Posts

Showing posts from May, 2024

स्वेरीत डिप्लोमा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ.

Image
 डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरूवात स्वेरीच्या डिप्लोमा महाविद्यालयात सदर सुविधा उपलब्ध पंढरपूरः प्रतिनिधी ‘गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.- ६४३७ ची मान्यता मिळाली असून बुधवार, दि. २९ मे २०२४ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया मंगळवार, दि. २५ जून २०२४ पर्यंत चालणार आहे,’ अशी माहिती डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी दिली.            सन २०२४-२५ करीता डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्विकारुन प्रमाणपत्रे, कागदपत्रांची तपासणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा.संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांचे अधिकृत केंद्र (एफ.सी.क्र.-६४३७) म्हणून स्वेरीच्या डिप्लोमा महाविद्यालयास मान्यता दिली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रा...

पालखी तळ मार्गावर आवश्यक सोयी सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे.- जिल्हाधिकारी आशीर्वाद.

Image
 पालखी तळ व मार्गावर भाविकांना आवश्यक सर्व सोयी सुविधा देण्यास  प्राधान्य द्यावे.                                                    -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद                                             पालखी तळांची व मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी            पंढरपूर, प्रतिनिधी आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 11 जुलै तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 12 जुलै 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. या पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संताच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. या सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग, विसावा तसेच पालखी तळांवर आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा ...

वादळातील नुकसानीची सरसकट भरपाई देण्याची अभिजीत पाटील यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी.

Image
 वादळातील नुकसानीची सरसकट भरपाई मिळावी वीज पडून मयत आणि जखमींना मदत मिळावी यासाठीही केली मागणी (ना.फडणवीस यांच्याकडे अभिजीत पाटील यांची निवेदनाद्वारे मागणी) पंढरपूर प्रतिनीधी सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर, मंगळवेढा, माढा व मोहोळ तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे होऊन ,नुकसानग्रस्तांना सरसकट भरपाई मिळावी अशी मागणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पंढरपूर, मंगळवेढा, माढा व मोहोळ हे तालुके पूर्वीपासूनच दुष्काळजन्य परिस्थितीला तोंड देत आलेले आहेत. या परिस्थितीतून तोंड देत कशीबशी पिके जतन केली होती. परंतू  अशातच या तालुक्यांतील गावांना काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा व वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलेला आहे. या अवकाळी पावसामुळे हाता-तोंडाला आलेल्या पिकांसह केळी, डाळींब, द्राक्षे व आंबा आदी फळबागांसह शेतकऱ्यांच्या राहत्या घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तालुक्यातील जवळपास प्राथमिक अंदाजे 1000 ते 1500 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले  आहे. त्...

स्वेरीतील इले्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप.

Image
 स्वेरीतील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप पंढरपूर-प्रतिनिधी गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला. त्यानिमित्त निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. स्वेरीमध्ये चार वर्षे परिश्रम केल्यामुळे आणि गुरु-शिष्याचे एक वेगळे बंधन जपल्यामुळे कॉलेज सोडताना विद्यार्थी  भावनिक झाले होते.        स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली हा समारंभ संपन्न झाला. दीप प्रज्वलनानंतर विभागप्रमुख डॉ.पवार यांनी विद्यार्थ्यांना करिअरसाठी व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच त्यांना आपल्या पुढील जबाबदारीची जाणीव करून यशाचे कानमंत्रही दिले. त्यानंतर काही करमणूक प्रदान कार्यक्रम करण्यात आले. स्वेरीमध्ये पदवीचे चार वर्ष शिक्षण घ...

उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून मारहाण प्रकरणी सहा जणांना ॲड. संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून अटकपूर्व जामीन मंजुर केला.

Image
 उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून मारहाण प्रकरणी सहा जणांना अटकपूर्व जामीन मंजूर. ॲड. संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून अटकपूर्व जामीन मंजुर केला. पंढरपूर, दि. २१ (प्रतिनीधी) उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी की, सदर घटनेतील फिर्यादी शंतनू भारत धोत्रे हा आहे. दिनांक २४/३/२०२४ रोजी फिर्यादी हे गावातील मारुती मंदिराचे समोर रात्री ८.०० वा चे सुमारास होळीसणाचे निमित्त नैवेद्य दाखविणेस येवून मंदिराचे बाहेर नारळ फोडून थांबला असताना समाधान श्रीपती कसबे, सुदेश निवृत्ती कसबे, आकाश खंडू आयवळे, सतिश निवृत्ती कसबे, राहूल दयानंद साबळे, सचिन खंडू आयवळे सर्व रा. खडकी ता. मंगळवेढा असे येवून समाधान श्रीपती कसबे याने फिर्यादीस तुझ...

मारहाण प्रकरणी सहा जणांना जामीन मंजुर.

Image
 उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून मारहाण प्रकरणी सहा जणांना अटकपूर्व जामीन मंजूर. पंढरपूर,  (प्रतिनीधी) उसने पैसे घेतलेच  कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी की, सदर घटनेतील फिर्यादी शंतनू भारत धोत्रे हा आहे. दिनांक २४/मार्च/२०२४ रोजी फिर्यादी हे गावातील मारुती मंदिराचे समोर रात्री ८.०० वा चे सुमारास होळीसणाचे निमित्त नैवेद्य दाखविणेस येवून मंदिराचे बाहेर नारळ फोडून थांबला असताना समाधान श्रीपती कसबे, सुदेश निवृत्ती कसबे, आकाश खंडू आयवळे, सतिश निवृत्ती कसबे, राहूल दयानंद साबळे, सचिन खंडू आयवळे सर्व रा. खडकी ता. मंगळवेढा असे येवून समाधान श्रीपती कसबे याने फिर्यादीस तुझे कसले पैसे मी तुला देणार नाही म्हणून शिवीगाळ करू लागले असता फिर्यादी स...

नुकसान ग्रस्त पिकांची प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केली पाहणी.

Image
 नुकसानग्रस्त पिकांची प्रांताधिकारी इथापे यांनी केली पाहणी             पंढरपूर, प्रतिनिधी-   पंढरपूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपुर्वी झालेल्या मान्सुनपुर्व पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी तालुक्यातील अनवली,सिध्देवाडी, एकलासपूर येथील नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष बांधावर पोहोचून पाहणी केली  व शेतकऱ्यांशी संवाद साधला.              तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पंचनामे गतीने व अचूकपणे पुर्ण करावेत. पंचनामे करताना कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार यांची दक्षता घ्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी इथापे यांनी यावेळी दिल्या.               यावेळी  प्रांताधिकारी इथापे यांनी मौजे एकलासपूर येथील तानाजी गायकवाड व सुरेखा कोल्हे यांच्या नुकसानग्रस्त केळी  पिकांची  पाहणी केली. तसेच सिध्देवाडी येथील दत्तात्रय कवडे यांच्या नुकसान झालेल्या केळी व आंबा या फळबागांची त्याचबरोवर...

दुष्काळी जनतेच्या भावनेशी खेळ.-प्रदीप खांडेकर.i

Image
 मतापूरते पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करून काँग्रेसचा  दुष्काळी जनतेच्या भावनेशी खेळ- प्रदीप खांडेकर पंढरपूर/प्रतिनिधी सध्या दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे अशा परिस्थितीमध्ये आमदार समाधान आवताडे यांनी ज्या गावात पाण्याची टंचाई आहे अशा गावातील ग्रामपंचायत ला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत प्रस्ताव आल्यानंतर तात्काळ त्या गावात टँकर सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत मात्र नुकत्याच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहित्यामुळे कागदी घोडे नाचविण्याचे खेळ न पाहता काँग्रेसने मतदानाअगोदर ना 'प्रस्ताव ना कागद' थेट तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये गावोगावी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करून आम्ही लोकांप्रती किती संवेदनशील आहोत हे दाखवून दिले होते, पण मतदान होताच काँग्रेसने सुरू केलेले पाण्याचे टँकर सर्रास गावातून बंद करत केवळ मते मिळवण्यापुरतेच आमदार प्रणिती शिंदे व काँग्रेसने टँकर सुरू करण्याचा स्टंट केला की काय? अशी चर्चा आता गावागावातील भोळ्याभाबड्या जनतेतून होऊ लागली असून काँग्रेसने लोकसभेला मते मिळवण्यापूरते पा...

आयशर टेम्पो व कंटेनर अपघातात टेम्पो जळून खाक.

Image
 आढीव जवळ झालेल्या भीषण अपघातात टेम्पो जळून खाक. प्रतिनिधी पंढरपूर - पंढरपूर कुर्डूवाडी रस्त्यावर आढीव  गावाजवळ साड्या आणि रेडिमेड कपड्यांची वाहतूक करणारा आयशर टेम्पो आणि सिमेंट पाइप वाहून नेणारा कंटेनर यांची टक्कर होउन झालेल्या भीषण अपघातात आयशर टेम्पो जागीच जळून खाक झाला. हा अपघात बुधवार दि 22मे रोजी पहाटे पाच वाजता झाला. कंटेनर क्र एम एच 10टी टी 4746 आणि आयशर टेम्पो क्र एम एच 45, ए ई 5015 यांच्यात समोरासमोर धडक होउन अपघात झाला. प्रचंड मोठा आवाज आल्याने ग्रामस्थ जागे झाले, तोपर्यंत टेम्पो पेटला होता, यात एकुण 70लाख रूपयांचा माल नष्ट झाला. दोन्ही वाहनांची धडक झाल्यावर कंटेनर च्या डिझेल टाकी पेटल्याने आयशर जळून गेला. गुजराथ मधील अहमदाबाद येथून साड्या व रेडिमेड कपडे घेऊन कर्नाटक मधील चडचण येथे टेम्पो चालला होता. अपघातात टेम्पो चा क्लिनर जखमी झाला आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी पंढरपूर येथील नगरपालिकेचा अग्निशामक बंब मागविण्यात आला होता, या अपघातामुळे बराच वेळ वाहतूक खोळंबली होती. पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे हवालदार स्वप्नील वादडेकर आधिक तपास करीत आहेत. संपादक. चैतन्य उत्पात.

पंढरपूर तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल 94.96टक्के, बारा शाळांचा निकाल शंभर टक्के.

Image
 पंढरपूर तालुक्यातील १२ शाळांचा १०० टक्के निकाल ७२२७ पैकी ६८६३ विद्यार्थी उत्तीर्ण : ९४.९६ टक्के निकाल पंढरपूर : प्रतिनीधी -पंढरपूर शहर व तालुक्यातील ५५ कनिष्ठ महाविद्यालयातील ७,२२७ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यांतील ६,८६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये पंढरपूर तालुक्याचा निकाल ९४.९६ टक्के, तर १२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. पंढरपूर तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या निकालाची टक्केवारी अशी : केबीपी महाविद्यालय (९६.४३), विवेक वर्धिनी (९३.७१), यशवंत विद्यालय (९९.१३), न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी (९९.१७), श्री विठ्ठल प्रशाला वेणुनगर-गुरसाळे (९२.२५), उमा महाविद्यालय (९३.३३), माध्यमिक आश्रमशाळा वाखरी (९४.९४), वसंतराव काळे प्रशाला, वाडीकुरोली (९९.२९), वामनराव माने प्रशाला, भैरवनाथवाडी (९५.७०), अजितदादा पवार, पळशी (८३.५२), भैरवनाथ विद्यालय आणि वसंतराव काळे विद्यालय, आढीव (९१.१७), दौलतराव ज्युनिअर कॉलेज, कासेगाव (८६.३६), श्री दत्त विद्यामंदिर, सुस्ते (९८.६७), कै. दगडोजीराव देशमुख विद्यालय, धायतडकनगर (८१.६३), राजाराम ज्युनिअर कॉलेज, पंढरपूर (८९.९२), अजितदादा पव...

सोलापूर जिल्ह्याचा बारावी परीक्षेचा निकाल 92.97टक्के.

Image
 सोलापूर जिल्ह्याचा बारावीचा निकाल 92.97 टक्के               सोलापूर(प्रतिनिधी), दि. 21 :- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर केला आहे. या निकालात सोलापूर जिल्ह्याचा निकाल  92.97 टक्के इतका लागला आहे.               सोलापूर जिल्ह्यात  32 हजार 175 मुले व 24 हजार 424 मुली अशा एकूण 56 हजार 599 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यातून 29 हजार 237 मुले (90. 68 टक्के) व 23 हजार 388 मुली (95.75 टक्के) असे एकूण 52 हजार 625 विद्यार्थी (92. 97 टक्के) उत्तीर्ण झाले.    जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल 97.31 टक्के, कला शाखेचा निकाल 87. 85 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 93.3 टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल 89.51 टक्के तर विज्ञान व तंत्रज्ञानचा निकाल 93.67 टक्के इतका लागला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली आहे. संपादक चैतन्य उत्पात.

नदीकाठचा वीजपुरवठा आठ तास चालू ठेवण्यासाठी चेअरमन अभिजीत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन.

Image
 *निवडणूक होताच अभिजीत पाटलांनी लावला कामाचा सपाटा उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन केली शेतकऱ्यांसाठी मागणी* (चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली होती मागणी करून दिल्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ दिल्या सूचना) पंढरपूर प्रतिनीधी /- लोकसभा निवडणुकीत भाजपला विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी साथ दिली होती. त्यामुळे या सत्तेचा उपयोग जनतेच्या विकासासाठी आणि विठ्ठलच्या सभासदांसाठी करण्याबाबतची भूमिका घेत , शासन दरबारी विविध प्रश्न मांडण्यासाठी सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पिण्याचे पाणी सोडून भीमा नदीकाठचा वीजपुरवठा किमान आठ तास करण्यात यावा. ही पहिलीच मागणी करताच त्यावर तात्काळ दखल घेत वीज पुरवठा ८ तास करण्यास सूचना दिल्या.. मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी भेट घेऊन, वरील मागणीचे निवेदन देण्यात आले होते. याची दखल घेतली असल्याचे दिसून आले आहे. राज्यामध्ये गतवर्षी पाऊसमान अत्यल्प झाला आहे सध्या उन्हाची तीव्रता पाहता शेतकऱ्यांच्या व जनावरांच्या पिण्याच्या ...

सृष्टी रोंगे हीचे सी बी एस ई दहावी परीक्षेत घवघवीत यश.

Image
 पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील सृष्टी रोंगे हिने दहावी परीक्षेत मिळवले घवघवीत यश पंढरपूर प्रतिनिधी: श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोट्स इंग्लिश स्कूल कासेगावच्या सी.बी.एस.ई. च्या मार्च 2023-24 च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये खर्डी ता.पंढरपुर येथील विद्यार्थीनी कु. सृष्टी मोहन रोंगे हिने ९३.८०% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले असून तिचा लोटस इंग्लिश स्कूलमध्ये व्दितीय क्रमांक आला असून हिंदी विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवून विशेष प्राविन्य मिळवले आहे.  या यशामध्ये कुमारी सृष्टीने कोणतेही खाजगी क्लासेस न घेता आई-वडिलांचे योग्य मार्गदर्शन आणि मेहनत व जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. या यशाबद्दल सृष्टी हिचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून खर्डी गावातील व पंढरपूर तालुक्यातील अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांकडून तिचा सन्मान केला जात आहे. खर्डी  ग्रामपंचायत माजी सरपंच रमेश हाके आदर्श शिक्षक संतोष मोरे, आप्पा रोंगे, तसेच पत्रकार संतोष कांबळे यांच्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संपादक. चैतन्य उत्पात.

कासेगाव येथे बारा लाख रुपयांची चोरी.

Image
 कासेगाव येथे चोरी, अज्ञात चोरट्याने बारा लाख रुपयांचा ऐवज केला लंपास. प्रतिनिधी पंढरपूर -पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील बेंद वस्ती येथे राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरात शुक्रवार दि17रोजी मध्यरात्री चोरी होऊन रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण बारा लाख रुपयांच्या मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. तीव्र उकाड्यामुळे घराचे दरवाजे उघडे ठेवून झोपणे महागात पडले, याबाबत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी इब्राहिम शेख वय 40 हे कासेगाव येथील बेंद वस्ती येथे वस्तीवर कुटुंबासोबत राहतात,शेती आणि ईतर व्यवसाय करुन शेख कुटुंबाची गुजराण करतात. तीव्र आणि कडक उन्हाळ्यामुळे शुक्रवारी रात्री ते घराचे दरवाजे उघडे ठेवून झोपले होते, या संधीचा गैर फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने डाव साधला आणि शेख यांनी मोठ्या कष्टाने जमविलेली रोख रक्कम चार लाख रुपये आणि सोन्याचे दागिने पळवून नेले. सोन्याचे गंठण,कानातील वेल,गळसर, सोन्याच्या रींगा,एक तोळे वजनाचे चार सोन्याच्या अंगठ्या असा एकूण बारा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत फिर्यादी इब्राहिम शेख यांनी पंढरपूर तालुका पोलि...

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दि.2जून पासून पदस्पर्श दर्शन सुरू.

Image
 श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे  पदस्पर्शदर्शन 2 जून पासून होणार सुरू.                                                                                  सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर   आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना आवश्यक सोयी सुविधांची  उपलब्धता आषाढी यात्रेसाठी 2000 कर्मचारी व स्वयंसेवकांची नियुक्ती                                                                                                                                      ...

पंढरपूर मध्यें अनधिकृत होर्डिंग्जवर करवाई.

Image
 पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने शहरातील ५ अनधिकृत होर्डिंग्ज काढणे  बाबत धडक मोहीम . प्रतिनिधी पंढरपूर - मुंबई येथे घाटकोपर येथे झालेल्या होर्डिंग्ज च्या दुर्घटनेनंतर मा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांनी तातडीने आपत्कालीन व्यवस्थापन बाबत मीटिंग आयोजित केली होती या झालेल्या मीटिंगमध्ये ज्या ज्या शहरांमध्ये अनाधिकृत होर्डिंग्ज असतील त्याच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज पंढरपूर नगरपालिकेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, नगर अभियंता नेताजी पवार,  नगर रचना सहाय्यक सुहास झिंगे सोमेश धट लिपिक चिदानंद सर्वगोड मुकादम नवनाथ पवार व अतिक्रमण विभागाच्या टीमने शहरातील असलेल्या सर्व होर्डिंग्ज चा सर्व्हे करून ५ अनाधिकृत असलेल्या  होर्डिंग्ज रात्री उशीर पर्यंत काम करून काढून टाकण्यात आल्या तसेच रेल्वे हद्दीमध्ये व शहरांमध्ये उपेंद्र पब्लिसिटी आणि बाबा पेस्टींग यांनी 55 होर्डिंग्ज लावले आहेत त्यांना नोटीस बजावण्यात आल्या असून लावलेल्या होर्डिंग्ज चे स्ट्रक्चर ऑडि...

स्वेरीत, परदेशातील शिक्षण संधी या विषयावर मार्गदर्शन..

Image
 स्वेरीमध्ये ‘परदेशातील शिक्षणाच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न पंढरपूर-प्रतिनिधी गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी चर्चा सत्राचे आयोजन केले होते. ‘परदेशातील पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजिलेल्या दोन दिवशीय कार्यशाळेत दादर-मुंबई येथील ‘ई-प्लॅनेट इंटरनॅशनल’ या  कंपनीचे ऑस्ट्रेलिया स्थित असलेले कंपनीचे संचालक सदानंद मोरे हे बहुमोल मार्गदर्शन करत होते.         स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन दिवसीय चर्चासत्र पार पडले. प्रारंभी दीपप्रज्वलनानंतर प्रास्तविकात ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा.ए.ए. मोटे यांनी हे दोन दिवशीय चर्चासत्र आयोजित करण्यामागील हेतू स्पष्ट केला. ‘अभियांत्रिकी व फार्मसी मधून पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी हे परदेशातील पदव्युत्तर शिक्षणासाठी उपलब्ध असणाऱ्या संधी शोधत असतात. ऑस्ट्रेलिया, युनायटेड स्टेट्स, कॅनडा, न्य...

पालखी मार्गावरील कामे 10जून पर्यन्त पुर्ण करावीत.- प्रांताधिकारी सचिन इथापे

Image
 पालखी मार्गावरील कामे 10 जून पर्यंत पूर्ण करावीत                                                                                           प्रांताधिकारी सचिन इथापे             प्रतिनिधी पंढरपूर आषाढी यात्रेसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भावीक चालत येतात.पायी पालखीसोहळ्या बरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पालखी महामार्गावरील सेवा रस्त्याची दुरुस्ती, महामार्गावरील रस्त्यावरुन पालखी सोहळ्यास पालखी तळाकडे जाण्यासाठी व येण्यासाठी योग्य प्रमाणात उतार आदीबाबतची कामे 10 जून पर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.       आषाढी यात्रा प...

पालखी मार्गावरील कामे 10जून पर्यन्त संपावावित - प्रांताधिकारी इथापे

Image
 पालखी मार्गावरील कामे 10 जून पर्यंत पूर्ण करावीत                                                                                           प्रांताधिकारी सचिन इथापे             प्रतिनिधी पंढरपूर आषाढी यात्रेसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भावीक चालत येतात.पायी पालखीसोहळ्या बरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पालखी महामार्गावरील सेवा रस्त्याची दुरुस्ती, महामार्गावरील रस्त्यावरुन पालखी सोहळ्यास पालखी तळाकडे जाण्यासाठी व येण्यासाठी योग्य प्रमाणात उतार आदीबाबतची कामे 10 जून पर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.       आषाढी यात्रा प...

भोसे येथे बारा लाखांची चोरी.

Image
 भोसे येथे भर दिवसा बारा लाखाची चोरी रोख रकमेरसह सोन्याचे दागिने चोरट्याकडून लंपास  प्रतिनिधि पंढरपूर. पंढरपूर शहर व ग्रामीण भागात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे.करकंब जवळील भोसे या गावात      दि सात मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास घरातील सर्व मतदान करण्यासाठी घराच्या समोरील दरवाजाला कुलूप लावून गेले होते. यावेळी स्वप्निल सुनील तळेकर त्याची आई,वडील,पत्नी, चुलती,भावजई असे मतदान करून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरी आले होते.घरी आल्यानंतर त्यांना दरवाज्याचा कोंयडा तुटलेला व कुलूप खाली पडलेले दिसले.त्यानंतर घराचा दरवाजा उघडून आत पाहिले असता हॉलमध्ये सोन्याच्या दागिन्याची रिकामी बॉक्स व डबे अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. यावेळी स्वप्निल व त्याची पत्नी आई,वडील असे वडिलांच्या बेडरूम मध्ये बघितले असता यावेळी त्यांच्या लाकडी फर्निचरचे कपाट उघडे असलेले व टीव्हीच्या खालील बाजूस असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर त्या ठिकाणी नसल्याचे दिसून आले.कपाटामधील ड्रावर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व मंगल कार्यालयातील लग्न हॉलचे आलेले भाडे रोख रक्कम हे सुद्धा या ठिकाणी मिळून ...

सोलापूर 57.46तर माढा मतदारसंघात 59.87 टकके एवढे झाले मतदान.

Image
 सोलापूर मतदारसंघासाठी 57.46 टक्के तर     माढा मतदारसंघासाठी 59.87 टक्के मतदान झाले.   पंढरपूर  (प्रतिनिधी):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात दि. 07 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रीया पार पडली.   यावेळी सायंकाळी 6 वाजपर्यंत  42-सोलापूर (अ.जा.) मतदार संघासाठी अंदाजित 57.46 टक्के व 43-माढा लोकसभा मतदारसंघासाठी अंदाजित 59.87 टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.    यावेळी 43-माढा लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महसूल अमृत नाटेकर आदि उपस्थित होते. यामध्ये 42-सोलापूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो.   या मतदारसंघाचे एकूण मतदार संख्या 20 लाख 30 हजार 119 इतकी असून यामध्ये 10 लाख 41 हजार 470 पुरुष मतदार, 9 लाख 88 हजार 450 स्त्री मतदार व 199 तृतीयपंथी मतदार आहेत.     यामध्ये ...

काणे ज् सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये प्रथम वर्धापन दीन उत्साहात संपन्न.

Image
 डॉ. काणेज गायञी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चा प्रथम वर्धापनदिन उत्साहात संपन्न . पंढरपूर प्रतिनिधी--पंढरपूर येथील सुप्रसिद्ध डॉ. का णेज हाँस्पीटल चा वर्धापनदिन साजरा करत असतानाच डॉ. काणे दाम्पत्याने त्यांच्या नवीन हाँस्पीटल मध्ये समाजातील सर्व  रुग्णांसाठी मोफत तपासणी आणि सवलतीत उपचार  केले. ह्या शिबिराचा असंख्य रुग्णांनी लाभ घेतला  डॉ. वर्षा काणे यानी हाँस्पीटल व शिबीराबद्दल माहिती देताना असे सागितले की  गेल्या वर्षी ह्या हाँस्पीटल चे मोठ्या थाटात उदघाटन झाले . त्या दिवसापासून ते आजपर्यंत आम्ही असंख्य रुग्णावर उपचार करून नीट केले त्या बद्दल आम्ही व आमचे सर्व कर्मचारी समाधानी आहोत आणि ह्यापुढे ही असेच काम करणार आहे असा विश्वास बोलून दाखवला.  .दि.२४  एप्रिल ते  २ मे  दरम्यान डॉ.काणेज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधे वर्धापनदिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रुग्णांची मोफत तपासणी,ब्लड प्रेशर,ब्लडशुगर, हिमोग्लोबीन आणि हाडातील कॅल्शियम चेक अप पूर्ण मोफत करण्यात आली. सोनोग्राफी   ५००/- रू, 2D Echo 750/-  रू. ईसी...

मंगळवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुक मतदानासाठी प्रशासन सज्ज.- सहाय्यक निवडणूक अधिकारी सचिन इथापे.

Image
 मंगळवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज. सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा  प्रांताधिकरी सचिन इथापे.  पंढरपूर  प्रतिनिधी- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत जिल्ह्यात ४२ सोलापूर लोकसभा मतदार संघातील २५२ पंढरपूर विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असून, मतदान मंगळवार दि ७ मे २०२४ रोजी होणार आहे. मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. अशी माहिती प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी सचिन इथापे यांनी प्रांत कार्यालय येथील सांस्कृतिक भवन येथे रविवार दि.5 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता  झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. २५२-पंढरपूर विधानसभा मतदार संघामध्ये एकूण पुरुष मतदार १८४६२४ स्त्री मतदार १७३१९१ व इतर मतदार २३ असे एकूण ३५७८३८ एवढे मतदार व ५४९ सैनिक मतदार आहेत. मतदार संघाचा EP ratio दि १९एप्रिल रोजी ७८.८१ एवढा आहे. Gender Ratio हा ९३७ आहे. मतदारसंघामध्ये १८-१९ वयोगटातील एकूण मतदार ६९९७ असून २०-२९ वयोगटातील मतदार हे ७५६९९ इतके आहेत. ८५ वर्षावरील मतदारांची संख्या हि ५३५४ असून PWD मतदार संख्या ह...

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अध्यात्म आहे.-ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर.

Image
 जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अध्यात्म आहे, समर्पित वृत्तीने ठाऊक असलेले ज्ञान देणे म्हणजे अध्यात्म. ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर. प्रतिनिधि पंढरपूर - आपणास प्राप्त दुसऱ्यास देणे हे खरे अध्यात्म,जीवनाच्या कोणत्या क्षेत्रात अध्यात्म नाही, असे होत नाही डॉक्टर्स,शिक्षक, समाज सुधारक यांना स्वतंत्र अध्यात्माची गरज नसते असे प्रतिपादन ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले. काणे ज् सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रथन वर्धापन दिनानिमित्त ते काणे ज् गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे अध्यात्म आणि आरोग्य, या विषयावर बोलत होते  त्यावेळी व्यासपीठावर डॉ सुरेंद्र काणे, डॉ वर्षा काणे, बाबा महाजन बडवे, माजी नगरसेवक ऋषिकेश उत्पात, ह भ प जयवंत महाराज बोधले आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले माणसाचं मन व्यस्त, व्यग्र आणि विचित्र आहे,, मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी अध्यात्म अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाच्या ठायी वैचारिक अनुष्ठान असले पाहिजे,  आजचा विषय , अध्यात्म आणि आरोग्य असला तरीही प्रत्येक क्षेत्राचा आणि अध्यात्माचा संबंध असतो. आपले घर झाडावे कसे  ...

मानवसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रिद जोपासणारे पंढरपूरचे डॉ. काणे दांपत्य.

Image
 मानवसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे पंढरपूरचे काणे डॉक्टर फक्त पंढरपूरच नाही तर सोलापूर जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित नाव म्हणजे डॉ.काणे! त्याचे कारण म्हणजे त्यांची रुग्णसेवेची तब्बल सत्याऐंशी वर्षांची गौरवशाली परंपरा! सध्या तिसरी पिढी वैद्यकीय सेवा बजावत असली तरी चौथी पिढीही हळूहळू याच क्षेत्रात स्थिरावतेय. विशेष म्हणजे या चारही पिढ्यानी 'रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा' हे ब्रीद उराशी बाळगत याच भावनेने वैद्यकीय सेवा केली आहे. अध्यात्म आणि आरोग्य यांचा संबंध असतो, मानवाचे जसे विचार किंवा आचरण असले त्याप्रमाणे त्याच्या शरीरावर परिणाम होत असतात. डॉ काणेज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त गुरुवार दिनांक 2मे रोजी सायंकाळी सहा वाजता ह भ प चैतन्य महाराज देगुलर कर यांचे आरोग्य आणि अध्यात्म, या विषयावर व्याख्यान डॉ काणेज गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नवीन कराड नाका, टाकळी येथे आयोजित करण्यात आले आहे. मानवतेची सेवा करणारे समर्पित वैदयकीय व्यावसायिक म्हणजे पंढरपुरचे डॉक्टर काणे हे समीकरणच बनले आहे.     कै.डॉ.वामन विष्णु काणे हे पंढरपुरातील पहिले एमबीबी...