माजी आमदार प्रशांत परिचारक यांना पितृशोक.


 मा.आ. प्रशांत परिचारक यांना पितृशोक

पंढरपूर-(प्रतिनिधी )माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील ॲड.प्रभाकरराव उर्फ बाबा रामचंद्र परिचारक (वय- ९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात माजी आमदार प्रशांत परिचारक, युटोपियन कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक व महेश परिचारक हे तीन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

माजी आमदार स्व. सुधाकरपंत परिचारक यांचे थोरले बंधू असणाऱ्या प्रभाकर परिचारक यांनी त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यात खंबीरपणे पाठीमागे राहून मोठी जबाबदारी पार पडली होती. पंढरपूर येथील न्यायालयात काही वर्ष त्यांनी वकील म्हणूनही काम केले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंढरपूर शहर व तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. येथील वैकुंठ स्मशानभूमी सायंकाळी साडे सहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.