेढलेल्या तीन साधूंची पोलीसांनी केली सुटका, पुराच्या पाण्याने वेढले मंदिराला, गुरसाळे येथील घटना.

Image
 पाण्याने वेढलेल्या मंदिरात अडकली महाराज मंडळी* *पंढरपूर तालुका पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीमने काढले बाहेर , गोळा झाली टीम सारी . पंढरपूर (प्रतिनीधी)_ सोमवारी सकाळी पंढरपूर तालुक्यात अजब घटना घडली. पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गुरसाळे या गावचे भीमा नदीचे पात्रात नदीच्या कडेला असलेल्या मंदिरामध्ये तीन भाविक मंदिरामध्ये चारी बाजूने पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे , मंदिराच्या मध्यभागी पाण्यामध्ये अडकलेले होते. याची माहिती पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला मिळाली . तेथून प्रशासनाची धावपळ सुरू झाली .  पंढरपूरचे तहसीलदार  लंगुटे,  तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेतलेले पोलीस हवालदार सागर गवळी ,पोलीस हवालदार गजानन माळी, पोलीस हवालदार विजयकुमार आवटी, व पुण्यामध्ये पटाईत असलेले पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण खेडकर तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे इतर लोक यांच्याबरोबर स्वतः त्या ठिकाणी गुरसाळे नदीपात्राच्या ब्रिजपाशी जाऊन ,‌पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची टीम व आपत्ती व्यवस्थापनाची टीम त्या ठिकाण...

चोखा चोखट निर्मळ.

Image
  चोखा चोखट निर्मळ पंढरीच्या भक्तीवाटेवर चालताना *सर्वांना आहे येथ अधिकार*  अशी ज्ञानेश्वर माऊलींनी समाजाला जाणीव करून दिली. त्यामुळे शुद्रादि सामान्य माणसे, स्त्रिया पुढे येवून धाडसाने विठ्ठलभक्तीतून  आपले विचार व्यक्त करू लागले. त्यामधील एक ठळक नाव म्हणजे चोखामेळा!!       चोखामेळा शुद्र जातीत जन्माला आले. धर्मग्रंथ न वाचताही  त्यांनी उत्कट भक्तीने परमेश्वराला प्राप्त केले. चोखामेळ्याची बायको सोयराबाई,बहीण निर्मळा, मेहुणा बंका, पुत्र कर्ममेळा हेही विठ्ठल भक्तीमुळे संतपदाला पोहोचले. चोखामेळ्याचे साडेतीनशे अभंग उपलब्ध आहेत. चोखोबा अशिक्षित होते. त्यावेळी जातीपातीची बंधने कडक होती. तरीही त्यांचे उत्कट भक्तीने ओतप्रोत असलेले अभंग अनंत भट्ट नावाच्या ब्राह्मण व्यक्तीने लिहून ठेवले आहेत. याचा उल्लेख जनाबाईंनी आपल्या अभंगात केला आहे.यावरून आठशे वर्षांपूर्वीच्या कर्मठ काळात वारकरी संप्रदायाचे कार्य किती सर्वसमावेशक होते याची कल्पना येते.  पत्नी सोयराबाईंची उपलब्ध अभंग रचना फार थोडी आहे. पण जी आहे ती अत्यंत उत्कट आहे.    *अवघा रंग एक झाला रं...

न मातू परदैवतम.

Image
 *न मातुः परं दैवतम्!* *आईसारखे दैवत दुसरे या जगतावर नाही* *म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अआई*  आज मातृदिन!! आईची उणीव क्षणोक्षणी जाणवते. रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने तिची आठवण येते. पंढरपूर ला गेल्यावर कुठून तरी येईल, मायेनं विचारपूस करेल किंवा काही कारणाने रागावेल असं वाटत राहतं..पण ती नाही हे सत्य स्विकारून डोळ्यात पाणी येते. तिच्या अस्तित्वाच्या खुणा तिथं आजही विखुरलेल्या आहेत. माझी आई मालती, माझे वडील शरद मोरेश्वर उत्पात यांची अर्धांगिनी म्हणून उत्पातांच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी आली. तिचे वडील पुरुषोत्तम आबाजी देशपांडे वतनदार होते. जातिवंत शेतकरी होते. सोलापुरात चार चौकी दगडी कमानी चा वाडा, गाईगुरे, जमीन जुमला, नोकर चाकर, अशा संपन्न घरातून आमच्या भागवत धर्माचे संस्कार असलेल्या व माणुसकीची अमाप संपत्ती असलेल्या घरात आली. तिचे साऱ्या घराने खूप मनापासून स्वागत केले. माझे आजोबा मोरेश्वर उत्पात यांच्या दुःखद निधनाची पार्श्वभूमी त्यांच्या लग्नाच्या वेळेस होती. एकत्र कुटुंब. घरात सख्या सासू सोबत चुलत, मावस आणि आते सासुबाई अशा चार सासुबाई, एक थोरली जाऊ अशा पाचजणींच्या देखर...

पालखी मार्गावरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद.

Image
 पालखी मार्गावरील अपुर्ण कामे तातडीने पुर्ण करावीत                                                     -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद                                                       *यात्रा कालावधीत वारकरी भाविकांच्या आवश्यक सर्व सोयी-सुविधेला प्राधान्य द्यावे  *पालखी मार्ग, तळांवर शौचालय, हिरकणी कक्ष, चेजिंग रुमची संख्या वाढवावी             पंढरपूर, (प्रतिनिधी )- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा ६ जुलै २०२५ रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ३० जून  तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे १ जुलै २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. या पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संताच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्...

आठ दिवसात पीक विमा संदर्भात तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आ. समाधान आवताडे यांचा पीक विमा अधिकाऱ्यांना सूचना.

Image
 आठ दिवसात पिक विमा संदर्भातील सर्व तक्रारींचा निपटारा करा आमदार समाधान अवताडे यांचा विमा अधिकाऱ्यांना इशारा प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मंगळवेढा मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांनी भरलेल्या खरीप पिक विम्यामध्ये विमा कंपनीकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता केली असून अर्धा हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यालाही 5197  व 3 हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याला ही 5197 रुपयेच विमा मंजूर केला असल्याचे शेतकऱ्यांनी आमदार समाधान आवताडे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत उघडकीस आणले त्यामुळे विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना आमदार समाधान आवताडे यांनी जाब विचारत आठ दिवसात शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारी मार्गी लावा अन्यथा मी तुमच्या वरिष्ठासोबत शासन स्तरावर बैठक लावून विमा कंपनीवर कारवाई करण्यास भाग पाडेन असा इशारा आमदार समाधान आवताडे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे,तालुका कृषी अधिकारी मंगळवेढा मनीषा मिसाळ,पंढरपूर तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी उमेश पळसे माज...

पंढरपूर तालुका पोलिसांची कामगिरी वाळू माफियांवर दणका, पंचेचाळीस लाख २४हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

Image
 *पंढरपूर तालुका पोलिसांची वाळू माफियाविरुद्ध मोठी कारवाई.  पंचेचाळीस लाख चोवीस हजार रुपयाचा मुद्देमाल पंढरपूर जप्त. पंढरपूर(प्रतिनिधि) पंढरपूर तालुका पोलिसांची वाळू तस्करां विरुद्धची मोहीम सुरूच असून कारवाया होत आहेत. शुक्रवारी पहाटे तालुका पोलिसांनी पुन्हा मोठी कारवाई केली असून, यामध्ये चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर मला लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  शुक्रवार दि. ९ मे रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली , पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले ,पीएसआय विजू गायकवाड ,पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगेश रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण खेडकर, यांच्या पथकाने गोपनीय मिळालेल्या माहितीच्या आधारे ओझेवाडी येथील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करताना एक लोखंडी टिप्पर  तसेच एक जेसीबी , व चार ब्रास वाळू एकूण किंमत ४५ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे . सदर अवैध वाळू चोरी प्रकरणी आरोपी मंगेश बाबुराव जाधव रा.सिद्धेवाडी आणि विजय लहू भो...