फिनोलेक्स कंपनी मार्फत रेनकोट, बॅग्जचे वाटप आषाढी यात्रेत मोठे योगदान..
पंढरपूर येथील आषाढी वारीत फिनोलेक्स कंपनी मार्फत रेनकोट बॅग्ज , हरिपाठ चे मोफत वाटप.
पंढरपूर प्रतिनिधी-पंढरपूर येथे झालेल्या
आषाढी वारी मध्ये फिनोलेक्स पाइप इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी यांच्या वतीने मागील गेल्या पस्तीस वर्षापासून मोफत रेनकोट , टी पी बॅग्स तसेच भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा औषधोपचार केले जातात. तसेच दिंड्यामधून प्रवासात भाविकांना हरिपाठ देण्यात येतात. अशी माहिती फिनोलेक्स कंपनीचे जनरल मॅनेजर विश्वजीत हरवडे, सोलापूर विभाग प्रमुख गोपाळ अधोनी यांनी दिली.
याही वर्षी फीनोलेक्स या कंपनीने विवीध सेवा दिल्या आहेत.
श्री संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज पालखी, एकनाथ, मुक्ताबाई,गजानन, निवृत्तीनाथ यांच्या पालख्या येतं असतात, पुणे येथे मुकुल माधव फाउंडेशन व ससून हॉस्पिटल यांच्या द्वारे वैद्यकीय सेवा दीली जाते.
पुण्यानंतर भाविकाना पावसापासून संरक्षण देण्यासाठी दरवर्षी सुमारें एक लाख रेनकोट आणि चार लाख टी पी बॅग्स मोफत दिल्या जातात.
पंढरपूर येथे हरिकृपा डिजिटल चे संचालक श्रीराम बडवे यांच्या माध्यमातून पोलिसांना आठ हजार रेनकोट दिले जातात.
तसेच यात्रा कालावधीत विविध फलक पंढरपूर नगरपालिका, पोलीस स्टेशन, मंदीर समिती यांना हवे असतात, असे सूचना फलक कंपनी मार्फत दीले जातात. याप्रमाणेच बॅरे गेटिंग, लोखंडी मनोरे पुरविले जातात.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment