बोलेरो जीपसह १९लाख वीस हजार रुपयांचा गुटखा जप्त, शहर पोलिसांची कारवाई.


 पंढरपुर शहर पोलिसांनी बोलेरो जीपसह १९लाख २०हजार रू. किंमतीचा गुटखा जप्त केला.

 पंढरपूर(प्रतिनिधी )_

पंढरपुर येथे सांगोला रोड भागात विक्रम धाब्याजवळ अवैध व चोरटी वाहतुक करणाऱ्या बोलेरो जीपसह १९लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल शहर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

रविवार दी.१६रोजी रात्री साडे नऊ वा. सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

 गोपनीय सूत्रानुसार माहिती  मिळाली की, एक बदामी रंगाच्या मालवाहतुक पिकअपमध्ये  गुटखा  सांगोल्याचे दिशेने पंढरपुर मार्गे टेंभुर्णीकडे जात आहे  . त्यानुसार पोलिसांनी विक्रम ढाबा समोर सापळा लावला रवीवारी रात्री ०९/३० वा चे सुमारास  मालवाहतुक पिकअप हा विक्रम ढाब्यासमोर रोडवर आला असता तो गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी थांबवुन पिकअप चालकाकडे पिकअप मधील मालाबाबत विचारणा केली असता पिकअप चालकाने गाडीमध्ये प्रतिबंधीत असलेला विमल पान मसाला, आर. एम. डी पानमसाला व एम सुगंधित तंबाखु असलेचे सांगीतले. यामुळे  पिकअप नं एम.एच-१० डीटी ४५१७ व  त्याच  असलेला गुटखा जप्त करण्यात आला.तसेच पिकअप चे चालकास ताब्यात घेवुन सदरचा मुद्देमाल पोलीस ठाणेस आणला.

जप्त करणेत पिकअप व प्रतिबंधीत केलेला गुटखा एकुण मुद्देमाल खालीलप्रमाणे,


 ६, लाख- रू.  किंमतीचा विमल कंपनीचा पान मसाला :- २५ पोती

 एक लाख,९८, हजार/- रू. किंमतीचा  विमल मसाला पाच पोती 

 ६०, हजार/- रू.  किंमतीची एम-कंपनीची सुगंधित तंबाखु- १०० बॉक्स

 ९०हजार रू  किंमतीचा आर. एम. डी कंपनीचा पान मसाला-१०० बॉक्स दीड लाख  किंमतीची व्ही १ कंपनीची सुगंधित तंबाखु ५ पोती

 २२हजार रू.  किंमतीची व्ही १ कंपनीची सुगंधित तंबाखु :- १ पोते

 ऐशी हजार रू किं एक महिंद्रा कंपनीचा बोलेरा पिकअप नं एम. एच-१० डीटी ४५१७ असा 

एकुण १९, लाख वीस हजार रू किंमतीचा मुददेमाल चालकासह ताब्यात घेतला.

 पोलीस अधिक्षक  अतुल कुलकर्णी , अप्पर पोलीस अधिक्षक . प्रितमकुमार यावलकर , उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग,. डॉ. अर्जुन भोसले पोलीस निरीक्षक,  शहर  विश्वजीत घोडके , यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण  सपोनि आशिष कांबळे,  राजेश गोसावी, शरद कदम, कल्याण ढवणे, सुरज हेंबाडे, सिरमा गोडसे, सचिन हेंबाडे, प्रसाद औटी, सचिन इंगळे, शहाजी मंडले, समाधान माने, बजरंग बिचकुले, निलेश कांबळे, तुकाराम व्हरे यांनी केली आहे

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.