भोसे येथे बारा लाखांची चोरी.
भोसे येथे भर दिवसा बारा लाखाची चोरी
रोख रकमेरसह सोन्याचे दागिने चोरट्याकडून लंपास
प्रतिनिधि पंढरपूर.
पंढरपूर शहर व ग्रामीण भागात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे.करकंब जवळील भोसे या गावात
दि सात मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास घरातील सर्व मतदान करण्यासाठी घराच्या समोरील दरवाजाला कुलूप लावून गेले होते. यावेळी स्वप्निल सुनील तळेकर त्याची आई,वडील,पत्नी, चुलती,भावजई असे मतदान करून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरी आले होते.घरी आल्यानंतर त्यांना दरवाज्याचा कोंयडा तुटलेला व कुलूप खाली पडलेले दिसले.त्यानंतर घराचा दरवाजा उघडून आत पाहिले असता हॉलमध्ये सोन्याच्या दागिन्याची रिकामी बॉक्स व डबे अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. यावेळी स्वप्निल व त्याची पत्नी आई,वडील असे वडिलांच्या बेडरूम मध्ये बघितले असता यावेळी त्यांच्या लाकडी फर्निचरचे कपाट उघडे असलेले व टीव्हीच्या खालील बाजूस असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर त्या ठिकाणी नसल्याचे दिसून आले.कपाटामधील ड्रावर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व मंगल कार्यालयातील लग्न हॉलचे आलेले भाडे रोख रक्कम हे सुद्धा या ठिकाणी मिळून आले नाही. त्यामुळे एक लाख रुपये रोख रक्कम,18896 रुपये किमतीचे 3.5 ग्रॅम वजनाची सोन्याचे डोरले, 61395 किमतीचे 12.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण,एक लाख 23 हजार 747 रुपये किमतीचा एक 23.12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गोट,तीन लाख 11 हजार 831 रुपये किमतीचा 58.15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, 31 हजार 963 रुपये किमतीची 5. 77 ग्राम सोन्याची अंगठी,एक लाख 92 हजार 369 रुपये किमतीची 34.16 ग्रॅम वजनाची सोन्याची मोहन माळ, एक लाख तीन हजार तेवीस रुपये किमतीची 77.76 ग्राम वजनाची सोन्याची मोहन माळ, 89 हजार 563 रुपये किमतीचे 15.98 ग्राम वजनाच्या सोन्याच्या कानातील झुमका, चोपन्न हजार पाचशे आठ रुपये किमतीचे एक दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 75 हजार रुपये किमतीची तीस ग्राम वजनाची सोन्याची लक्ष्मी हार, एक लाख रुपये किमतीची 40 ग्रॅम वजनाची सोन्याचे गंठण, सात हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने त्यामध्ये 6 पैंजण जोड, वाळे,लहान मुलांचे कंबर साखळी जोड, पाच हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा एकूण बारा लाख 72 हजार 145 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याची फिर्याद स्वप्निल सुनील तळेकर यांनी करकंब पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
यावेळी घटनास्थळी श्वानपथक मागवण्यात आले होते.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या चोरीचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर हे करीत आहेत.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment