भा ज पा महीला आघाडी मोर्चा जिल्हाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे यांना मातृशोक.


 भा ज पा जिल्हाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे यांना मातृशोक. 

पंढरपूर , प्रतिनिधी -

पंढरपूर येथील भा ज पा महीला आघाडी मोर्चा जिल्हाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे यांच्या मातोश्री श्रीमती पुष्पा गोपाळराव बेणारे यांचे गुरुवार दिनांक 10ऑक्टोबर रोजी सकाळी साडे आठ वाजता वार्धक्याने निधन झाले,

त्यांचे वय 72होते,

श्रीमती पुष्पा बेणारे या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या, 

मायाळू स्वभावाच्या होत्या,

संत साहित्याचा मोठा अभ्यास त्यांचा होता,

संत साहित्यावर दिवंगत डॉ गोपाळराव बेणारे यांनी अनेक पुस्तके लिहिली, संत साहित्यावर लिखाण केले, यात पुष्पाताई बेणारे यांनी खूप मोलाची मदत केली,  पतीच्या अकाली निधनानंतर अचानक कोसळलेल्या संकटावर मात करून त्यांनी कुणाचीही साथ नसताना संसाराचा गाडा पुढे नेला,

एकुलत्या एक मुलीला डॉ केले, अनेक कठीण प्रसंगात मोलाची साथ देऊन खंबीर भूमिका घेतली,

श्रीमती पुष्पा बेणारे या उत्तम गृहिणी , सुगरण होत्या, पै पाहूणे, डॉ प्राजक्ता यांचे सर्व मित्र मैत्रीणीना उत्तमोत्तम चविष्ट, पौष्टिक पदार्थ खाऊ 

घालत, षडरीपुपसून दूर राहून एखाद्या संतासारखे निष्पृह , निस्वार्थ जीवन त्या जगल्या,

गोफण परिवार डॉ प्राजक्ता बेणारे यांच्या दुःखात सहभागी आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.