शेगाव दुमाला तेथे एक लाख रूपयांची गोवा बनावटीची दारू जप्त.
*शेगाव दुमाला येथे एक लाखाची गोव्याची दारू जप्त*
पंढरपूर विभागाची कारवाई
प्रतिनिधी पंढरपूर -
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूरच्या पथकाने गुरुवारी शेगाव दुमाला (ता. पंढरपूर) येथून एक लाख आठ हजाराची गोव्याची दारु जप्त केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवैध दारूविरुद्ध छापे टाकण्यात येत आहे. याच मोहिमेंतर्गत पंढरपूर विभागाच्या दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला गावाच्या हद्दीत पाळत ठेवली असता बालाजी विश्वनाथ चवरे, वय २९वर्षे, रा. पेनुर ता.मोहोळ व आकाश राजकुमार बनसोडे, वय २४ वर्षे, राहणार बेंद वस्ती कासेगाव, ता. पंढरपूर हे दोघेही त्यांच्या मोटरसायकलींवर प्लास्टिक पोत्यात गोवा राज्यात विक्रीस असलेली व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईत दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून दोन मोटरसायकली, ७५० मिली क्षमतेच्या रॉयल क्लासिक व्हिस्कीच्या गोवा विदेशी दारूच्या ६० बाटल्या, एक मोबाईल असा एकूण एक लाख ७६ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींना मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, पंढरपूर यांचे न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पुढील तपासात आरोपींची कसून चोकशी केली असता त्यांनी गोवा राज्य निर्मित विदेशी दारुचा साठा एका अज्ञात स्थळी ठेवल्याचे सांगितल्यावरुन तपास अधिकारी दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे यांनी कासेगावच्या हद्दीतील सरकारी कॅनलच्या पश्चिमेस काटेरी झुडपात पोत्यांमध्ये लपवून ठेवलेल्या ७५० मिली क्षमतेच्या रॉयल क्लासिक व्हिस्कीच्या गोवा विदेशी दारूच्या १२० बाटल्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईत एक लाख आठ हजार किंमतीची गोवा दारु, २ मोटरसायकली, एक मोबाईल, प्लास्टीक बुचे इ. असा एकूण दोन लाख अट्ठेचाळीस हजार सहाशे किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई अधीक्षक नितिन धार्मिक व उपअधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार , दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे, सहायक दुय्यम निरिक्षक जीवन मुंढे, जवान प्रकाश सावंत, विजयकुमार शेळके व वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली.
.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment