नटराज भरतनाट्य क्लासेस तर्फे जास्तीत जास्त शास्त्रीय नृत्यांगना होवोत,_प्रा. कैलाश करांडे.
सौ. लक्ष्मी बडवे संचलीत नटराज भरतनाट्यम क्लासेसच्या वतीने
जास्तीतजास्त शास्त्रीय नृत्यांगना घडाव्यात! ..... डॉ. कैलाश करांडे
पंढरपूर (प्रतिनिधी)-
यावर्षी नवरात्रीचे औचित्य साधून प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सहकार्याने, सौ. लक्ष्मीताई बडवे यांच्या वतीने नृत्य आराधना हा शास्त्रीय नृत्य कलाविष्कार तुकाराम भवन येथे संपन्न झाला.
सुरुवातीला पंढरीतील नामवंत सिंहगड इंजिनियरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे, निवेदिका सौ. अर्चना पुजारी मॅडम, विठ्ठल रुक्मिणी समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब,व्यवस्थापक मनोज श्रोत्री, अभिनेते व कलासाधना सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत महाजन बडवे व नटराज भरतनाट्य क्लासेसच्या संस्थापिका सौ. लक्ष्मीताई बडवे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी डॉ. करांडे बोलत होते. गेली दोन दशके पंढरीस अविरतपणे सुरु असलेल्या नटराज भरतनाट्यम या संस्थेने विशारद, अलंकार या परिक्षेतही अत्यंत चांगल्या गुणवत्तेने अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे सांगून यामागे सौ. लक्ष्मी बडवे यांचे मोठे योगदान असल्याचे मत विषद केले.
अल्लारिपु या नृत्याविष्काराने सुरु झालेल्या या कार्यक्रमात अनेक कलाविष्कार सादर झाले. त्या सर्व कलाविष्कारांना रसीक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कलाविष्कारात कु. श्रेया बडवे, श्रुती कुलकर्णी,सृष्टी बजाज व समृध्दी आमले यांनी आपल्या अप्रतीम मुद्राभिनयाने रसीक प्रेक्षकांची प्रचंड टाळ्यांच्या वर्षावात दाद मिळवली. या कार्यक्रमात एकुण लहान मोठ्या मिळून ५० कलाकारांनी आपली कला सादर केली. अविरतपणे सलग १८वर्षे सौ. लक्ष्मीताई यांनी हा नृत्य यज्ञ सुरु ठेवल्या बद्दल डॉ. करांडे यांनी बडवे मॅडमचे विशेष कौतुक केले. डॉ करांडे यांचा सत्कार पंढरीतील नामवंत डॉक्टर प्रविदत्त वांगीकर यांच्या हस्ते करण्यात आला तर नटराज भरतनाट्यम क्लासेसच्या जडणघडणीत अविरतपणे साथ दिल्याबद्दल सौ. अर्चना पुजारी मॅडम यांचा व डॉ. कैलास करांडे यांच्या सुविद्य पत्नी सौ. निशा करांडे मॅडम व मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांच्या सुविद्य पत्नी सौ.मिनल शेळके मॅडम यांचा सत्कार सौ. लक्ष्मी बडवे हस्ते करण्यात आला. तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांचाही सत्कार संस्थेच्या वतीने नारायण बडवे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मंदिर समितिच्या वतीने सहभागी कलाकार व संचालिका सौ. लक्ष्मी बडवे यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी प्रथमच मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापक हे स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याने कलाकारांना विशेष उत्तेजन व प्रोत्साहन मिळाले.
या कार्यक्रमास परिसरातील रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायण बडवे, उन्मेश बडवे,मंदिर समितीचे राजा कुलकर्णी, सुधीर घोडके, सौ. मृणाल बडवे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत महाजन यांनी केले तर आभार सौ. मृणाल बडवे यांनी मानले.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment