जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अध्यात्म आहे.-ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर.


 जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अध्यात्म आहे, समर्पित वृत्तीने ठाऊक असलेले ज्ञान देणे म्हणजे अध्यात्म.

ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर.

प्रतिनिधि पंढरपूर -

आपणास प्राप्त दुसऱ्यास देणे हे खरे अध्यात्म,जीवनाच्या कोणत्या क्षेत्रात अध्यात्म नाही, असे होत नाही डॉक्टर्स,शिक्षक, समाज सुधारक यांना स्वतंत्र अध्यात्माची गरज नसते असे प्रतिपादन ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.

काणे ज् सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रथन वर्धापन दिनानिमित्त ते काणे ज् गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे अध्यात्म आणि आरोग्य, या विषयावर बोलत होते 

त्यावेळी व्यासपीठावर डॉ सुरेंद्र काणे, डॉ वर्षा काणे, बाबा महाजन बडवे, माजी नगरसेवक ऋषिकेश उत्पात, ह भ प जयवंत महाराज बोधले आदि मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले

माणसाचं मन व्यस्त, व्यग्र आणि विचित्र आहे,,

मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी अध्यात्म अत्यंत आवश्यक आहे.

प्रत्येकाच्या ठायी वैचारिक अनुष्ठान असले पाहिजे, 

आजचा विषय , अध्यात्म आणि आरोग्य असला तरीही प्रत्येक क्षेत्राचा आणि अध्यात्माचा संबंध असतो.

आपले घर झाडावे कसे   यासाठी पण अध्यात्मिक अधिष्ठान आहे,

ज्याला घरातला कचरा काढता येतो त्यालाच मनातील कचरा काढता येतो. आणि आपण बारा वर्षापूर्वी काढलेला फोटो अजूनही मोबाईल स्टोअ रेज मध्यें ठेवतो,

डॉक्टर्स,शिक्षक आणि समाज सुधारक यांना स्वतंत्र अध्यात्माची गरज नसते,

अध्यात्म म्हणजे काय, 

हे ठरविण्याचा अधिकार कुणालाही नाही . आपला स्वभाव हे आपले अध्यात्म .

अध्यात्माची व्याख्या संतांनी ठरविल्या आहेत, त्याची व्याख्या संतानीच करावी,

नेमकी भूमिका आपण ठरवून चालत नाही,ज्ञान, सत्कर्म घडणे म्हणजे अध्यात्म नाही भगवंताचे नाम हे अध्यात्म नाही ,समाधी लागणे म्हणजे अध्यात्म  नाही 

  मला प्राप्त झालेले मी जगाला देऊ शकतो का त्याचा जगाच्या कल्याणासाठी उपयोग करणे हे खरे अध्यात्म आहे,

ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, या संतांनी ज्ञान दिले नसते तर आपण माणूस म्हणवून घेण्याच्या योग्यतेचे राहिलो नसतो .

आपण केलेले कष्ट, अभ्यास याचा उपयोग दुसऱ्याच्या दुःख निवारणासाठी  करणे हे आहे अध्यात्म,

दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव असणे, त्याच्या कारणाचा शोध घेणे  याची जाणीव म्हणजे अध्यात्म.

शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्याचा विचार केला पाहिजे, . मानसिक भूमिका तयार असणे आवश्यक असते.

कृती एक असली तरी भावना या वेगवेगळ्या असतात.

विश्वासाने घेतलेल्या औषधाचा परिणाम शरीरावर चांगला असतो,

शरीर हे अध्यात्माचे साधन आहे ते परिपूर्ण असले पाहिजे.

अंतःकरणात समाधान असेल तर सगळे जग सुखी दिसायला लागते .

संवाद समन्वय व समर्पण या तीन संकल्पना 

ज्याला जमल्या त्याचे जीवन कृतार्थ असे ते म्हणाले.

श्री विठ्ठल आशीर्वाद बाबा महाजन बडवे यांनी दिले तर श्री रूक्मिणी मातेचे आशीर्वाद ऋषिकेश उत्पात यांनी दीले.

यावेळी सौ सीमा परिचारक,सौ विनया परिचारक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले,प्रा. मंदार परिचारक, सी ए संजीव कोठाडिया, शिरीष पारस्वार, विलास उत्पात आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सौ वर्षा काणे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापक विश्र्वास पाटील,अनिल पवार, अमर अभंगराव, नाथा म्हस्के, डॉ ऋतुराज काणे, अतुल हरिदासयांनी परिश्रम घेतले.

संपादक.

चैतन्य उत्पात.


Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.