पंढरीत पिस्तूल लावुन फिरणाऱ्या युवकास ताब्यात घेतले.
पंढरपुर पोलिसांची सातत्याने धडाकेबाज दमदार कामगीरी.
पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या युवकास ताब्यात घेतले.
पंढरपूर(प्रतिनिधी )_
पंढरपुर शहर पोलिसानी सातत्याने धडाकेबाज कामगिरी करत गुन्हेगारीस
आळा घालण्याचे काम सुरू ठेवले आहे.शहरामध्ये कंबरेला पिस्तूल लावुन फिरणाऱ्या एका युवकास ताब्यात घेतले असून हे पिस्तुल घेऊन तो का फिरत होता? याची चौकशी सुरू आहे. याबाबत माहिती अशी गुरुवार
दि २० रोजी पंढरपुर पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहिती नुसार जुना दगडी पुलाजवळ नविन पुलाचे खाली गाळा क्र. ०३ मध्ये एक इसम संशयीतपणे वावरताना दिसला. त्यास पोलीस पथक पकडणेस जात असताना तो पळून जाणेचे तयारीत असताना त्यास पोलीसांनी गराडा घालुन जागीच पकडले. पकडलेले इसमास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव लखन चंद्रकांत ननवरे वय ३५ वर्षे रा. आंबाबाई पटांगण, पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापूर असे असलेचे सांगीतले. पकडलेल्या इसमाची अंगझडतीमध्ये कमरेचे उजव्या बाजूस एक लोखंडी देशी बनावटीचे एक पिस्तूल मॅक्झीनसह मिळाले. पकडलेले इसमास पिस्टल वापरण्याचा परवाना बाबत विचारले असता त्याने नसल्याचे सांगीतल्याने त्यास अटक केली आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,.अपर पोलीस अधिक्षक - . प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग .डॉ. अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे.. विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, राजेश गोसावी, शरद कदम, कल्याण ढवणे, सिरमा गोडसे, सुरज हेंबाडे, प्रसाद औटी, सचिन हेंबाडे, विठ्ठल विभुते, शहाजी मंडले, समाधान माने, बजरंग बिचुकले, निलेश कांबळे तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीण चे रतन जाधव यांनी केली आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment