स्वा. वि. दा सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानमाला.


 स्वा  वि. दा सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानमाला.

 पंढरपूर(प्रतिनिधी )_स्वातंत्र्यवीर वि. दा सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंढरपूर येथील सावरकर मुक्तद्वार वाचनालय यांच्या वतीने हीरक महोत्सवी व्याख्यानमालेचे आयोजन सोमवार दि.२४ते बुधवार दि२६या कालावधीत स्टेशन रोड येथील सावरकर मुक्तद्वार वाचनालय येथे करण्यात आले आहे.

सोमवारी नाशिक येथील माधवदास राठी कुंभमेळ्याचा ईतिहास, यावर व्याख्यान देणार आहेत.

नागपूर येथील संजय कठाळे हे मंगळवार दि २५रोजी नर्मदा परिक्रमा 

या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

शेवटच्या दिवशी बुधवार दि.२६रोजी पंढरपूर येथील तुकाराम चिंचणीकर हे चर्चात्मक कार्यक्रम घेणार असुन रामायण _महाभारत शंका आणि निरसन असे कार्यक्रमाचे स्वरूप असेल.

या सर्व व्याख्यानांना आवर्जून सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष मोहन मंगळवेढेकर यांनी केले आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.