महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भा ज पा पक्षाच्या वतीने साजरी.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भा ज पा च्या वतीने अभिवादन.
प्रतिनिधी पंढरपूर -पंढरपूर येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पक्षाच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड, आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी
सोलापूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष डॉ प्राजक्ता बेणारे , शहराध्यक्ष डॉ जोती शेटे, जिल्हा उपाध्यक्ष ज्योती कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष जयश्री क्षीरसागर, जिल्हा सरचिटणीस सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया काकडे, जिल्हा सरचिटणीस सरिता माने, फादर बॉडी च्या उपाध्यक्ष अपर्णा तारके, जिल्हाचिटणीस अंजना जाधव, भारतीय जनता पार्टी किसान प्रदेश महिला मोर्चाच्या प्रमुख विश्रांती भुसनर, शहर सरचिटणीस प्रतिभा गानमोटे, शहर संघटन सरचिटणीस मेघा मोळक, शहर उपाध्यक्ष शिल्पा म्हमाणे, शहर उपाध्यक्ष सुवर्णा कुरणावळ, शहर सरचिटणीस संगी
ता कुरणावळ, जिल्हा उपाध्यक्ष सुजाता वगरे
आदि महीला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थीत होत्या.
यावेळी महीला मोर्चा जिल्हाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटना निर्माण करीत असताना केलेल्या महान कार्याची माहिती देऊन वंचीत घटकासाठी केलेल्या
आदर्श कार्याची माहिती विषद केली.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment