Posts

Showing posts from July, 2024

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन

Image
 श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन. पंढरपूर प्रतिनिधी -श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चे चेअरमन श्री अभिजीत आबा पाटील यांच्या 39व्या वाढदिवसा निमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य कुस्ती स्पर्धा,रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, महा आरोग्य शिबीर, गोरगरीब जनतेसाठी डोळे तपासणी शिबिर, आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अभिजीत आबा यांनी आपल्या  कुशल नियोजन आणि विकासाच्या दूरदृष्टीने  हजारो युवकांना रोजगानिर्मिती करुन त्यांना स्वावलंबी बनविले आहे. आज संपूर्ण राज्यात सहा साखर कारखाने यशस्वी पणे चालवून सहकारातील एक उत्तम आदर्ष दिला आहे. पंढरपूर येथे डी व्हि पी उद्योग समूह आलिशान मल्टीप्लेक्स थिएटर उभे करुन पंढरीच्या वैभवात भर टाकली, नव्या युगाला साजेसे मॉलयुग आणले, कोरोना काळात स्वखर्चाने हॉस्पिटल उभे करुन हजारो रुग्णांचे प्राण वाचविले, हॉस्पिटलना ऑक्सिजन सिलिंडर तयार करून पुरविले . युवापिढी चे आयडॉल, युथ आयकॉन म्हणुन पंढरपूर तालुक्यांत...

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात रस्ते विकासासाठी 6कोटी रू. निधी मंजूर. आ. समाधान आवताडे.

Image
 *पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात रस्ते विकासासाठी ६ कोटी मंजूर- आ आवताडे* मंगळवेढा/प्रतिनिधी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्ते गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते, ही बाब विचारात घेऊन  लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे (२५१५) ही योजना सुरू आहे यातून गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी व ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचविण्यासाठी आणि मतदारसंघातील रस्ते सुविधा सक्षमीकरण करण्याच्या अनुषंगाने पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांतील विकास कामांसाठी ६ कोटी  रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी समाधान आवताडे यांनी दिली आहे.  महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग या विभागाकडे आ. आवताडे यांनी सदर निधीची मागणी केली होती. सन २०२४ - २५ या अर्थिक वर्षातील तरतुदीद्वारे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था मजबुतीकरणासाठी व रस्ते दुरुस्तीकरणा...

पांडूरंग बजाज शो रूम मध्ये 400व्या इलेक्ट्रिक चेतक ब्ल्यू स्कूटर चे वितरण उत्साहात संपन्न.

Image
 पांडूरंग बजाज मध्ये पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक चेतक ब्ल्यू स्कूटरचे 400व्या वाहनाचे  वितरण उत्साहात संपन्न..-श्री यशोवर्धन राहुल उत्पात. पंढरपूर, प्रतिनिधी    देशातील दुचाकी निर्मिती करणाऱ्या  यशस्वी आणि  दर्जेदार  अग्रगण्य बजाज ऑटो या कंपनीने नव्या युगाला साजेल  अशी  पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक चेतक ब्ल्यू, स्कूटर ची रेंज खास ग्राहकांच्या आग्रहास्तव उपलब्ध करून दिली आहे. याच रेंजमधील   बजाज चेतक 2901ब्ल्यू या इलेक्ट्रिक स्कूटर चे  400व्या गाडीचे वितरण पांडूरंग बजाज शो रूम मध्ये उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रोप्रायटर यशोवर्धन उत्पात, व्यवस्थापक आदित्य खिस्ते, सेल्स एक्झिक्युटिव्ह अभिषेक, स्टोअर मॅनेजर वर्षा, सर्व्हिस इंजिनीयर विशाल, टेक्निशियन बालाजी आदी उपस्थित होते. अल्पावधीतच ही स्कूटर ग्राहकांच्या पसंतीस उतरली असून शहर व परिसरात चारशे स्कूटर्स रस्त्यावर दिसून येत आहेत. अशी माहिती पंढरपूर येथील बजाज कंपनीचे डीलर पांडुरंग बजाज चे प्रोप्रायटर श्री यशोवर्धन राहुल उत्पात यांनी   दिली. बजाज चेतक ही इलेक्ट्रिक स्कूटर 2020प...

आषाढी वारीत मंदीर समितीला 8कोटी चौतीस लाखांचे उत्पन्न.

Image
 *मंदिर समितीला आषाढी यात्रेत 8 कोटी 34 लाखाचे उत्पन्न;*   *गतवर्षीपेक्षा 2 कोटीने उत्पन्नात वाढ;*   *कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती.*  पंढरपूर (ता.26) आषाढी एकादशी दिनांक 17 जुलै, 2024 रोजी संपन्न झाली. या दिवशी मुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल रूक्मिणीमातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. या यात्रेचा कालावधी दिनांक 6 ते 21 जुलै असा होता. या यात्रेमध्ये मंदिर समितीला 8 कोटी 34 लाखाचे उत्पन्न मिळाल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. श्रींच्या चरणाजवळ रू.7706694/- (रू.5792383/-), भक्तनिवास रू.5060437/- (रू.4385547/-), देणगी रू.38226828/- (रू.41161512/-), लाडूप्रसाद रू.9853000/- (रू.7480280/-), पूजा रू.399209/- (रू.119614/-) सोने भेट रू.1788373/- (रू.1332475/-), चांदी भेट रू.20365228/- (रू.1733791/-) व इतर रू.364000/- (रू.469030/-) असे एकूण रू.83484174/- (रू.62754227/-) असा उत्पन्नाचा तपशिल आहे. कंसात मागील वर्षाची आकडेवारी आहे. याशिवाय, या कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे पदस्पर्शदर्शन व मुखद...

वीर धरणातील पाणी निरा उजवा कालव्यात सोडावे. आ. समाधान आवताडे.

Image
 वीर धरणातून नीरा उजवा कालव्याद्वारे पाणी सोडा : आ. समाधान आवताडे वीर धरणातून वाहून जाणारे पाणी नीरा उजवा कालव्याव्दारे पंढरपूर तालुक्याला सोडण्याची पाठबंधारे विभाग सकारात्मक पंढरपूर :         सद्या वीर धरणातून नीरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. हे पाणी नदीद्वारे वाहून जात आहे.  हे पाणी निरा उजवा कालव्याद्वारे पंढरपूर तालुक्यातील लाक्षत्रेक्षात मिळवून द्यावे. यामुळे नीरा उजवा कालवा लाभक्षेत्रातील गावे, तिसंगी मध्यम प्रकल्प, बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव, पूर्ण क्षमतेने भरून घेता येतील. शेतकर्‍यांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. तसेच भुजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वीर धरणातून नीरा नदीत सोडलेले पाणी नीरा उजवा काल्यातून पंढरपूर तालुक्याला उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी आमदार समाधान आवताडे  यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक मा.कपोले सो यांच्याकडे केली आहे. दरम्यान, या मागनिची दखल घेत पाणी सोडण्याची मागणी मान्य केली आहे.         पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील पंढरपूर तालुक्यामध्ये न...

एम सी ए ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया मुदतीत वाढ.

Image
 एमसीए प्रवेशासाठीच्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेस मुदतवाढ स्वेरीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा पंढरपूर प्रतिनिधी– ‘शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एमसीए प्रवेशाकरिता आवश्यक असणाऱ्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.        बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध न झाल्याने पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.सी.ए.च्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला शासनाने मुदतवाढ दिली असून सुधारित वेळापत्रकानुसार आता शनिवार, दि.२७ जुलै २०२४ पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी व निश्चिती (कन्फर्मेशन) करण्यासाठी रविवार, दि.२८ जुलै २०२४ (सायं.५.००) पर्यंत मुदत दिली आहे. प्रवेशोत्सुक विद्यार्थ्याने एमएएच- एमसीए सीईटी २०२४ ही अथवा तत्सम परीक्षा दिलेली असावी. स्वेरीच्या एम.सी.ए. विभागाचे यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. गेल्...

फिनोलेक्स कंपनी मार्फत रेनकोट, बॅग्जचे वाटप आषाढी यात्रेत मोठे योगदान..

Image
   पंढरपूर येथील आषाढी वारीत फिनोलेक्स कंपनी मार्फत रेनकोट बॅग्ज , हरिपाठ चे मोफत वाटप.  पंढरपूर  प्रतिनिधी-पंढरपूर येथे झालेल्या  आषाढी वारी मध्ये फिनोलेक्स पाइप इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी यांच्या वतीने मागील गेल्या पस्तीस वर्षापासून मोफत रेनकोट , टी पी बॅग्स तसेच भाविकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा औषधोपचार केले जातात. तसेच दिंड्यामधून प्रवासात भाविकांना हरिपाठ देण्यात येतात. अशी माहिती फिनोलेक्स कंपनीचे जनरल मॅनेजर विश्वजीत हरवडे, सोलापूर विभाग प्रमुख गोपाळ अधोनी यांनी दिली. याही वर्षी फीनोलेक्स या कंपनीने विवीध सेवा दिल्या आहेत. श्री संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज पालखी, एकनाथ, मुक्ताबाई,गजानन, निवृत्तीनाथ यांच्या पालख्या येतं असतात, पुणे येथे मुकुल माधव फाउंडेशन व ससून हॉस्पिटल यांच्या द्वारे वैद्यकीय सेवा दीली जाते. पुण्यानंतर भाविकाना  पावसापासून संरक्षण देण्यासाठी दरवर्षी सुमारें एक लाख रेनकोट आणि चार लाख टी पी बॅग्स मोफत दिल्या जातात. पंढरपूर येथे हरिकृपा डिजिटल चे संचालक श्रीराम बडवे यांच्या माध्यमातून पोलिसांना आठ हजार रेनकोट दिले जातात. तसेच यात्रा काल...

कृष्णा नदीचे वाहून जाणारे पाणी दक्षिण भागातील गावांना द्या. आ. समाधान आवताडे.

Image
 कृष्णा नदीचे वाहून जाणारे पाणी दक्षिण भागातील गावांना द्या- आ समाधान आवताडे  आ आवताडे यांच्या मागणीवर कृष्णा-खोरे महामंडळाचा सकारात्मक प्रतिसाद  प्रतिनिधी- म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे कृष्णा नदीतील वाहून जात असलेले पाणी मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील १९ गावांना देण्याची मागणी मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यकारी संचालक पुणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सदर मागणी करत असताना आमदार आवताडे यांनी पत्रात नमूद केले आहे की, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचा रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, महमदाबाद हु, पडोळकरवाडी, शिरनांदगी,  मारोळी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर बु, सलगर खु, बावची,  पौट, आसबेवाडी, लवंगी, शिवणगी, येळगी, सोड्डी, हुलजंती या १९ गावांना लाभ होतो. मागील दोन पाण्याची आवर्तने झाली परंतु मंगळवेढा तालुक्यातील लाभक्षेत्राच्या शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली तसेच मी स्वतः फोनद्वारे, पत्राद्वारे बऱ्याच वेळा पाणी देण्याबाबत मागणी केलेली असताना सुद्ध...

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 56कोटी रुपयांचा निधी. आ. समाधान आवताडे

Image
 मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर - आ समाधान आवताडे  मंगळवेढा (प्रतिनिधी)- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील खराब रस्त्यांसाठीच्या कामासाठी एकूण ५६ कोटी रुपये एवढ्या निधीला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून प्रशासकीय मान्यता मिळाली असून हे खराब झालेले रस्ते दर्जोन्नती होऊन दळणवळणास अधिक चांगले रस्ते उपलब्ध होणार असल्याची माहिती मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. मंजूर झालेले रस्ते आणि मिळालेला निधी पुढीलप्रमाणे - मंगळवेढा ते दामाजी कारखाना या आठ किलोमीटर रस्त्यासाठी १३ कोटी ८१ लाख रुपये, अरळी ते नंदूर या पाच किलोमीटर रस्त्यासाठी ९ कोटी ८० लाख रुपये, भोसे ते वाघमोडेवाडी या तीन किलोमीटर रस्त्यासाठी ५ कोटी ६३ लाख रुपये, भाळवणी ते जित्ती या सहा किलोमीटर रस्त्यासाठी ८ कोटी ६६ लाख रुपये, महमदाबाद (शे) ते आंधळगाव या सात रस्त्यासाठी किलोमीटर १० कोटी ६५ लाख  रुपये तसेच पंढरपूर तालुक्यातील कासेगाव ते तावशी या पाच किलोमीटर रस्त्यासाठी ७ कोटी ७१ लाख रुपये अशा एकूण ६ रस्त्यांसाठी ५६ कोटी रुपये एवढ्या...

आषाढी यात्रेत चुकलेले चौदाशे भाविक पोलिसांच्या सतर्क कामगिरीमुळे नातेवाईकांच्या ताब्यात.

Image
 आषाढी यात्रेत चुकलेले १४०० भाविक शहर पोलिसांच्या सतर्क कामगिरीमुळे नातेवाईकांच्या ताब्यात.  पंढरपूर प्रतिनिधी - यंदाच्या आषाढी वारीत पंधरा लाखांच्या वर भाविक पंढरपूर येथे आले होते. यामुळे गर्दीत भाविक, नातेवाईक हरविण्याचे प्रमाण मोठे होते.   यात्रा कालावधीत १५०० भाविक  चुकले होते. या भाविकांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन १४०० वारकऱ्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले असल्याची माहिती दामिनी पथक प्रमूख पोउनि मोनिका पाटील यांनी दिली. आषाढी यात्रेत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी या भाविकांना मठ, मंदिर, वाळवंट, बस स्थानक, रेल्वे स्थानक, येथे हरविलेल्या व्यक्तीचा शोध घेणे व त्यांना त्यांच्या नातेवाईकाकडे  देण्यासाठी पंढरपुर शहरात तिर्थक्षेत्र पोलीस अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौक, गौतम विद्यालय, बस स्थानक, स्वा. सावरकर चौक, इंदिरा गांधी चौक, के बी पी कॉलेज चौक, कराड नाका, वाळवंट आदी ठिकाणी माहिती केंद्रे सुरू करण्यात आली होती. या ठिकाणी विविध प्रकारची माहिती देण्यासाठी २४ तास सेवा देण्यात येत होती. चुकलेल्या व्यक्तीची नोंद घेउन शोध घेण्याचे काम स्वयंसेवक करीत होते. म...

आषाढी यात्रेत चुकलेले 1400भाविक शहर पोलिसांच्या सतर्कतेने नातेवाईकांच्या ताब्यात.

Image
 आषाढी यात्रेत चुकलेले १४०० भाविक शहर पोलिसांच्या सतर्क कामगिरीमुळे नातेवाईकांच्या ताब्यात.  पंढरपूर प्रतिनिधी - यंदाच्या आषाढी वारीत पंधरा लाखांच्या वर भाविक पंढरपूर येथे आले होते. यामुळे गर्दीत भाविक, नातेवाईक हरविण्याचे प्रमाण मोठे होते.   यात्रा कालावधीत १५०० बक चुकले होते. या भाविकांच्या चाईकांचा शोध घेऊन १४०० कांना नातेवाईकांच्या स्वाधीन यात आले असल्याची माहिती या पथक प्रमूख पोउनि मोनिका पाटील यांनी दिली. पढी यात्रेत विठ्ठलाच्या दर्शनासाठी या भाविकांना मठ, मंदिर, बाळा, बस स्थानक, रेल्वे स्थानक, लेल्या व्यक्तीचा शोध घेणे व इतर ने देण्यासाठी पंढरपुर शहरात तिर्थक्षेत्र पोलीस अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौक, गौतम विद्यालये, बस स्थानक, स्वा. सावरकर चौक, इंदिरा गांधी चौक, कॉलेज चौक, कराड नाका, वाळवंट आदी ठिकाणी माहिती केंद्रे सुरू करण्यात आली होती. या ठिकाणी विविध प्रकारची माहिती देण्यासाठी २४ तास सेवा देण्यात येत होती. चुकलेल्या व्यक्तीची नोंद घेउन शोध घेण्याचे काम स्वयंसेवक करीत होते. माहिती केंद्राचा लाभ हजारो भाविकांना झाला. पोलीसांकडून योग्य माहिती मिळत असल्याने भा...

यंदाच्या आषाढी वारीत नऊ लाख बासष्ट हजार भाविकांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन.

Image
 यंदाच्या आषाढी वारी मध्ये नऊ लाख बासष्ट हजार भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन. साडे आठ लाख बुंदी लाडू ची विक्री. पंढरपूर प्रतिनिधी - प्रतिनिधी पंढरपूर -यंदाच्या आषाढी वारी मध्ये नऊ लाख बाषष्ट हजार दोनशे 49भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले . दि6ते 18जुलै या कालावधीत पदस्पर्श आणि मुखदर्शन घेतलेल्या भाविकांची संख्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. चार लाख 14हजार 31भाविकांनी पदस्पर्श दर्शन तर पाच लाख 48हजार दोनशे अठरा भाविकांनी मुखदर्शन घेतले आहे. एका मिनिटात तीस भाविकांनी मुखदर्शन घेतले असून दोन्ही प्रकारच्या दर्शनाची नोंद समिती ने बसविलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याद्वारे घेण्यात आली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा प्रसाद म्हणुन बुंदी लाडू विक्री केली जाते, शुक्रवार दी 18तारखे पर्यन्त आठ लाख पन्नास हजार बुंदी लाडू ची विक्री आषाढी वारी कालावधीत झाली आहे. तर एकादशी दिवशी प्रसाद म्हणुन राजगिरा लाडू दिला जातो. राजगिरा लाडू ची केवळ 95हजार विक्री झाली आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे होणारी विक्रमी गर्दी गृहीत धरून श...

लावणीचा निस्सीम उपासक, लावणीसम्राट कै. ज्ञानोबा उत्पात.

Image
 *लावणीचा निस्सीम उपासक-* *लावणीसम्राट ज्ञानोबा उत्पात.* आज १९जुलै. ज्ञानोबाकाकांना जावून सोळा वर्षे झाली. काळ किती भराभरा पुढं सरकत राहतो. ते आपल्या मध्ये नाहीत हे आजही खरं वाटत नाही. ज्ञानोबा काका म्हणजे एक गोड व्यक्तिमत्त्व. अत्यंत निगर्वी, साधे, कुठलाही अभिनिवेश नाही. सतत हसरी, प्रसन्न मुद्रा. आणि चेहऱ्यावर मिश्कील भाव. गोष्टीवेल्हाळ, किस्से रंगवून सांगण्याची विशिष्ट लकब. अनेक पुरस्कार मिळाले पण कुठल्याही गोष्टीचा कधीच गर्व झाला नाही. असे हे आमचे ज्ञानोबा काका म्हणजे सगळ्यांचे ‘माऊली’ आपल्या मधून जाऊन आज सोळा वर्ष झाली. ज्ञानोबा काका जाण्यापूर्वी पंधरा दिवस आधी ते माझ्याकडे कोल्हापूरला आले होते. कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाच्या संगीत आणि नाट्यशास्त्र विभागाने त्यांच्या लावणी गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. विद्यापीठातल्या गेस्ट हाऊस वर त्यांची सोय केल्याचे आयोजकांनी त्यांना कळवले होते. पण आयोजकांना त्यांनी ‘अहो माझी पुतणी कोल्हापुरात असताना मी गेस्टहाऊसवर कशाला राहीन’ असे सांगून ते हक्काने आणि कौतुकाने माझ्या घरी आले. माझे घर विद्यापीठाच्या जवळ असल्याने त्यांना फार दगदगही ...

तेरा लाख 96हजार 72भाविकांनी घेतला महाआरोग्य शिबिराचा लाभ.

Image
 तेरा लाख 96हजार 72भाविकांनी घेतला महाआरोग्य शिबिराचा लाभ. आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांचे मानले आभार.  पंढरपूर ( प्रतिनिधी) . श्री विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी भाविक भक्त हे देहू आळंदीहून संत तुकाराम महाराज तसेच संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या दिंडीच्या सोबत लाखोच्या संख्येने वारकरी भाविक भक्त हे पायी चालत पंढरपूरच्या दिशेने येत असतात. अशा या पायी चालत येणाऱ्या वारकरी भावीक भक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग मंत्रालयाच्या वतीने आरोग्याची वारी पंढरीच्या दारी ही आरोग्य विषयक योजना गेल्या दोन-तीन वर्षापासून आषाढी यात्रेच्या दरम्यान भाविक भक्तांसाठी सुरू केलेली आहे.      देहू आळंदी पासून येणाऱ्या भावीक भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत आरोग्य विभाग वारकऱ्यांच्या साठी औषध उपचार त्याचप्रमाणे त्यांना चालत येताना होणारे आजार या सर्व आजारांवर औषध उपचार व ॲम्बुलन्स तसेच बेडची व्यवस्था ही केली जाते. वारकरी भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग हे आरोग्य यंत्रणा राबवित आहेत.      वार...

स्वच्छ वारी, निर्मल वारी बरोबरच सुरक्षित वारी ही संकल्पना राबवावी.

Image
 स्वच्छ वारी, निर्मल वारी बरोबरच सुरक्षित वारी ही संकल्पना राबवावी                                                                                -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये स्वच्छ वारी निर्मल वारी कार्यक्रमाचा समारोप         *मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'वारी महाराष्ट्र धर्म' कॉपी टेबल बुक च प्रकाशन         *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने विषयी सादरीकरण करणाऱ्या कला पथकाला            मुख्यमंत्र्याकडून राज्यभरात जनजागृती करण्याचे काम             पंढरपूर, दिनांक 17:- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत असलेले स्वच्छ वारी निर्मल वारी सारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असून यातून लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण होत आहे. पुढील काळा...

आषाढी यात्रा संपताच स्वच्छतेच्या कामाला वेग.

Image
 आषाढी  यात्रा संपताच शहर स्वच्छतेच्या कामाला वेग दोन दिवसात संपुर्ण शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न – मुख्याधिकारी, डॉ.प्रशांत जाधव स्वच्छतेसाठी १५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती. पंढरपूर दि.१८ – पंढरपूर शहरामध्ये दि.१७ जुलै २०२४ रोजी एकादशी सोहळा संपन्न झाला. आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी देश विदेशातून व संपूर्ण महाराष्ट्रातून  भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. या यात्रा कालावधीत सुमारे १५ ते २० लाख वारकरी-भाविक दर्शनासाठी आले आहेत. या येणाऱ्या भाविकांना आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पंढरपूर नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी यात्रा संपण्याच्या मार्गावर असताना पंढरपूर शहर लवकरात लवकर स्वच्छ होण्याच्या दृष्टीने विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात यावी अश्या सूचना दिल्या होत्या त्या नुसार युद्ध पातळीवर विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी दिली. आषाढी यात्रा कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूर शहरामध्ये...

आ. समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून पंढरीत साकारत आहे मराठा समाज भवन.

Image
 आ.आवताडे यांच्या प्रयत्नाने राज्यातील पहिल्या मराठा समाज भवनाचा पंढरीत पायाभरणी शुभारंभ संपन्न. पंढरपूर प्रतिनिधी - मराठा समाजासाठी उभारण्यात येणारे राज्यातील पहिले मराठा भवन पंढरपूरमध्ये साकारण्यात येत असून या मराठा भवनाच्या मंजुरी पासून ते पायाभरणी शुभारंभ पर्यंत आमदार समाधान आवताडे यांनी सरकारची पाठ न सोडता पाठपुरावा केल्यामुळे पाच कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत हा निधी कमी पडत असून आणखी दहा कोटी ची मागणी समाधान आवताडे यांनी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने केली असून त्या निधीची तरतूद ही करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. 22 नोव्हेंबर 2023 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्तिकी एकादशीच्या पूजेसाठी पंढरपूर येथे आले असता सकल मराठा समाज पंढरपूर यांच्या वतीनेही देवेंद्र फडणवीस यांना मराठा भवनाचे निवेदन देण्यात आले होते त्याचबरोबर 15 डिसेंबर 2023 रोजी आमदार समाधान आवताडे यांनी रात्री बारा वाजता मराठा भवन व सारथीच्या केंद्र उभारणीची मागणी अधिवेशनामध्ये केली होती. 2 फेब्रुवारी 2024 रोजी गजानन महाराज मठाच्या पाठीमागील जागा मराठा भवनासाठी देण्य...

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नूतन बसस्थानकाचे लोकार्पण.

Image
 ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते चंद्रभागा बसस्थानक व यात्री निवास इमारतीचे लोकार्पण. पंढरपूर, दि. १७: प्रतिनिधी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने पंढरपूर येथे उभारण्यात आलेले चंद्रभागा बसस्थानक व यात्री निवास इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.  यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गिरीश देशमुख, महाव्यवस्थापक  शिवाजी जगताप, दिनेश महाजन, पुणे विभागाच्या उप महाव्यवस्थापक यामिनी जोशी, पंढरपूर विभाग नियंत्रक विनोद भालेराव आदी उपस्थित होते. श्री.महाजन यांनी चंद्रभागा बसस्थानक व यात्री निवास इमारतील सुविधांची पाहणी केली.  *चंद्रभागा बसस्थानक व यात्री निवास इमारत*  आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी एसटी महामंडळाकडून आपल्या ११ हेक्टर जागेवर ३४  फलाटाचे अति भव्य चंद्रभागा यात्रा बस स्थानक निर्माण करण्यात आले आहे. तसेच  ...

शासाकिय महापूजे आधी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंदीर परीसरात केली स्वच्छतेची पाहणी.

Image
 महापूजेपूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील स्वच्छतेची पाहणी पंढरपूर, प्रतिनिधी -  आषाढी एकादशी वारी निमित्त पंढरपूर शहरात लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेले आहेत. जिल्हा प्रशासनाने वारकरी व भाविकांसाठी अनेक सोयी सूविधा उपलब्ध करून दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेपूर्वी  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महाद्वार, कुंभार घाट व विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात स्वच्छतेची पाहणी केली व संबंधित अधिकारी व साफसफाई कर्मचारी यांना दक्ष राहण्याबाबत निर्देशित केले.         यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी या परिसरातील रस्ते व शौचालयाची स्वच्छता पाहणी करून पंढरपूर नगर परिषदेचे स्वच्छतेचे अधिकारी व साफसफाई कर्मचारी यांना स्वच्छता मोहीम व्यवस्थितपणे राबवण्याबाबत सूचित केले. रस्त्याच्या कडेची घाण, शौचालय स्वच्छ करणे, रस्त्याची साफसफाई करणे व शौचालय मधील विस्टा तात्काळ सक्शन मशीनच्या माध्यमातून काढून परिसरा बाहेर घेऊन जाणे याबाबतची माहिती घेऊन संबंधितांनी महाद्वार, कुंभार घाट परि...

महापुजे पुर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंदीर परीसरात केली स्वच्छतेची पाहणी.

Image
 

पंढरपूर शहरात पंधरा लाख भाविकांची मांदियाळी विठू नामाच्या गजरात दुमदुमली पंढरी..

Image
 पंढरपूर शहरात आषाढी यात्रेसाठी जमला 15 लाख भाविकांची मांदियाळी.   विठूनामाच्या गजरात दुमदुमली पंढरी. पंढरपूर,( प्रतिनिधी ) आषाढी देवशयनी एकादशी या अनुपम्य सोहळ्यासाठी अध्यात्म नगरी पंढरपूर येथे पंधरा लाख भाविकांची मांदियाळी जमली आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखों भाविक सर्व प्रापंचिक विवंचना विसरून एकत्र आले आहेत. . आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी इतर सर्व संतांच्या पालख्या, दिंड्या  सकाळपासूनच पंढरीत दाखल झालेल्या आहेत. कांहीं मानाच्या पालख्या, दिंड्या फक्त वाखरी येथील रिंगण सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा करुन दाखल होतात.  यंदाच्या हंगामात पाऊस चांगला झाल्याने आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी अंदाजे पंधरा लाख  भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. .पंढरपूर शहरालगतचा परिसर, भक्ती सागर 65 एकर परिसर, सांगोला चौक, शेगांव दुमाला, भटुंबरे, इसबावी आदी भागात वारकरी भाविक मोठ्या संख्येने विसावले आहेत. सावळ्या विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर पत्राशेडच्याही पुढे गेली आहे. पदस्पर्श दर्शनासाठी सुमारे 14 ते 16 तास वारकरी भाविकांना पायपीट करावी लागत आहे. महाराष्ट्र ...

पंढरी नगरीत अवतरली मायावी मनोरंजन नगरी.

Image
 पंढरी नगरीत अवतरली मायावी मनोरंजन नगरी. मिनी एस्सेल वर्ल्ड ठरतेय आकर्षणाचा केंद्रबिंदू. प्रतिनिधी पंढरपूर -आषाढीवारी मध्ये बाल गोपाळांसह अनेकांचे आकर्षण  असलेले मिनी एस्सेलवर्ल्ड पंढरी नगरीत अवतरले असून ही मायावी अद्भूत मनोरंजननगरी हजारों भाविकांची  पावले आपसूकच वळवत आहे. दरवर्षी  आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये   ही मायावी नगरी येते  उंचच उंच आकाशपाळणा , हे सर्वांत आकर्षणाचा बिंदू असतो, इलेक्ट्रिक जनारेटर च्या शक्तीवर गोलगोल फिरणारा आकाशपाळणा जेंव्हा उंचावर जातो त्यावेळी आसमंतातून भक्ति नगरी पंढरपूर शहराचे सौदर्य अलौकिक असते. रात्रीच्या वेळी तर पंढरी नगरीचा नजारा काही वेगळाच असतो. हा आकाशपाळणा वेगाने खाली येतो तेव्हा पोटात गोळा येऊन अनेक नवखे घाबरून ओरडायला लागतात. आनंद,जोश, अनोखे थ्रिल अशा त्रिवेणी संगमाचा अनुभव भाविकासह शहर वासिय अनुभवत आहेत, खिशाला परवडेल अशा माफक दरात विवीध राईड्स असल्यानं गरीब, सर्वसामान्य ते अगदी श्रीमंत घरातील मंडळी याचा मुक्त आनंद घेताना दिसतात.  गोलाकार आणि मधूनच तिरका होऊन फिरणारा मेरी गो राऊंड, धडाधड एकमेकांना धडकत जाणाऱ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा.

Image
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर जिल्हा दौरा पंढरपूर  (प्रतिनीधी)-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक 16 व 17 जुलै 2024 रोजी पंढरपूर जिल्हा सोलापूर  दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे राहील.       मंगळवार 16 जुलै 2024 रोजी सायं. 4 वा.  कृषी पंढरी 2024 प्रदर्शनाचे उद्घाटन स्थळ -कृषी उत्पन्न बाजार समिती आवार, पंढरपूर.  सायं 4.15  वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह पंढरपूर कडे प्रयाण. 4.30 वा. पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरण विषयक जनजागृतीपर उपक्रमाचा समारोप सोहळा, शासकीय विश्रामगृह. सायं. 5 वा.  विविध विशिष्ट मंडळे लोकप्रतिनिधी यांच्या भेटीसाठी राखीव स्थळ- शासकीय विश्रामगृह, पंढरपूर. सायं.6 वाजता शास्त्रीय विश्रामगृह येथे राखीव.       बुधवार, दिनांक 17 जुलै 2024 रोजी मध्यरात्री 2.20 वा. शासकीय विश्रामगृह  येथून मोटारीने श्री विठ्ठल रखुमाई मंदिराकडे प्रयाण व आषाढी यात्रा 2024 श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा. पहाटे 4.30 वा.  देव वृक्ष सुवर्णपिंपळ बीज प्रसादाचे प्रतिनिधीक स्...

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन कामाची डॉ नीलम गोऱ्हे यांनी केली पाहणी.

Image
 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनाच्या कामांची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केली पाहणी.                    पंढरपूर (प्रतिनिधी)- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, त्यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम 15 मार्चपासून सुरू करण्यात आले आहे.  सदरच्या कामांची पाहणी  विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केली.        यावेळी मंदिर समितीचे सह.अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, अक्षय महाराज भोसले उपस्थित होते.               यावेळी बोलताना त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी आपण चार वर्षे पाठपुरावा केला होता. त्यानुसार आता पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर काम सुरू असल्याबाबत समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे श्री विठ्ठल व रुक्मिणी च्या मूर्तीला कोणतीही हानी ...

सर्व यंत्रणांनी पुढील तीन दिवस अत्यंत दक्ष राहून काम करावे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद.

Image
   सर्व यंत्रणांनी पुढील तीन दिवस अत्यंत दक्ष राहून काम करावे              -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पंढरपूर,  (प्रतिनिधी):- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी व भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मा. मुख्यमंत्री महोदयांनी या सुविधांची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. तसेच काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, शौचालयाची संख्या वाढवणे, रस्त्यावरील होर्डिंग काढून रस्ते मोकळे करणे व अनुषंगिक सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे सर्व संबंधित विभागानी या अनुषंगाने त्वरित कार्यवाही करावी व पुढील तीन दिवस अत्यंत लक्ष राहून आषाढी वारी यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.             भक्तनिवास येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, महापालिका उपायुक्त आशिष लोकरे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपविभाग...

भाविकांनी स्वच्छता राखून आरोग्याची काळजी घ्यावी. डॉ प्रशांत जाधव. मुख्याधिकारी न पा.

Image
 भाविकांनी स्वच्छता राखून आरोग्याची काळजी घ्यावी. डॉ प्रशांत जाधव. मुख्याधिकारी न पा: पंढरपूर (प्रतिनिधी) तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या भावीक भक्तांना पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने स्वच्छते विषयी घ्यायची काळजी व आपले आरोग्य जपण्यासाठी वारकरी भाविकभक्तानी स्वच्छतेला महत्त्व देऊन आपले आरोग्य जपावे. असे आवाहन करत पंढरपूर नगर परिषदेने भावीकभक्तांना  नम्र सूचना केली आहे. . वारकरी भाविक भक्तांनी उघड्यावर शौच करु नये तसेच शिळे अन्न उघड्यावर टाकू नये, धोकादायक इमारतीमध्ये राहू नये, कचरा गाडीचा कचरा टाकण्यासाठी वापर करावा व कचरा गाडीमध्ये आपला कचरा टाकावा अन्यत्र उघड्यावर कचरा टाकू नये, शिळे अन्न खाऊ नये नदीचे व बोअर चे पाणी पिऊ नये. नगरपालिकेने दिलेल्या टँकर मधून पिण्याचे पाणी प्यावे व नळाद्वारे येणाऱ्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा, वारकरी बांधवांनी पत्रावळी व द्रोण याचा वापर करावा, थर्माकोल व प्लास्टिकच्या साहित्याचा वापर करू नये. डॉ. प्रशांत जाधव मुख्याधिकारी नगरपरिषद पंढरपूर वारकरी बांधवांनी आपले पंढरपूर शहर स्वच्छ राहण्यासाठी सहकार्य करावे व आपल्या आरोग्...

आषाढी वारी मध्ये महा आरोग्य सेवा सुरू.

Image
 आषाढी वारी मध्ये महा आरोग्य सेवा आजपासून सुरू"   पंढरपूर ( प्रतिनिधी) तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे यंदाच्या वर्षी आषाढी यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आणि डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शना खाली पंढरपूर येथे वारकरी भाविक भक्तांच्या साठी महाआरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.      आरोग्याची वारी पंढरीच्या द्वारी या संकल्पनेला अनुसरून महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी गेली दोन वर्ष वारकरी भाविक भक्तांच्या आरोग्याची जपणूक करण्याचा उद्देशाने व वारकरी भाविक  पायी चालत येत असताना कोणाला जखम झाली असेल कुणाला सर्दी पडसे व अन्य आजार असतील अशा वारकरी भाविक भक्तांच्या साठी औषध उपचाराची सोय या महाआरोग्य शिबिराच्या मधून करण्यात येणार आहे.       या महा आरोग्य सेवा मधून हजारोच्या संख्येने वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय कर्मचारी आशा वर्कर्स व अन्य वैद्यकीय सेवाधारी लोकांचा सहभाग या महा आरोग्य सेवेमध्ये असणार आहे. वारकरी भाविक भक्तांसाठी विविध रोगांच्या वरील उपचार यंत्रणा व औषधे ही उपलब्ध...

पंढरीत आरोग्याची वारी, चार ठिकाणीं आरोग्य शिबिराचे आयोजन.

Image
 आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : वर्ष २ रे !!* *" महाआरोग्य शिबीर, पंढरपूर " 2024 प्रतिनिधी पंढरपूर - आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने 15 ते 18 जुलै 2024 दरम्यान "महाआरोग्य शिबीर" "आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी" पंढरपूर येथे 4 ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. वारी काळात सुमारे 15 लाख वारकरी भक्तांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. आज पंढरपूर येथे आरोग्य विभागाची या महाआरोग्य शिबीर व महाराष्ट्र भरातून पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसंदर्भात, नियोजन व इतर तयारी संदर्भात पाहणी करून सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. व जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसह ज्या  ठिकाणी आरोग्य शिबीर होणार आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. या महाआरोग्य शिबिरासाठी पंढरपूरच्या 4 ठिकाणी भव्य दिव्य मंडप उभारण्यात येणार असून जवळपास 5000 डॉक्टरांच्या मदतीने सर्व वारकऱ्यांची सेवा, आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी जवळपास 200 डॉक्टर डोळ्यांची तपासणी करण्यासाठी उपस्थित राहणार असून या माध्यमातून किमान पाच लाख वारकऱ्य...

आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी.

Image
 *'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी'* * 12 जुलैपर्यंत 6 लाखापेक्षा अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा*  पुणे - आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' हा उपक्रम राबवीत असून, दि. 12 जुलैपर्यंत 6 लाख 28 हजार 904  वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि राज्यातील सुमारे एक हजार दिंड्यांमध्ये सहभागी झालेले लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात आहेत. त्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला की लगेच उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने सलग दुसऱ्या वर्षी 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' हा उपक्रम हाती घेतली आहे. प्रत्येक पाच किलोमी...