पहलगाम बांगला देश हिंदु अत्याचार विरोधात पंढरीत निषेध आंदोलन.


 पहलगाम, बांगला देशातील अत्याचारा विरोधात पंढरीत  निषेध आंदोलन.

 पंढरपूर(प्रतिनिधि )_

जम्मू कश्मीर येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या आतंकी हल्ल्याच्या पश्चिम बंगाल मधील होत असलेल्या हिंदू वारी अत्याचार व बांगलादेशातील होणाऱ्या अत्याचार निषेधार्थ पंढरपूर मधील सकल हिंदुत्ववादी संघनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र निदर्शने  गुरुवार दि.२४रोजी करण्यात आली.


या वेळी मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, महाराज मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक, पार्टीचे कार्यकर्त्यांनी, वारकरी-धारकरी, पंढरपूरकर नागरीकांनी आंदोलनात सहभाग घेऊन निषेध व्यक्त केला.


आतंकवादयाचा  व पाकिस्तानचा झेंडा जाळून कार्यकर्त्यांनी मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, जलादो जलादो पाकिस्तान जलादो, एक धक्का ओर दो पाकिस्तान तोड दो, भारत माता की जय च्या जयघोषात तीव्र आंदोलन केले.

या आंदोलनात विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, भाजप, हिंदु महासभा, पेशवा युवा मंच आदी हिंदुत्ववादी संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बांगला देशात सूरू असलेल्या हिंदु लोकांच्या 

 अन्याय, अत्याचाराची माहिती देऊन अशा घातक वृत्तीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.

त्यावेळी सौरभ थिटे पाटील,  भाजपा महिला आघाडी मोर्चा जिल्हाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे,  शहराध्यक्षा ज्योती शेटे, धीरज म्हमाणे, अण्णा धोत्रे, विश्वास कारंडे, सुप्रिया काकडे, सुवर्णा कुर णावळ, अंजना जाधव,रामेश्वर कोरे, तुकाराम चिंचणींकर, माजी नगरसेवक ऋषिकेश उत्पात, शैलेश बडवे, वासुदेव उत्पात, गणेश लंके, मकरंद बडवे, मिलिंद बडवे, विवेक बेणारे ,  महेश खिस्ते आदी उपस्थित होते.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.