पंढरपूर येथील मंदिर समिति अन्नछत्राची वेळ वाढविण्यासाठी निवेदन, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. आरती बसवंती यांनी मंत्री गोगावले यांना दिले निवेदन.
पंढरपूर येथील श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती अन्नछत्राची ची वेळ वाढवा, महिलांसाठी कायमस्वरूपी चंद्रभागेच्या वाळवंटात चेंजिंग रुम करा - सोलापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आरती बसवंती यांची मागणी ; मंत्री भरतशेठ गोगावले यांना दिले निवेदन.
पंढरपूर (प्रतिनिधी):
श्री क्षेत्र पंढरपूर येथील भाविकांची वाढती संख्या विचारात घेता श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्राची वेळ वाढवावी यासह इतर अशी मागण्या सोलापूर जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सौ. आरती ओंकार बसवंती यांनी मंत्री भरतशेठ गोगावले यांना एका निवेदनाद्वारे केल्या आहेत.
श्री क्षेत्र अक्कलकोट येथील अन्नछत्रशी तुलना करता पंढरपूरची भाविक संख्या, देणगीदार यांची संख्या असंख्य असूनही भाविकाना सुविधांचा अभाव जाणवत आहे.
अन्नछत्राची सध्याची वेळ दुपारी १२.०० ते दुपारी २.०० आहे, ती वाढवूण दुपारी १२.०० ते दुपारी ३.०० करण्यात यावी. तसेच रात्री देखील अन्नछत्राची सोय करण्यात यावी. तरी अन्नछत्र वेळ वाढवणे या मागणीचा जाणीवपूर्वक विचार व्हावा व ही मागणी मान्य व्हावी याचबरोबर नदीपात्रात महिलांसाठी चेजिंग रूम कायम स्वरूपी व्हावेत,
श्री क्षेत्र पंढरपूर येथे महिला भाविकांना नदीपात्रात स्नानानंतर चेजिंग रूम उपलब्ध नसल्याने महिला भाविकांची असुविधा होते. त्यासाठी नदीपात्रात कायम स्वरूपी चेजिंग रूम निर्माण करण्यात याव्यात तसेच हिरकणी कक्ष पण निर्माण करावेत अशा मागण्या सौ. बसवंती यांनी केल्या आहेत.
वारकरी भाविक यांच्या हिताचा सहानुभूती पूर्वक विचार करून वरील मागण्या मान्य कराव्यात, असेही त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मंत्री भरतशेठ गोगावले हे पंढरपूर दौऱ्यावर असताना सौ. बसवंती व कार्यकर्त्यांनी हे निवेदन दिले आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख सौ.रूपाली मलपे, माढा विधानसभा प्रमुख संगीता पिसे, माळशिरस तालुकाप्रमुख सोनाली गायकवाड, उपजिल्हाप्रमुख सौ रंजना शिंदे, पंढरपूर तालुकाप्रमुख बाबर व मोहोळ चे आमदार राजू खरे व आदी उपस्थित होते.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment