स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या १३विद्यार्थ्यांची गेट परीक्षेत निवड.


 स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या १३ विद्यार्थ्यांचे 'गेट' परीक्षेमध्ये उज्वल यश

पंढरपूर-(प्रतिनिधी )तंत्रशिक्षणामध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील 'गेट' (ग्रॅज्युएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग) या परीक्षेमध्ये गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या  कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सिव्हील इंजिनिअरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग  या तिन्ही विभागातून १३ विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. 'गेट' या परीक्षेत प्रत्येक वर्षी स्वेरीचे विद्यार्थी चमकतात. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.   

        राष्ट्रीय स्तरावरील ‘गेट’ या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत आणि आय.आय.एस.सी. आणि आय.आय.टी. या उच्च तंत्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या 'गेट-२०२५' या परीक्षेमध्ये स्वेरीज् कॉलेज ऑफ  इंजिनिअरिंगच्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षात शिक्षण घेणारे अमोल दत्तात्रय जाधव, गणेश राजाराम कचरे, तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या वैष्णवी विलास मस्के, अंतिम वर्षात शिकणाऱ्या तेजस्विनी तानाजी निकम, जय बाळासाहेब जाधवर, कोमल शिवाजी कसबे आणि रोहिणी पांडुरंग बागल हे सात विद्यार्थी आणि अमोल दत्तात्रय जाधव यांचा कॉम्प्यूटर सायन्स विषयात ७४७ वा क्रमांक  तर डाटा सायन्स या विषयात देखील त्यांनी यश संपादन केले आहे. त्यामुळे या गुणवत्ता यादीत अमोल दत्तात्रय जाधव यांना दुहेरी यश मिळाले आहे. कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील ८ विद्यार्थी, सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील भीमाशंकर राजशेखर तुकमल्ली, रोहन राजेश ताटीपामल, अभिषेक सुरेश निंबाळ व रवि अनिल मस्तूद असे ४ विद्यार्थी तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षातील रोहित अशोक तळेकर असे मिळून तिन्ही विभागातील एकूण १३ विद्यार्थी हे गेट परीक्षेत यशस्वी झाले. अत्यंत अवघड स्वरुपाच्या असणाऱ्या या परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची आणि उच्च करिअरची दारे खुली होत असतात. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांचे विद्यार्थ्यांसाठीचे विकासात्मक धोरण, नियोजनात्मक मार्गदर्शन आणि उच्चशिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने स्वेरीत 'गेट' परीक्षेची तयार करून घेतली जाते. यामध्ये प्रत्येक वर्षी विविध विषयांचे मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातात. या व्यतिरिक्त ‘ॲडव्हान्सड टेक्निकल ट्रेनिंग’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अशा परीक्षांसाठी आवश्यक संपूर्ण तयारी करून घेतली जाते. वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या टेस्ट आणि त्यांचे विश्लेषण यामधून विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणातील अद्ययावत माहिती मिळते. त्यामुळे स्वेरीतील विद्यार्थ्यांना अशा परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळते. या परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारे सर्व स्टडी मटेरियल हे स्वेरीच्या नूतन इमारतीत असलेल्या मुख्य लायब्ररीमधून उपलब्ध करून दिले जाते. तसेच 'गेट ट्यूटर' या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 'गेट' संदर्भात अधिक माहिती मिळून परीक्षेच्या दृष्टीने सखोल तयारी करण्यास मदत मिळते. 'गेट' ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आय.आय.टी, एन.आय.टी. सारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळतो. त्याबरोबरच या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘पब्लिक सेक्टर' मधील कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या आणि उच्चपदाच्या नोकरीसाठी संधी मिळतात. स्वेरीचे अभियांत्रिकी महाविद्यालय हे वार्षिक परीक्षांचे निकाल, प्लेसमेंट व प्रत्येक वर्षाची प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या महत्वाच्या बाबीमध्ये कायम अग्रेसर राहिलेले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.स्वाती पवार, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे प्रा. अविनाश मोटे व विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. गेट परीक्षेत उज्वल यश मिळवलेल्या या विद्यार्थ्यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख यांच्यासह इतर विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ.एम.एम. पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, स्वेरी अंतर्गत असणाऱ्या डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.