पंढरपूर शहरात पंधरा लाख भाविकांची मांदियाळी विठू नामाच्या गजरात दुमदुमली पंढरी..


 पंढरपूर शहरात आषाढी यात्रेसाठी जमला 15 लाख भाविकांची मांदियाळी. 

 विठूनामाच्या गजरात दुमदुमली पंढरी.

पंढरपूर,( प्रतिनिधी ) आषाढी देवशयनी एकादशी या अनुपम्य सोहळ्यासाठी अध्यात्म नगरी पंढरपूर येथे पंधरा लाख भाविकांची मांदियाळी जमली आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखों भाविक सर्व प्रापंचिक विवंचना विसरून एकत्र आले आहेत.

. आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी इतर सर्व संतांच्या पालख्या, दिंड्या  सकाळपासूनच पंढरीत दाखल झालेल्या आहेत. कांहीं मानाच्या पालख्या, दिंड्या फक्त वाखरी येथील रिंगण सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा करुन दाखल होतात.  यंदाच्या हंगामात पाऊस चांगला झाल्याने आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी अंदाजे पंधरा लाख  भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. .पंढरपूर शहरालगतचा परिसर, भक्ती सागर 65 एकर परिसर, सांगोला चौक, शेगांव दुमाला, भटुंबरे, इसबावी आदी भागात वारकरी भाविक मोठ्या संख्येने विसावले आहेत. सावळ्या विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर पत्राशेडच्याही पुढे गेली आहे. पदस्पर्श दर्शनासाठी सुमारे 14 ते 16 तास वारकरी भाविकांना पायपीट करावी लागत आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने पंढरीत सुलभ शौचालय इमारती मोठ्या प्रमाणात उभारले असून देखील नगरपरिषदने पुन्हा तात्पुरते फॅब्रिक्सचे शौचालय उभा केले आहेत. या शौचालयांना पाण्याची व्यवस्था अपुरी असल्याचेचित्र दिसून येत आहे. 


 विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, स्टेशन रोड, नवी पेठ आदी भागात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. वारकरी भाविकांना लागणाऱ्या प्रासादिक वस्तू, तुळशी माळा, देवी देवतांचे फोटो, बच्चे कंपनीसाठीची खेळण्याची दुकाने भाविकांची वाट पाहत आहेत. आषाढी यात्रेसाठी आलेल्या भाविकांच्या, बच्चे कंपनीच्या करमणुकीसाठी सर्कस, मोठमोठे आकाश पाळणे टिळक स्मारक येथे आलेले आहेत. पंढरीत आलेले भाविक भजन, कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन झालेले आहेत.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.