पंढरपूर येथे श्री हनुमान जयंतीनिमित्त व्यापारी कमिटी यांच्या वतीने कुस्तीस्पर्धा संपन्न .
पंढरपूर येथे हनुमान जयंतीनिमित्त व्यापारी कमिटी यांच्या वतीने कुस्तिस्पर्धा संपन्न.
गंगावेस कोल्हापूरने प्रथम क्रमांक पटकावला.
पंढरपूर (प्रतिनीधी)_
पंढरपूर येथे सुमारे १५१ वर्षांची परंपरा असलेल्या हनुमान जन्मोत्सवानिमित्त व्यापारी कमिटी नवी पेठ पंढरपूर यांच्या वतीने भव्य कुस्त्यांचे मैदान आयोजित केले होते.
कै. औदुंबर तुकाराम म्हमाने यांच्या स्मरणार्थ कै. विश्वनाथ औदुंबर म्हमाने यांनी बांधलेल्या कुस्त्यांच्या हौदामध्ये हा सोहळा आयोजित केला होता.
यावेळेस इनाम रुपये २०० पासून ते रुपये ५हजार पर्यंत कुस्त्या नेमण्यात आल्या होत्या.
तसेच पंढरपूर व्यापारी कमिटी पंढरपूर केसरी ही स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेमध्ये व्यापार कमिटी केसरी 'किताब चांदीची गदा व ५२हजार रोहन पवार (गंगावेस तालीम कोल्हापूर)यांनी हा बहुमान पटकाविला.
अंतिम कुस्ती रोहन पवार विरुद्ध रवी निंबाळकर यांच्या मध्ये ही लढत झाली होती.
दुसरा क्रमांक च्या पैलवान रवी निंबाळकर (पुणे )यास ३१हजार ₹ रोख.
तृतीय क्रमांक व चतुर्थ क्रमांका साठी पै. सुनील कोटगुंड (गंगावेस तालीम) विरुद्ध पै. उदय खांडेकर (बामणी)यांच्या मध्ये लढत झाली या मध्ये पै. सुनील कोटगुंड विजयी होऊन तृतीय बक्षीस २१हजार-₹ मिळविले व पै. उदय खांडेकर यांनी चौथ्या क्रमांकाचे ११हजार/ पटकविले.
या कुस्त्या व स्पर्धेसाठी
शाहू विजय गंगावेस तालीम कोल्हापूर, पुणे तालीम, हिंदकेसरी तालीम बामणी, शिवनेरी तालीम अकलूज,
पाटकुल तालीम, मोहोळ तालीम, वाखरी तालीम, पैलवान अस्लम काझी तालीम कुर्डूवाडी, खडूस तालीम, निमगाव तालीम (मगरांचे ), विठ्ठल आखाडा, पेनूर तालीम, बाभुळगाव तालीम, या तालमीतील नामांकित मल्लानी सहभाग नोंदवला.
या कुस्त्यासाठी पंचक्रोशीत जुने पैलवान व वस्ताद मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांचा व्यापारी कमिटी नविपेठ पंढरपूर यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
लोकप्रिय असलेल्या या कुस्त्या पाहण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील हजारो कुस्ती शौकिनानी गर्दी केली होती.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment