माघी वारीसाठी चन्द्रभागा नदीत सोडले पाणी.


 माघी यात्रेसाठी  चंद्रभागा नदीपात्रात सोडले पाणी

                  वारकरी, भाविकांना चंद्रभागा नदीत करता येणार पवित्र स्नान 

          पंढरपूर दि.06:- माघ  शुध्द एकादशी  08 फेब्रुवारी  2025 रोजी असून, माघ  यात्रा कालावधी     दि. 02 ते 12 फेब्रुवारी आहे.  या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. वारकऱ्यांसाठी चंद्रभागेचे स्नान फार पवित्र मानले जाते.श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेचे दर्शन घेण्यापुर्वी भाविक चंद्रभागा स्नान करतात. भाविकांना चंद्रभागाभागा नदी पात्रात पवित्र स्नान करता यावे. यासाठी दगडी पूला जवळील बंधाऱ्यातून 240 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे.            

चंद्रभागा नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याने व जास्त काळ पाणी साठून राहिल्याने पाण्यावर शेवाळे येऊन पाणी जास्त काळ साठल्याने पाणी घाण झाले होते .  उपविभागीय अधिकारी  सचिन इथापे यांनी तातडीने कार्यकारी अभियंता भीमा पाटबंधारे विभाग व पंढरपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून गुरसाळे व  नगर परिषदेच्या बंधारे  मधून तातडीने सहा दरवाजे उघडून नदी पत्रामध्ये पाणी सोडण्याबाबत सूचना दिल्या . त्या अनुषंगाने  गुरसाळे बंधाऱ्यातून व नगर परिषदेच्या बंधार्‍यामधून भाविकांचे सोयीसाठी बंधाऱ्याचे सहा दरवाजे उघडून चंद्रभागा नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आल्याने व माघी यात्रेमध्ये भाविकांना स्नानासाठी पाणी उपलब्ध झाल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे 

             तसेच नदीपात्रामध्ये सध्या पाण्याची रिसायकलिंग करून पाणी स्वच्छ करण्याची यंत्रणा बसवण्याचे काम सध्या प्रगतीपथावर असून, सदरची  यंत्रणा आषाढी यात्रेपूर्वी कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.