पंढरी नगरीत अवतरली मायावी मनोरंजन नगरी.
पंढरी नगरीत अवतरली मायावी मनोरंजन नगरी.
मिनी एस्सेल वर्ल्ड ठरतेय आकर्षणाचा केंद्रबिंदू.
प्रतिनिधी पंढरपूर -आषाढीवारी मध्ये बाल गोपाळांसह अनेकांचे आकर्षण असलेले मिनी एस्सेलवर्ल्ड पंढरी नगरीत अवतरले असून ही मायावी अद्भूत मनोरंजननगरी हजारों भाविकांची पावले आपसूकच वळवत आहे.
दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये ही मायावी नगरी येते
उंचच उंच आकाशपाळणा , हे सर्वांत आकर्षणाचा बिंदू असतो, इलेक्ट्रिक जनारेटर च्या शक्तीवर गोलगोल फिरणारा आकाशपाळणा जेंव्हा उंचावर जातो त्यावेळी आसमंतातून भक्ति नगरी पंढरपूर शहराचे सौदर्य अलौकिक असते.
रात्रीच्या वेळी तर पंढरी नगरीचा नजारा काही वेगळाच असतो.
हा आकाशपाळणा वेगाने खाली येतो तेव्हा पोटात गोळा येऊन अनेक नवखे घाबरून ओरडायला लागतात.
आनंद,जोश, अनोखे थ्रिल अशा त्रिवेणी संगमाचा अनुभव भाविकासह शहर वासिय अनुभवत आहेत,
खिशाला परवडेल अशा माफक दरात विवीध राईड्स असल्यानं गरीब, सर्वसामान्य ते अगदी श्रीमंत घरातील मंडळी याचा मुक्त आनंद घेताना दिसतात.
गोलाकार आणि मधूनच तिरका होऊन फिरणारा मेरी गो राऊंड, धडाधड एकमेकांना धडकत जाणाऱ्या डॅशिंग कार्स, काळजाचा ठोका चुकवीत गोल मृत्युगोलात फिरणाऱ्या दोन वेगवान मोटार सायकल आणि एक मारूती कार, चिमुकल्यांचे आकर्षण असलेल्या पाण्यातील आगबोटी,
मिनी ट्रेन, जीवनातल्या विवीध समस्यांवर आपली भुमिका व्यक्त करणारे.
पन्नालाल गाढव ,अनेक चित्र विचित्र प्रश्न विचारले की हे गाढव प्रेक्षकांसमोर उभे राहते हा प्रकार अत्यंत विनोदी तेवढाच आफत आणणारा पण यातून मनोरंजन हाच एकमेव हेतू असतो.
वारी झाली तरी पुढे पंधरा दिवस हे मिनी एस्सेल वर्ल्ड गावातील स्थानिकांचे मनोरंजन करते.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment