उत्साही वातावरणात श्री रूक्मिणी विद्यालयात पाठ्यपुस्तकांचे वाटप.
उत्साही वातावरणात विद्यार्थी स्वागत व पाठ्यपुस्तक वाटप.
पंढरपूर प्रतिनिधी -
श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित अक्षरनंदन प्राथमिक विद्यामंदिर इसबावी पंढरपूर येथे,,संस्थेच्या सचिवा तथा मार्गदर्शक सौ सूनेत्राताई पवार सो. यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आज शाळेचा पहिला दिवस अतिशय सुंदर वातावरणात साजरा करण्यात आल.
आज 15 जून शाळेचा पहिला दिवस,,,अतिशय आनंदाचा नवनवीन मित्रांना व जून्या मित्रांना भेटण्याचा ,,,या ओढीनेच आज प्रशालेतील वातावरण अतिशय उस्ताही,आनंदाचे नवीन पुस्तक मिळणार या ओढीचे होते.आजच्या दिवशी भरगच्च भरलेल्या व कित्येक दिवस शांत शांत असणाऱ्या शाळेत, मुलांचा गोंधळ ऐकून कसे मनाला आनंद वाटत होते.एकमेकांना व शिक्षकांना भेटणारी मुले आपला वर्ग बदल झाल्याचा आनंद व इतरांना केव्हा सांगू अशी ईच्छा बाळगणारे सवंगडी किती छान वाटत होते.प्रशालेच्या वतीने रांगोळी व स्वागत बोर्ड लिहून फुगे देवून स्वागत करण्यात आले.यावेळी मुलांना काही शाळेविषयी मार्गदर्शक सूचना देवून पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.सहशिक्षक श्री सुसेन गरड सर यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास इसबावी परिसरातील
समाजसेविका सौ स्मिताताई गणेश अधटराव यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन व त्यांचे स्वागत करून पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.
यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका व बहुसंख्य पालक उपस्थित होते.


Comments
Post a Comment