लक्ष्मी टाकळी येथे घरगुती वादातून मित्रानेच केला मित्राचा खून.
लक्ष्मी टाकळी येथे घरगुती वादातून मित्रानेच केला मित्राचा खून.
पंढरपूर.(प्रतिनिधी)_
पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे घरगुती वादातून मित्रानेच आपल्या मित्राचा चिडून जाऊन चाकूने भोसकून खून केल्याची घटना सोमवार दि २८रोजी घडली.
मित्राने जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर दोघात कडाक्याचे भांडणं झाले, यात चाकूने मारहाण करत मित्राचा खून केल्याने उडाली खळबळ
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी मयत सिद्धेश्वर मच्छिंद्र पवार वय ३९ वर्षे राहणार देवकाते मळा टाकळी रोड हा आपला मित्र औदुंबर गाढवे यांच्या घरासमोर सोमवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास गेला असता त्या ठिकाणी मयत सिद्धेश्वर पवार व आरोपी औदुंबर गाढवे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. यावेळी या बाचाबाची ची घरगुती कारण असल्याने जाब विचारताना भांडणात रूपांतर होऊन आरोपीने पवार वर चाकूने हल्ला केला या हल्यात सिद्धेश्वर पवार हा मयत झाला. या घटनेची माहिती मयताची पत्नी हीने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात देऊन गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान सध्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेऊन आरोपीच्या शोधासाठी पथक तयार करून रवाना केले. हत्येनंतर काही तासातच आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्या आदेशाने सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई वडणे हे करीत आहेत.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment